इंक्रेडीबल ज्यू
मार्क्स ,आईन्स्टाईन आणि फ्राईड हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज शास्त्रज्ञ!
एकदा असे वाचनात आले की “मानसशास्त्रत सिग्मंड फरॉइड भौतिकशास्त्रात आईन्स्टाईनआणि अर्थशास्त्रात कार्ल मार्क्स यांना तुम्ही पाठिंबा द्या किंवा विरोध करा ,पण त्यांना विचारात घेतल्या शिवाय तुम्ही त्या त्या क्षेत्रात पुढे जाऊच शकत नाही !!!…..या तिघांमध्ये एक साम्य म्हणजे ते तिघेही अत्यंत हुशार व ज्यू होते !!!
या ज्यून बद्दल माझ्या मनात एक उत्सुकता, आकर्षण नेहमी असे!
जेरुसलेम नावाच्या भूप्रदेशात त्यांचे पुरातन काळापासून वास्तव्य होते.येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर ख्रिस्त धर्माचा उदय झाला .येशू ख्रिस्त यांच्या शेवटच्या कालावधीत जेव्हा त्यांनी तेरा लोकांसोबत जेवण घेतले ,तेव्हा त्यांच्यावर विषप्रयोग झाला .विषप्रयोग हा ज्युनी केला असावा असे समजून येशूच्या पाठीराख्यांनी त्यांचा छळ केला. त्यानंतर काही ज्यू जगभरात स्थलांतरित झाले.
तसेच इसवी सन सातव्या शतकात उदयास आलेल्या मुस्लिम धर्मियांच्या त्रासामुळे देखील त्यांना जगभरात शरणागत सारखे फिरावे लागले. मूलतः जेरुसलेम येथील जुने प्रार्थना मंदिर हे ज्यू धर्मीयांचे !येशू ख्रिस्त नंतर ख्रिश्चनांना देखील ही भूमी आपली वाटू लागली .त्या भूमी जवळ मक्का मदिना असल्यामुळे मुस्लिमांना देखील ही भूमी पवित्र वाटू लागली. व या धर्म संघर्षात ज्युंचे अतोनात हाल झाले व त्यांनी स्थलांतर केले .
जगभरात कोठेही असले तरी त्यांची निष्ठा जेरुसलेम येथील आता उध्वस्त झालेल्या त्यांच्या प्रार्थना मंदिराच्या भिंती जवळ होती !त्या भिंतीला उद्देशून जगभरात कुठेही असले तरी प्रार्थना करत! व आपल्या या जागी परत जायचेच असे स्वप्न उराशी बाळगत. !!तेव्हा त्या प्रदेशाला इस्रायलचे नाव नव्हते. इस्राएल देशाची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याने १९४८साली झाली व जगभरात विखुरलेले ज्यू ना आपला देश मिळाला!
परंतु त्यापूर्वी त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या .स्थलांतरित म्हणून पोहोचलेले ते इंग्लंड ,जर्मनीमध्ये तथा युरोपात सर्वत्र पसरले. हे मूलतः हुशार ,काटक ,चिवट व संघर्षशील होते तसेच सुशिक्षित बुद्धिमान व आर्थिक साक्षर होते. त्यांनी लगेच इंग्रजांच्या व्यापारात सत्ता काबीज केली परंतु हे सामान्य इंग्लंड वासियांना मानवले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या लोकांच्या मनात सतत आकस होता. शेक्सपियरच्या “द मर्चंट ऑफ वेनिस ‘मधला खलनायक जु होता .म्हणजे चौदाव्या-पंधराव्या शतकापासूनच त्यांनी इंग्रजांची अर्थव्यवस्था काबीज केली होती.
असेच जू जर्मनीत ही पसरले आणि म्हणून सर्वसामान्यांच्या मनात ज्यू बद्दल द्वेष निर्माण करण्यात हिटलर यशस्वी ठरला. महत्त्वाचे कारण वंशभेद हे तर होतेच .त्यामुळे त्या दरम्यान त्यांना खूप हालअपेष्टांना सामोरे जावे लागले .छळ छावण्यात तर त्यांच्या भोगाना तर सीमाच नवती!आईन्स्टाईन सारखे शास्त्रज्ञ अमेरिकेला गेले. नील्स बोर आणि लिज माईएटान र तेथे एकत्र संशोधन करीत होते. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.परंतु,संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारून देणाऱ्या श्रीमंत बापाच्या मुलीशी भोर ने लग्न केले आणि ती एकटी पडली. परंतु तिने अविरत अविरत संशोधनही सुरू ठेवले .तिचे आण्विक संशोधनात महत्वाचे योगदान आहे. नाझी अत्याचातरच तर तिचा मृत्यू झाला परंतु तिने देश सोडून गेली नाही.
दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यूंना आपला देश इस्रायल मिळाला. तेथील जगभरात पसरलेले इच्छुक गेले आणि त्यांनी आपले राष्ट्र निर्माण केले .एक राष्ट्र सिद्धांतानुसार त्यांचे राष्ट्र फार पूर्वीपासूनच त्यांच्या मनात होते! त्या भूप्रदेश याविषयी निष्ठा होती!! फक्त त्यांना प्रदेश ताब्यात मिळाला !!!! आणि अजूनही त्यांचा संघर्ष थांबलेला नाही.!!!
आजूबाजूला असलेले तेरा अरब देश, पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सतत होणाऱ्या लढाया , त्यामुळे सर्वसामान्य ज्यू ला ,इथल्या प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण दिलं जातं व लष्करात सेवा देणे बंधनकारक असतं. संसाधनांचा अभाव परंतु केवळ इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी आपले राष्ट्र उभारले !वाळवंटात देखील त्यांनी शेतीचे विविध प्रयोग केले .ठिबक सिंचन तुषार सिंचन आपल्याला
मिळालेली त्यांच्याकडून मिळालेली देण आहे !
1901 पासून सुरू झालेल्या नोबेल पारितोषिक विजेते यांमध्ये ज्यूनी टकावलेल्या पारितोषिकांची संख्या ही सर्वाधिक आहे .याचा विचार केल्यावर मनात आले काय असेल बरे एवढे त्यांच्यातv?? सतत संघर्ष करत राहिल्यामुळे, शरणार्थी जीवन जगत राहिल्यामुळे ,जीवना प्रति असलेली चिकाटी, जगण्याची जिद्द, मेहनत आणि जन्मजात असलेली उत्तम शरीरयष्टी आणि उत्तम बुद्धी !!!
सर्वसाधारण ज्यू स्त्री देखील, कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले असले ,तरी गर्भधारणा झाल्यानंतर गणिताचा अभ्यास करू लागते व गर्भसंस्कार म्हणून मुलांना पण तसेच संस्कार देण्याचा प्रयत्न करते. जागरूकपणे बदाम खाणे ,गणित शिकणे, मेहनत करणे ,नवीन नवीन कला आत्मसात करणे या गोष्टी ती मुद्दाम करते
जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादी मध्ये ज्यू हे पहिल्या पाचशे पैकी शंभर असतात .! तर पहिल्या ५० पैकी १० हे ज्यू असतात..!! आतापर्यंत ९०० लोकांना नोबेल मिळाले, त्यातील २० टक्के लोक ज्यू होते !,आणि लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येच्या ०.२ टक्के आहे. !!
अशाप्रकारे सर्व क्षेत्रात पुढारलेल्या राष्ट्राभिमानी, बुद्धिमान ,अशा ज्यूंना माझा सलाम !!!