देशातील प्रत्येकाला आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी जन धन योजनेचे मोठे योगदान.

PMJDY ची सुरुवात झाल्याने देशातील प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक समावेशनासाठी सरकारच्या मोहिमेला अभूतपूर्व चालना मिळाली असून यापूर्वी कधीही न पाहिलेले यश सरकारला मिळाले आहे. यापूर्वीच्या सरकारांनीही आर्थिक समावेशासाठी पुढाकार घेतला होता.काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात ‘नो फ्रिल्स अकाऊंट्स’ योजना आणण्यात आली होती परंतु त्यांना यश मिळाले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले, PMJDY हे आर्थिक स्तरावरील एक राष्ट्रीय अभियान असून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला परवडणाऱ्या पध्दतीने मुलभूत बचत आणि ठेव खाते, रेमिटन्स, क्रेडिट, विमा आणि पेन्शन यासारख्या सुविधांसह वित्तीय सेवा मिळवून देते.

आतापर्यंत, बँकांनी 2.31 लाख कोटी रुपयांची ठेव असलेला सुमारे 53 कोटी PMJDY खाती उघडली आहेत, मार्च 2015 मध्ये 15,670 कोटी रुपये ठेवी असलेल्या 14.7 कोटी खात्यांपेक्षा तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे 36 कोटींहून अधिक RuPay कार्ड मोफत जारी करण्यात आले असून या माध्यमातून 2 लाख रुपये किंमतीचे अपघात विमा संरक्षण मिळते. जन धन खाते उघडण्याचे शुल्क किंवा देखभाल शुल्क नाही आणि किमान शिल्लक ठेवणे गरजेचे नाही ही बाब नोंद घेण्यासारखी आहे.

जन धन खाते उघण्यामध्ये मुख्यत्वे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठे योगदान आहे. जे या खात्यांपैकी सुमारे 78 टक्के योगदान देतात. जर आपण PMJDY डेटाचा तपशीलवार विचार केला तर, 81.2 टक्के ऑपरेटिव्ह खाती आहेत, 55.6 टक्के महिलांची आहेत आणि 66.6 टक्के ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत.

या जन धन खात्यांद्वारे विमा संरक्षण, ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि बचतीची सवय या बाबींवर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय त्यांचे सामाजिक परिणामही घडून येतात.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात, 3.55 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. देशातील राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सहावे आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले, देशभरात उघडलेल्या 53 कोटींहून अधिक खात्यांपैकी 7% जनधन खाती महाराष्ट्रात आहेत.

शिवाय, राज्यभरातील जन धन खात्यांमधील एकूण ठेवी ₹48,525.75 कोटींवर पोहोचल्या असून लाभार्थ्यांना 24 लाखांहून अधिक रुपे कार्ड जारी करण्यात आल्याने जन धन योजनेच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

जन धन योजना योजनेचे लाभ

योजनेअंतर्गत, मूलभूत बचत बँक ठेव (बीएसबीडी) खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये उघडले जाऊ शकते. योजनेचे फायदे असे आहेत:

  1. PMJDY खात्यांमध्ये कोणतीही किमान रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही.
  2. PMJDY खात्यांमध्ये ठेवीवर व्याज मिळते.
  3. पीएमजेडीवाय खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड प्रदान केले जाते.
  4. PMJDY खातेधारकांना जारी केलेल्या RuPay कार्डसह ₹1 लाख (28.8.2018 नंतर उघडलेल्या नवीन PMJDY खात्यांसाठी 2 लाख रुपये वाढवलेले दिसत आहेत) अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे.
  5. ओव्हरड्राफ्ट (OD) सुविधा. पात्र खातेधारकांना 10,000 रुपये उपलब्ध आहेत.
  6. PMJDY खाती थेट लाभ हस्तांतरण (DBT), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY), मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी बँक (MUDRA)योजनेसाठी पात्र आहेत.

माहिती संकलित.

Comments (0)
Add Comment