गौरवशाली भारतीय कालगणना भाग – २
गेल्या आठवड्यात आपणा भाग १ प्रकाशित केला. भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
भाग – २ :-
कल्पांतील गतकालगणना –
सध्यां चालू असलेल्या कल्पातील संधीसहित सहा मनु गेले, आणि सातवा वैवस्वत मनु चालू आहे. त्या मनूंतीलही सत्तावीस महायुगेे गेली, व अठ्ठाविसाव्या महायुगांतील कलियुग सध्यां चालू आहे.
यावरून वरील रीतीप्रमाणें चालू असलेल्या कल्पाच्या प्रारंभीचा संधि, सहा मन्वंतरे, त्यांचे सहा संधि, सातव्या मन्वंतराचीं सत्तावीस महायकुगे व अठ्ठाविसाव्या महायुगाचीं कृत, त्रेता व द्वापर अशीं तीन युगें आतापर्यंत गेलीं. त्यांची एकंदर सौरवर्षे 1972944000 इतकीं होतात व यांत चालू कलियुगाची जितकी वर्षे गेलीं असतील तितकीं मिळविलीं, म्हणजे चालू कल्पारंभापासूनचा सध्यांचा काल समजेल.
कल्प-6 1) कूर्म 2) पार्थिव 3) सावित्र 4) प्रलय 5) श्वेतवराह 6) ब्राह्म
चौदा मनु वरील श्लोकात या कल्पांतील सहा मनु गेले असें म्हटलें आहे. त्यांसह एकंदर 14 मनूंची नांवें अशी-
1. स्वायंभुव 2. स्वारोचिष 3. उत्तम 4. तामस 5. रैवत 6. चाक्षुष 7. वैवस्वत 8. सावर्णि 9. दक्षसावर्णि 10. ब्रह्मसावर्णि 11. धर्मसावर्णि 12. रुद्रसावर्णि 13. रौच्यक 14. भौच्य
(यांपैकीं शेवटचीं दोन नांवे 13 देवसावर्णि व 14 इंद्रसावर्णि अशींही मानितात.)
संवत्सराचें नांव –
शालिवाहन शकाच्या संख्येंत 12 मिळवावे, व त्या बेरजेस 60 नीं भागावें. जी बाकी राहील त्या अंकाइतकें प्रभवापासून जें नांव येईल तें त्या शकाचें नांव होय. उदाहरणार्थ-शके 1875 यांत 12 मिळविले, तेव्हां बेरीज 1887 झाली. त्याला 60 नीं भागिलें तेव्हां बाकी 27 उरली.
प्रभवापासून 27 वा संवत्सर मविजयफ येतो. तेंच 1875 व्या शकवर्षाचें नांव होय.
त्याप्रमाणे विक्रमसंवत्संख्येंत 9 मिळवावे, व 60 नीं भागावें. जी बाकी राहील त्या अंकाइतकें प्रभवापासून जें नांव तें त्या विक्रमसंवताचें नांव होईल. उदाहरणार्थ-संवत् 2010 यांत 9 मिळविले तेव्हां बेरीज 2019 झाली. त्याला 60 नीं भागिलें तेव्हां बाकी 39 उरली. प्रभवापासून 39 व्या संवत्सराचें नांव मविश्वावसुफ आहे. तेंच 2010 व्या संवताचें नांव होईल.
संवत्सर चक्र –
साठ संवत्सराचे एक चक्र आहे. येथे संवत्सर हा शब्द एक वर्ष या अर्थाने वापरला आहे. हे लक्षात ठेवावे. या साठ संवत्सराची नावे पुढे दिली आहेत. एक साठ वर्षाचे चक्र संपले म्हणजे पुन्हा संवत्सराला पहिल्या नावावरून सुरूवात होते.
