हिंदू नर हिंसाचार आणि युनूस खान.

बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याक छात्रसंघटन ऐक्य परिषद हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषद यांच्या मते 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान फक्त तीन दिवसांत हिंदूंवर २०० हल्ले झाल्याची अधिकृत माहिती असून यामध्ये पाच हिंदूंची हत्या झाली आणि अनेक जण गंभीर जखमी झाले.

हे फक्त नोंदवले गेलेले प्रकार आहेत. परिषद नेत्यांच्या मते, अनेक घटनांची नोंदच झाली नाही.

ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल बांगलादेशच्या अहवालानुसार, ५ ते २० ऑगस्टदरम्यान हिंदूंवरील २,०१० हल्ल्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये नऊ हिंदूंची हत्या झाली आहे.

हिंदू आणि त्यांच्या मालकीच्या घरांवर, व्यावसायिक प्रतिष्ठानांवर, शेतजमिनींवर तसेच अनेक मंदिरांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांव्यतिरिक्त, देशभरात सुमारे ५०० हिंदू पोलिस अधिकारी, शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मुस्लिमांकडून राजीनामा देण्यास भाग पाडले गेले.

  1. ५ ऑगस्टच्या रात्री जेशोर शहरातील बेजपारा येथे मुस्लिम जमावांनी २०० हिंदू कुटुंबांवर हल्ला केला. यामध्ये सुमारे डझनभर हिंदू गंभीर जखमी झाले, तर शंभराहून अधिक घरे लुटली आणि उद्ध्वस्त करण्यात आली. बरिशाल विभागातील पटुआखाली येथील कुआकाटा नगरपालिकेच्या युनिटचे संयुक्त सरचिटणीस अनंता मुखर्जी यांच्यावर ५ ऑगस्ट रोजी मुस्लिम जमावांनी हल्ला केला आणि त्यांचे घर जाळून टाकले. त्यांच्या घराजवळील मंदिरही उद्ध्वस्त करण्यात आले.
  2. ढाका येथील उच्चभ्रू धनमंडी भागात प्रसिद्ध लोकसंगीतकार राहुल आनंद यांच्या घरी मुस्लिम जमावांनी हल्ला केला व त्यांचे घर उद्ध्वस्त केले. आनंद आणि त्यांच्या कुटुंबाने थोडक्यात बचाव केला, पण त्यांच्या घरातील ३,००० हून अधिक हाताने बनवलेली आणि दुर्मिळ वाद्ये नष्ट करण्यात आली, कारण इस्लाममध्ये संगीत हराम मानले जाते.
  3. ६ ऑगस्ट रोजी जेशोर शहरातील विविध भागांतील ५० हिंदूंच्या घरांवर हल्ले करून लूटमार करण्यात आली. खुलना विभागातील भारत-बांगलादेश सीमेपासून जवळ असलेल्या मेहेरपूर शहरात मुस्लिम जमावांनी नऊ हिंदू घरांवर हल्ला करून ती लुटली आणि जाळून टाकली. दोन हिंदू मंदिरेही अपवित्र करण्यात आली.
  4. नारकेलबारीया बाजार, जेशोर जिल्ह्यातील एका छोट्या व्यावसायिक शहरात, २५ हिंदूंच्या दुकानांवर जमावांनी हल्ला केला, ती लुटली आणि काही दुकानांना आग लावली.
  5. ६ ऑगस्ट रोजी नारकेलबारीया युनियन परिषदेचे अध्यक्ष बबलू कुमार साहा यांच्या घरावर हल्ला करण्यात आला, घराची लूट करण्यात आली आणि त्यांच्या घरातील देवस्थान अपवित्र करण्यात आले.त्याच दिवशी नारकेलबारीया गावात मुस्लिम जमावाने लाठ्या-काठ्यांनी हिंदू लिटन कुंडू यांच्या घरावर हल्ला केला आणि लूट केली.
  6. मायमनसिंग जिल्ह्यातील डबुआरा उपजिल्ह्यात ६ ऑगस्ट रोजी बीएनपी नेते कबिरुल इस्लाम यांनी हिंदूंच्या सहा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर बळजबरीने कब्जा केला. नोआखली जिल्ह्यातील हातिया उपजिल्ह्यात ६ ऑगस्ट रोजी मुस्लिम जमावांनी हिंदूंच्या तीन घरांवर व चार व्यावसायिक प्रतिष्ठानांवर हल्ला करून जाळले.
  7. चितगाव विभागातील चांदपूर जिल्ह्यात मुस्लिम जमावांनी डझनभराहून अधिक हिंदूंच्या घरांवर हल्ला केला, ती लुटली व जाळून टाकली. यातील दोन घरे प्रसिद्ध शाळांचे प्राचार्य असलेल्या हिंदूंची होती.
  8. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी जेशोर जिल्ह्यातील ढालग्राम युनियन परिषदेतील पाच गावांमधील २५ हिंदूंच्या घरांवर अनेक वेळा हल्ले करण्यात आले आणि लूटमार करण्यात आली.
  9. ६ ते ८ ऑगस्टदरम्यान जेशोर जिल्ह्यातील मणिरामपूर उपजिल्ह्यातील नातूमग्राम, सुलताननगर, अमरझुटा, खटुआडांगा बाजार आणि अभयनगर उपजिल्ह्यातील काही गावांमध्येही हल्ले झाले.
  10. राजशाही विभागातील नाओगाव शहरात ५ आणि ६ ऑगस्ट रोजी हिंदूंच्या किमान दोन डझन घरांवर व २० व्यावसायिक प्रतिष्ठानांवर हल्ले करण्यात आले व त्यांची लूट करण्यात आली.

