दिवाळीला लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते, भगवान विष्णूची का नाही ?
चौदा वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा दिवाळीला लक्ष्मीची पूजा का केली जाते ? प्रभू श्रीराम आणि सीता मातेची पूजा का केली जात नाही ?
दुसरे म्हणजे, दिवाळीला लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते, भगवान विष्णूची का नाही ?
काही ‘ लिबरल्स ‘ हे लोकांच्या मनात लक्ष्मीपूजनाचे औचित्य काय असा प्रश्न निर्माण करत आहेत, दिवाळीचा सण तर रामाशी संबंधित आहे. एकंदरीत ते मुलांचे / सामान्य ब्रेनवॉश करत आहेत, की सनातन धर्माचा आणि सनातन उत्सवांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
खर तर दिवाळी हा सण सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगांशी संबंधित आहे.
सत्ययुगात समुद्रमंथनामुळे जा दिवशी मातालक्ष्मी प्रकट झाली होती , म्हणून लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. त्रेतायुगात योगायोगाने याच दिवशी प्रभू श्रीरामही अयोध्येला परत आले होते तेव्हा अयोध्येतील लोकांनी घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते.
त्यामुळे या पर्वाची दोन नावे आहेत, लक्ष्मीपूजन जे सत्य युगाशी संबंधित आहे आणि त्रेतायुगातील प्रभू श्रीराम आणि दिवे यांच्याशी संबंधित दुजा दिवाळी / दीपावली.
माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे नाते काय ? आणि दिवाळीत या दोघांची पूजा का केली जाते ?
सागरमंथनात धन, संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवीमाता लक्ष्मीजी सापडल्या, भगवान विष्णूनी त्यांच्याशी लग्न केले. आपल्या भक्तांना , लेकरांना धन, संपत्ती देण्याचे जबाबदारी माता लक्षीवर आहेच.. माता लक्ष्मीजींनी धन संपत्ती वाटण्यासाठी कुबेराला आपल्यासोबत ठेवले, कुबेर खूप कंजूस होता, त्याने धन वाटलेच नाही उलट तो स्वतःच धनाचा भंडारी होऊन बसला, हे पाहून माता लक्ष्मी दुःखी झाल्या, त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळत नव्हता. त्यांनी आपली व्यथा भगवान विष्णूना सांगितली. भगवान विष्णूंनी कुबेराच्या जागी संपत्ती वाटण्याचे काम दुसऱ्यावर सोपवण्याचा सल्ला दिला. माता लक्ष्मीजी म्हणाली की यक्षांचा राजा कुबेर हा माझा महान भक्त आहे. त्याला वाईट वाटेल. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना गणपतीच्या अफाट बुद्धीचा उपयोग करण्याचा सल्ला दिला, माता लक्ष्मीजीनीही गणेशजींना कुबेरा सोबत ठेवले. गणेशजी अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर गणेशजींनी लोकांच्या धन सौभाग्याचे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली, कुबेर फक्त पाहत राहिला आणि अशा प्रकारे कुबेरांच्या भांडाऱ्याची द्वारे गणेशजीनी उघड केली.
भगवान गणेशाची आपल्या भक्तांप्रती असलेली प्रेमळ कृपा पाहून माता लक्ष्मीने आपला मानसपुत्र श्री गणेश याला आशीर्वाद दिला की ज्यावेळी माझे पती नारायण माझ्या सोबत नसतील त्यावेळी माझा पुत्र म्हणून तू माझ्यासोबत रहावे. माता लक्ष्मीने गणेशाला वरदान दिले की जो कोणी माझ्यासोबत तुझी पूजा करणार नाही, लक्ष्मी त्याच्याजवळ कधीच राहणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीसह गणेशाची दत्तक पुत्र म्हणून पूजा केली जाते.
भगवान विष्णू चार महीने योग निद्रामध्ये असतात (चातुर्मास). दिवाळी अश्विन अमावस्येला येते दिवाळीच्या अकरा दिवसांनी देव उथनी एकादशीला चातुर्मास संपतो आणि देव जागे होतात., दरम्यान शरद पौर्णिमा आणि दिवाळी या मधील पंधरा दिवसांत माता लक्ष्मीला पृथ्वी भ्रमण करण्यासाठी यावे लागते, म्हणून त्या आपला मानसपुत्र गणेशजींना सोबत घेऊन येतात, म्हणून दिवाळीला लक्ष्मी गणेशाची पूजा केली जाते.
आपले सण, उत्सव, परंपरा या बद्दल अभिमान बाळगा..
सर्व हिंदू बांधवांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!