1 प्रभव 2 विभव 3 शुक्ल 4 प्रमादे 5 प्रजापति 6 अंगिरा 7 श्रीमुख 8 भाव 9 यवु 10 धातु 11 ईश्वर 12 बहुधान्य
अशुभ संवत्सरे –
13 प्रभावी 14 विक्रम 15 वषृ 16 चित्रभानु 17 सुभानु 18 तारण 19 पार्थिव 20 व्यय 21 सर्वजित् 22 सर्वधारी 23 विरोधी 24 विकृति 25 खर 26 नंदन 27 विजय 28 जय 29 मन्मथ 30 दुर्मुख 31 हेमलंब 32 विलंब 33 विश्वासासु 40 पराभव 41 प्लवंग 42 कीलक 43 सौम्य 44 साधारण 45 विरोधकृत 46 परिधावी 47 प्रभावी 48 आनंद 49 राक्षस 50 अनल 51 पिंगल 52 कालयक्त 53 सिद्धार्थी 54 रौद्र 55 दुर्मति 56 दुंदुभि 57 रुधिरोद्गारी 58 रक्ताक्षी 59 क्रोधन 60 क्षय साठ संवत्सरांपैकीं सामान्यत: भाव, धातृ, प्रमाथी, सुमानु, व्यय, विकृति, दुर्मुख, हेमलंबी, विलंबी, विकारी, प्लव, क्रोधी, विश्वावसु, पराभव, प्लवंग, कीलक, विरोधकृत्, परिधावी, प्रमादी, राक्षस, अनल, पिंगल, कालयुक्त, रौद्र, दुर्मती, रुधिरोद्रारी, रक्ताक्षी, क्रोधन, क्षय या संवत्सरांची फलें अशुभ असतात. बाकीच्या संवत्सरांचीं फलें शुभ समजावीं.
सहा ऋतु व बारा महिने –
धर्मशास्त्रांतील सर्व धार्मिक कृत्यें चांद्र ऋतूंना अनुसरून करावीं. ते चांद्र ऋतु असे दोन दोन महिन्यांनी होणारे आहेत.
1 चैत्र – वैशाख: वसंत ऋतु
2 ज्यष्ठे – आषाढ: ग्रीष्म ऋतु
3 श्रावण – भाद्रपद: वर्षा ऋतु
4 आश्विन – कार्तिक: शरद् ऋतु
5 मार्गशीर्ष – पौष: हेमंत ऋतु,
6 माघ – फाल्गुन: शिशिर ऋतु.
एका अमावस्येपासून दुसर्या अमावस्येपर्यंत एक चांद्र मास होतो. या चांद्र मासाचा सौर मासाशीं नेहमीं मेळ राहावा म्हणून चांद्र मासाचें नांव ठरविण्याची पद्धति अशी केेली आहे कीं –
चांद्रमासगणना मीन राशींत सूर्य असतांना ज्या चांद्रमासाचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणावें. मेष राशींत सूर्य असतांना ज्या चांद्रमासाचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणावें. याप्रमाणे अनुक्रमानें पुढील सूर्यराशींत पुढील चांद्रमासांचे आरंभ पाहून अनुक्रमाने नांवे द्यावी.
बारा राशी –
1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्या, 7 तुळ, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर, 11 कुंभ व 12 मीन अशा बारा राशींनी नक्षत्रचक्र पूर्ण होते.
दोन पक्ष –
चांद्रमासाचे दोन विभाग करतात, त्यांना पक्ष असें म्हणतात. शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष असे ते दोन पक्ष आहेत. शुक्लपक्षांतील प्रतिपदेच्या प्रारंभापासून पौर्णिमेच्या समाप्तीपर्यंत 15 तिथींचा शुक्लपक्ष व कृष्ण प्रतिपदेच्या प्रारंभापासून अमावस्या पूर्ण होईपर्यंत 15 तिथींचा कृष्णपक्ष, शुक्लपक्षांत देवकृत्ये करावीं. आणि कृष्णपक्षांत पितरसंबंधी कृत्यें करावीं, असा सामान्य नियम आहे.
वारवर्णन –
1 रविवार, 2 सोमवार, 3 मंगळवार, 4 बुधवार, 5 गुरुवार, 6 शुक्रवार आणि 7 शनिवार असे सात वार आहेत.