५ ऑगस्ट आणि त्यानंतरच्या काही दिवसांत हल्ले अधिक तीव्र झाले. ८ ऑगस्ट रोजी मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाची शपथ घेतल्यावर हे हल्ले अत्युच्च पातळीवर पोहोचले. युनूस यांनी इस्लामिस्ट लोकांना मोकळीक दिली. अनेक दहशतवादी आरोपींना तुरुंगातून मुक्त केले आणि हिंदुविरोधी इस्लामिक संघटनांच्या नेत्यांशी बैठक घेतली. त्यानंतर देशभर हिंदूंवर हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

युनूस यांच्या सत्तेत आल्यानंतर हिंदू आणि त्यांच्या मंदिरांवर झालेल्या महत्त्वाच्या हल्ल्यांची खालील यादी आहे:

  1. ९ ऑगस्ट: मुस्लीम जमावाने खुलना विभागातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिरावर हल्ला केला व मंदिराची विटंबना केली. मंदिर जाळण्यात आले, तसेच तेथे उपस्थित भिक्षू व भक्तांवर हल्ला करण्यात आला.
  2. ८ ते १५ ऑगस्ट: खुलना विभागातील कोयरा उपजिल्ह्यात हिंदूंच्या डझनभर घरांवर हल्ला झाला व ती उद्ध्वस्त करण्यात आली. सुमारे सहा हिंदू महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले.
  3. १४ ऑगस्ट: खुलनातील नामवंत हिंदू व्यापारी शिवपद मंडल यांच्या घरावर आणि व्यवसायावर हल्ला करून तो लुटण्यात आला व उद्ध्वस्त करण्यात आला.
  4. १२ ऑगस्ट रोजी मयमनसिंह जिल्ह्यात नेत्रकोना उपजिल्ह्यात दीपककुमार साहा नावाच्या समृद्ध शेतकऱ्याच्या घरावर मुस्लीम जमावाने मध्यरात्री हल्ला केला. त्यांच्या पशुपालन व्यवसायाला आग लावून नऊ गायी, सहा शेळ्या, कोंबड्या व बदक जाळून टाकले. सुमारे १६ लाख बांगलादेशी टाकांचे नुकसान झाले.
  5. २४ ऑगस्ट रोजी राजेशाहीच्या बाघा येथील तीन मंदिरांवर हल्ला झाला आणि तोडफोड केली गेली. त्याचदिवशी पाकुरिया पळपारा आणि घोशपारा तसेच बाघा नगरपालिका येथील दोन अन्य मंदिरांवरही तोडफोड केली गेली. एका मदरसा विद्यार्थी, बप्पी होसैन, रंगेहाथ पकडला गेला, परंतु पोलिसांनी त्याला सोडून दिले. पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही.
  6. 30 ऑगस्ट रोजी, गाझीपूर जिल्ह्यातील कालियाकैर उपजिल्ह्यात, एका जुन्या राधा गोबिंद लोकनाथ नटमंदिराचा नाश करण्याचा प्रयत्न बीएनपी नेते लेबू मियाँ यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम जमावाने केला. त्यांनी मंदिरालगतच्या हिंदू कुटुंब यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला. हिंदूंनी प्रतिकार केल्याने, एक डझनहून अधिक हिंदू गंभीर जखमी झाले.
