आता होत आहे ‘मुंबई’ला बंगळुरूशी सुपर कनेक्ट.

आता होत आहे ‘मुंबई’ला बंगळुरूशी सुपर कनेक्ट.

आता होत आहे ‘मुंबई’ला बंगळुरूशी सुपर कनेक्ट.

या महत्त्वाकांक्षी मुंबई-बेंगळुरू महामार्गाचे बांधकाम येत्या सहा महिन्यांत सुरू होणार आहे. त्यामुळे अटल सेतूपासून बंगळुरूपर्यंत नवा महामार्ग करण्यात येणार आहे. तसेच हाच मार्ग छत्रपती संभाजीनगर रस्त्यालाही जोडला जाणार आहे. त्यामुळे पुणे ते औरंगाबाद हे अंतरही कमी होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले

मावळ तालुक्यातून जाणारा अति महत्वकांक्षी रस्ते विकास महामंडळाचा प्रकल्प मुंबई ते बेंगळुरू हा चौदा पदरी होणार असल्याने, मुंबई पुणे महामार्गाच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

यामुळे फक्त वाहतूक कोंडी कमी नाही होणार तर, या महामार्गामुळे रोजगार उपलब्ध होण्यास सुद्धा मदत होईल. अनेक तरुणांना या मुले रोजगाराची संधी मिळेल. या मुळे ट्रॅव्हल एक्सपेंडिचर कमी होण्यास सुद्धा मदत होईल.

या महामार्गाचे काम जर झाले तर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि भारतातील सिलिकॉन व्हॅली समजले जाणाऱ्या बेंगळुरू या दोन महत्वाच्या शहरांना जोडेल, ज्या मुळे २०४७ पर्यंत देशाची ३० ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था करण्यास हात भर लावेल.

आर्थिक विकास – व्यापार वृध्दी : जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतुकीमुळे मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान व्यापार सुलभ होईल, दोन्ही प्रदेशातील आर्थिक कामांना चालना मिळेल.

औद्योगिक विकास: दळणवळणाच्या सुधारलेल्या सुविधांमुळे उद्योग आणि व्यवसायांना या क्षेत्राकडे आकर्षित करण्यात मदत होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

पर्यटन प्रोत्साहन: महामार्गामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि या मार्गावरील पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्याची क्षमता सुधारेल.

स्टार्टअप्स आणि संशोधन : महामार्ग कॉरिडॉरच्या बाजूने स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन हबच्या वाढीला चालना दिल्याने, विशेषत: तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स सारख्या क्षेत्राला चालना मिळेल.

बांधकाम क्षेत्र विकास: वाढीव कनेक्टिव्हिटीमुळे निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या रिअल इस्टेट विकासामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

मुंबई ते बेंगळुरू या 14-पदरी महामार्गाचा या क्षेत्रावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आर्थिक वाढ, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक फायदे मिळतील.

Comments (0)
Add Comment