सूर्य एकदां पूर्वक्षितिजावर उगवल्यानंतर दैनंदिन गतीनें पश्चिमेकडे जाऊन पुन्हां पूर्वक्षितिजावर उगवेपर्यंत जो वेळ लागतो त्यालाफफ मवारफ असें म्हणतात. 1 शनि, 2 गुरु, 3 मंगळ, 4 रवि, 5 शुक्र, 6 बुध व 7 चंद्र या अनुक्रमानें कालहोर्यांचीं नांवें जाणावीं. आतां एकाद्या दिवशीं शनिवार आहे.
असें समजा. त्या शनिवारच्या 24 होर्यांना हीं सात नांवें अनुक्रमानें मोजलीं, म्हणजे त्यांत आठव्या होर्याला, 15 व्या होर्याला आणि 22 व्या होर्याला पुन:पुन्हां शनीचें नांव येईल. 23 व्याचें नांव गुरु, 24 व्याचें नांव मंगळ व अशा रीतीनें त्या वाराचे चोवीस होरे संपल्यानंतर पुढील
वाराच्या पहिल्या होर्याचें नांव वरील अनुक्रमानें रवीचेंच येतें. म्हणून शनिवाराच्या पुढचा रविवार सिद्ध झाला. रविवारचे 24 होरे रवीपासून
पुन:पुन्हां मोजले म्हणजे त्यांच्यानंतर चंद्राचाच होरा येतो. म्हणून रविवारच्या पुढें सोमवार.
जगभर सोमवार नंतर मंगळवारच का?
अत्यंत मंदगति ग्रह जो शनि, तो प्रथम लिहून त्यापुढें त्याहून जलद चालणारा गुरु, त्यापुढें गुरुहून जलद चालणारा मंगळ, अशा जलद गतिक्रमानें ग्रहांची नांवें लिहिलीं, म्हणजे शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध व चंद्र असा क्रम लागतो. वर जीं होर्यांचीं नांवें दिलीं आहेत, तीं हुबेहूब अशींच आहेत. यावरून होर्यांच्या नांवांची उपपत्ति ध्यानांत येते. या नांवांचा क्रम, पृथ्वी मध्य धरून सर्व ग्रह तिच्याभोंवतीं फिरतात या प्राचीन कल्पनेस अनुसरून आहे. सर्व पृथ्वीवर जेथें वार प्रचारांत आहेत, तेथें ज्या अर्थीं त्यांचा अनुक्रम एकसारखाच आहे, त्या अर्थीं या प्राचीन कल्पनेला निदान एवढ्यापुरती तरी मान्यता आधुनिक कालींही मिळते हें कमी आश्चर्य नव्हे!
साडेतीन मुहूर्त –
1 गुढीपाडवा संवत्सराचा आरंभदिवस 2 अक्षय तृतीया 3 विजयादशमी दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त व कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त हे साडेतीन स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत.
सन-संवत-शके संबध
इसवी सन – 78 = शालीवाहन शक
इसवी सन + 57 = विक्रम संवत् शालीवाहन शक + 135 = विक्रम संवत्
विक्रम संवत् – 135 = शालीवाहन शक
यगु ब्द – 3102 = इसवी सन
इसवी सन + 3102 = यगुब्द
यगुब्द – 3180 = शालीवाहन शक
शालीवाहन शक – 3180 = यगु
वर्षगाठ अथवा वाढदिवस
वाढदिवस हा पंचांगाच्या महिन्याप्रमाणे वा तिथीप्रमाणे घेतला तर त्या दिवशी बहुधा जन्म नक्षत्राची राशी येते. कित्येक वर्षांनी जन्मकालीन कुंडलीसारखे योग त्या दिवशी त्या जन्मवेळेला पुन्हा पुन्हा येतात. इंग्रजी तारखेने ते साधत नाही. म्हणून वाढदिवसाचे ग्रहनक्षत्राचे व जन्मराशीचे साम्य फक्त पंचांगातील मासतिथीनुसारच लाभते. दर 19 वर्षानंतर तर त्याच दिवशी तिच इंग्रजी तारीख, तोच मराठी मास, तिच तिथी, तेच जन्मनक्षत्र बरोबर येते. असे असतांना आपण इंग्रजी तारखांच्या मागे का लागावे?