  7. १ सप्टेंबरच्या रात्री, शेरपूर जिल्ह्यातील श्रीबर्दी उपजिल्ह्यातील वायडांगा बाजारातील काली मंदिरावर मुस्लिम जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली.
  8. ४ सप्टेंबर रोजी इस्लामवाद्यांनी रांगपूर विभागातील कुरिग्राम येथील एका हिंदू मुलीचे अपहरण केले. तिचे बळजबरी धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुद्धा या दरम्यान झाला. संध्याकाळी १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. अलिनूर रहमान प्रमुख आरोपी असूनही त्याच्यावर अजून पर्यंत कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नाही.
  9. ५ सप्टेंबर: खुलनातील उत्सव मंडल नावाच्या हिंदू तरुणावर Radical muslim जमावाने खोट्या blasphemy आरोपावरून गंभीर हल्ला केला. भयानक बाब म्हणजे पोलिस ठाण्यातही त्याला मारहाण करण्यात आली.
  10. ९ सप्टेंबर रोजी पबना जिल्ह्यातील पश्चिमपारा चाटमोहार उप-जिल्ह्यात भाध्र कालिमाता मंदिरातील मूर्तिंवर मुस्लिमांनी तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आणि तांब्याच्या व पीतधातूच्या वस्तू चोरल्या. पोलिसांनी तक्रार नोंदवायला नकार दिला.
  11. 12 सप्टेंबर रोजी, ढाका विभागातील किशोरगंज शहरातील बत्तीस भागातील श्री श्री गोपीनाथ जिउ आखरा मंदिरावर हल्ला करून देवी दुर्गेच्या सात मूर्तींची तोडफोड करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचे हंगामी सरकार मोहम्मद युनूस यांना हिंदूंची सुरक्षा निश्चित करण्याची विनंती केली होती, त्यानंतर अंतरिम सरकारने तुघलकी फर्मान जारी करून हिंदू समुदायाला दुर्गा पूजेवरती निर्बंध घातले व दुर्गा संबंधित विधी अजान आणि नमाज दरम्यान संगीत वाजवणे बंद करण्याचे आदेश जरी केले.

१५ सप्टेंबर रोजी धाका विभागातील फरीदपूर जिल्ह्यातील हरि मंदिरात तयार होणाऱ्या नऊ दुर्गा मूर्तींना स्थानिक मुस्लिमांनी नष्ट केले.

इस्लामवादी गटांनी खुलनाच्या दाकोप उप-जिल्ह्यातील सहा मंदिरे आणि दुर्गा पूजा उत्सव समित्यांना दुर्गा पूजा आयोजित करण्याच्या परवानगीच्या बदल्यात 5 लाख बांगलादेश टका ‘कर’ मागितला. बांगलादेशमधील स्थिती बघता, अनेक पूजा समित्यांनी यंदा दुर्गापूजेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला.

बांगलादेशमध्ये यावर्षी ३२ हजार ६६६ पूजा मंडप उभारण्यात येणार असून यामध्ये ढाका साऊथ सिटीमध्ये १५७ आणि नॉर्थ सिटी कॉर्पोरेशनमध्ये ८८ मंडपांचा समावेश आहे. गेल्यावर्षी ही संख्या ३३ हजार ४३१ होती मात्र यंदा ही संख्या कमी झाली. साहजिकच यावेळी ही कपात तेथे राहणाऱ्या हिंदूंच्या स्थितीमुळे झाली.

