दिवा एकतेचा आणि राष्ट्र रक्षणाचा. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेले आवाहन.

दिवा एकतेचा आणि राष्ट्र रक्षणाचा 

भारतावर गेल्या तीन महिन्यापासून कोरोना विषाणूचे संकट प्रकर्षाने जाणवायला लागले आणि तेव्हा पासून दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग देशात वाढताना आपल्याला  दिसतो आहे. जगातील जवळपास १८० देशावर कोरोंनाचे संकट असून प्रत्तेक देश या सकटचा सर्वतोपरी सामना करताना दिसतो आहे.

भारतात सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून या संकटाचा सामना करण्यासाठी व जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.  ईश्वर सुद्धा या संकटाच्या समयी डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी, प्रशासनातील सर्व अधिकारी – कर्मचारी अशा विविध दिवस – रात्र झटणार्‍या सज्जनांच्या रूपाने आपल्यासोबत मैदानात आहे. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. २१ दिवसाचा लॉक डाउन घोषित केल्या पासून असंख्य लोक सैनिक म्हणून आहे तिथेच थांबून व आहे त्या परिस्थितीत लढा देत आहेत.

गेल्या आठवड्यात या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने तसेच सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी आपल्या घरूनच टाळ्या, घंटी, थाळी वाजवण्याचे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केले. या आवाहनाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. काही भागात उत्साही नागरिकांनी हा उपक्रम सामूहिक केला. सामूहिक उपक्रम करणे योग्य नव्हते पण त्यात मोदींचा काय दोष. देशातील काही तुरळक भागातून मोदींनी दिलेल्या या उपक्रमाचा चुकीचा अर्थ काढून टीका करण्यात आली परंतु जनतेनी त्याची दखल  घेतल्याचे दिसत नाही..

गेल्या काही दिवसातील देशातील घटना उघडकीस आल्या नंतर, समाज कंटकाकडून देशात कोरोना विषाणू मुद्दाम पसरवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना ? अशी शंका कोरोना विरुद्ध लढणार्‍या तमाम देशवासीयांच्या मनात निर्माण झाली  व यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले . अशा समाजकंटाकामुळे देशातील परिस्थिति हाता बाहेर जाते की काय ? असा मोठा प्रश्न आज देशातील नागरिकांसमोर  निर्माण झाला आहे.  

पुन्हा मोदींनी जनतेला आवाहन केले की ५ मार्च ला रात्री ९ वाजता  घरातील सर्व लाइट बंद करून आपल्या घराच्या अंगणात किंवा ग्यालरीत ९ मिनिटांसाठी पणती किंवा दिवा किंवा मोबाइल टॉर्च लावून आपण  सारे भारतीय एक आहोत आणि कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी, राष्ट्र रक्षणासाठी आपण सज्ज आहोत असा संदेश देण्याचे आवाहन केले.

समजाच्या सर्व स्तरातील गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, संत महंत, कलाकार, उद्योजक, शेतकरी, शेतमाजुर अशा सर्व भारतीयांनी स्वयंस्पुर्थीने मोठ्या प्रमाणात  राष्ट्रप्रमुखांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देश ठरलेल्या वेळी एका तालात आणि एका सूरात मोदींच्या मागे दिवा घेऊन उभा दिसला. आम्ही एक आहोत आणि राष्ट्र रक्षणासाठी सज्ज आहोत जणू असा निर्धार तमाम भारतीयांनी केला.

 

  • नितिन राजवैद्य         

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (1)
Add Comment
  • Bhagwat Bhange

    खूप सुंदर विचार व सकारात्मकता वाढविणारा लेख.. छान नितीन