तिथीवारांची एकसूत्रता तसेच आपले जवळील कोणच्याही वर्षाचे पंचांग काढा. त्यात तिथीवृद्धि आहे. तिथीक्षय आहे. या सर्व भानगडी आहेत. पण इतकेही असूनही ‘नाग फाग दिवाळी येती एकाच वारी’ हे सूत्र सापडते. याचा अर्थ असा की नाग म्हणजे नागदिवाळी (अथवा मार्गशीर्ष शुक्ल पंचमी) ही तिथी (फाग म्हणजे फाल्गुन) शुक्ल पौर्णिमा-होळी अथवा हुताशनी पौर्णिमा व दिवाळी म्हणजे अश्विन कृष्ण अमावस्या (अथवा पौर्णिमान्त मासगणनेप्रमाणे कार्तिक कृष्ण अमावस्या) हे तिन्ही दिवस. एकाच वाराला येतात. कोणच्याही वर्षाचे पंचांग काढा; त्यात पहा. म्हणजे हे तिन्हीहि दिवस एकाच वाराला आलेले सापडतील. कालगणनेचा हा चमत्कार पंचांगात पाहून, या पद्धतीची प्राचीन कालापासून चालत आलेली सुसूत्रता ध्यानात येते व या पद्धतीबद्दल मनांत आदर निर्माण होतो.
वार म्हणजे काय –
आपल्या पंचागाप्रमाणे वारांची व्याख्या “उदयात् उदयं वार” अशी आहे. म्हणजे, एका सूर्योदयापासून तो दुसर्या सूर्योदयापावेतो एक वार अशी आहे. इंग्रजी कालमापन पद्धतीत रात्री 12 वाजता तारीख व वार ही दोन्ही बदलतात. पंचांगात अथवा भारतीय कालमापन पद्धतीत वार मध्यरात्री बदलत नाही. तो सूर्योदयापासून बदलतो हे लक्षात ठेवावे.
वार सर्व जगभर सारखेच आहेत व ते एकच आहेत. भारतात वार केव्हापासून सुरू आहे हे निश्चित सांगण्याइतका पुरावा प्राचीन वाङ्मयात
उपलब्ध नाही, आढळत नाही. तथापि, वार हे शालिवाहन शक सुरू होण्यापूर्वी सुमारे एक हजार वर्षे अगोदर. म्हणजे आजपासून सुमारे तीन हजार वर्षापूर्वीपासून तरी प्रचारात आहेत.
कालगणना कोष्टक –
60 वर्षे (संवत्सरे) = 1 संवत्सरचक्र
360 संवत्सरे = 1 दिव्यवर्ष
1200 दिव्यवर्ष = 1 कलियुग
2400 दिव्यवर्ष = 1 द्वापारयुग
3600 दिव्यवर्ष = 1 त्रेतायुग
4800 दिव्यवर्ष = 1 कृतयुग
4 युगे = 1 महायुग
71 महायुगे = 1 मनु
14 मनु = 1 कल्प
त्याचप्रमाणे 60 वर्षे = 1 संवत्सरचक्र
72000 संवत्सरचक्र = 1 कलियुग
अथवा 6 शककर्ते = 1 कलियुग
4,32,000 वर्षे = 1 कलियुग
8,64,000 वर्षे = 1 द्वापारयुग
12,96,000 वर्षे = 1 त्रेतायुग
17,28,000 वर्षे = 1 सत्ययुग
4 युगे (10 अवतार) = 1 महायुग
360 युगे = 1 दिव्ययुग
71 महायुगे (71 इंद्र) = 1 मन्वंतर
14 मन्वंतरे अथवा = 1 कल्प
1000 महायुगे = (ब्रह्मदेवाचा 1 दिवस)
36000 कल्प = 1 ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य
1000 ब्रह्माची आयुष्ये = 1 विष्णूची घटका
1000 विष्णूच्या घटिका = 1 शिवनिमिष
1000 शिवनिमिष = 1 महामाया निमिष
ही भारतीय कालगणना पाहून मन थक्क होते. ( फोटो- गुगल साभार )
समाप्त.
अनिल सांबरे, नागपर.
मा. 9225210130