  1. २१ सप्टेंबर रोजी लखनपूर (चितगाव) येथे दुर्गा मूर्तींचे नुकसान व पूजा मंडपातील दानपेटी लुटण्यात आली.
  2. २६ सप्टेंबर रोजी मयमनसिंह येथील गोविंदाजी मंदिराची तोडफोड व विटंबना करण्यात आली.
  3. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी पबना जिल्ह्यातील सुजनागर नगरपालिका येथील रिषीपारा बरोवारी पूजा मंडप आणि निशीपारा पूजा मंडप येथे देवी दुर्गेच्या मूर्तिंवर तोडफोड केली गेली.
  4. 8 ऑक्टोबर रोजी ढाका विभागातील राजबारी येथे दुर्गा पूजेच्या पांडालात तयार केल्या जाणाऱ्या देवी दुर्गे आणि त्यांच्या मुलांच्या मूर्तींची (गणेश, कार्तिक, लक्ष्मी, सरस्वती) मुस्लिमांनी तोडफोड केली. परंतु, पोलिसांनी या घटनेचा दोष एका हिंदू व्यक्तीवर लावला.
  5. 4 ऑक्टोबर रोजी, बरीशाल जिल्ह्यातील बकर्जान येथील देउरी बारी सार्वजनिक दुर्गा मंदिरात मूर्तींची तोडफोड झाली. स्थानिक मौलवींनी यापूर्वीच दुर्गा पूजेवर फतवा जारी केला होता.
  6. १० ऑक्टोबर रोजी बारीशाल येथील उजिरपूर येथे मुस्लिमांच्या एका गटाने ताकाबारी सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपात घुसून कुराण पठण सुरू केले. जेव्हा हिंदू भक्तांनी विरोध केला आणि मुस्लिमांना बाहेर काढले, परंतु पोलिसांनी काही हिंदू पुरुषांना इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांवर अटक केली.
  7. 11 ऑक्टोबर रोजी ढाक्याच्या तांतीबाजार येथील चार दुर्गा पूजा पांडालांवर मुस्लिमांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी पांडालांवर फायर बॉम्ब फेकले आणि काही हिंदूंना मारले. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची ओळख पटवूनही, पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही.
  8. 14 ऑक्टोबर रोजी, ओल्ड ढाका भागातील दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर मुस्लिमांनी दगडफेक केली. यात अनेक हिंदू जखमी झाले. पोलिसांनी गुन्हेगारांना संरक्षण दिले. मादारीपूर जिल्ह्यातील कलकिनी येथे, काली पूजेच्या निमित्ताने होणाऱ्या शंभर वर्ष जुन्या कुंडुबारी मेळ्याला यावर्षी स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली. कट्टर मुस्लिम मौलवींच्या हरकतीनंतर प्रशासनाने हिंदू सणांवर निर्बंध लादले.

इस्लामी कट्टरवाद्यांनी श्यामनगर (सतखीरा) येथील जशोरेश्वरी काली मंदिरावरती हल्ला करून सोन्याचा मुकुट चोरीला केला व मंदिराची विटंबना करण्यात आली. हा मुकुट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिला होता.

बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून काली मातेचा सोन्याचा मुकुट गेला चोरीला, पंतप्रधान मोदींनी केला होता अर्पण

  1. १२ ऑक्टोबर रोजी ६५ वर्षीय पत्रकार स्वप्न कुमार भद्र यांची तनपारा (मयमनसिंह) येथे हत्या करण्यात आली.
  2. २५ ऑक्टोबर रोजी गाईबांधा जिल्ह्यात मजिपारा येथील मंदिरातील सदस्य श्रीधाम चंद्र यांची मुस्लीम गटाने हत्या केली.
  3. ८ नोव्हेंबर रोजी चापैन्बागंज शहरातील शिबतला कर्मकारपारा येथील चारजोत प्रोटप दुर्गा माता ठाकुरानी मंदिरावर मुस्लिमांनी लाठ्या घेऊन हल्ला केला आणि तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेजमधून ते ओळखले गेले, तरी पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली नाही.
  4. ११ नोव्हेंबर रोजी राजशाहीतील बॅल्लवपूर क्षेत्रातील एक मंदिर मुस्लिम जमावाने काही मुस्लिम मौलवींनी नेतृत्व करत तोडफोड केली. मुस्लिम जमावाचा दावा होता की हा हल्ला हिंदू तरुणाने पैगंबर मोहम्मदवर अपशब्द बोलणाऱ्या सोशल मीडिया पोस्टच्या प्रतिक्रीया स्वरूपात केला. तथापि, पुढील तपासांनुसार असे कोणतेही पोस्ट आढळले नाहीत, तरीही पोलिसांनी हल्ल्यात सामील असलेल्या मुस्लिम मौलवींवर आणि इतरांवर कोणतीही कारवाई केली नाही.
  5. १५ नोव्हेंबर रोजी जमालपूर (मयमनसिंह) येथील मंदिरातील सहा मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
  6. 17 नोव्हेंबर रोजी ढाका विभागातील किशोरगंज जिल्ह्यातील करिमगंज येथे एका मुस्लिम मुलीशी संबंध असल्याच्या संशयावरून मुस्लिम जमावाने एका हिंदू तरुणाला मारहाण केली. हे सर्व बंगाल देशाच्या सैन्याच्या उपस्थितीत घडले, पण सैनिकांनी हस्तक्षेप केला नाही. त्याच दिवशी त्या तरुणाचा मृत्यू झाला.
  7. १९ नोव्हेंबर रोजी, सुनामगंज जिल्ह्यातील धर्मपाशा उपजिल्ह्यात एका हिंदू शालेय शिक्षकावर मुस्लिमांनी हल्ला केला. त्यांना इस्लामचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. शिक्षकाविरुद्ध कोणतीही पुरावा नसताना, पोलिसांनी त्याला अटक केली आणि तुरुंगात पाठवले.

सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी, बांगलादेश पोलिसांनी हिंदू नेते आणि इस्कॉन संन्यासी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अटक केली. दास हे बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रमुख नेते आहेत आणि मुस्लिमबहुल देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आवाज उठवणारे सर्वात प्रमुख नेते आहेत. ही अटक रांगपूर येथील हिंदू समुदायाच्या आंदोलनानंतर झाली आहे. जे ढाकाच्या सुमारे ३०० किमी उत्तरे स्थित आहे. या आंदोलनात हिंदू समुदायाने मजबूत कायदेशीर सुरक्षा आणि अल्पसंख्याकांसाठी एक विशेष मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली होती. २६ नोव्हेंबर इस्कॉन संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांची अटक केल्यानंतर झालेल्या इस्लामिक जिहाद्यांनी त्यांच्या वकिलाची हत्या केली.

28 नोव्हेंबर रोजी पाटिया उपजिल्ह्यातील मुकुंद दत्ता धाम मंदिरावर हल्ला करून त्याची तोडफोड करण्यात आली. त्याच रात्री, चटगाव न्यायालय परिसरातील हिंदू दलित वसाहतीला आग लावण्यात आली. यामध्ये 20 हून अधिक घरे जळून खाक झाली. आजही हे दलित बेघर आहेत, आणि प्रशासनाने त्यांना कोणतीही मदत केलेली नाही.

29 नोव्हेंबर रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम जमावाने चटगावमधील अनेक मंदिरांवर हल्ला केला. संतानेश्वरी मातृ मंदिर, शनी मंदिर, आणि रक्षा काली मंदिर यांचा समावेश असलेल्या प्रमुख मंदिरांची विटंबना करून तोडफोड करण्यात आली.धाका विभागातील भैरब येथील श्री श्री हरे कृष्णा नमहट्टा संगा मंदिरावर २९ नोव्हेंबर रोजी मुस्लिम जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली. पोलिसांनी केसमध्ये तक्रार नोंदवायलादेखील नकार दिला. (फोटो गुगल साभार.)

आंतरराष्ट्रीय राजकारणभारत सरकार - विदेश मंत्रालयभारत-बांग्लादेश.
Comments (0)
Add Comment