ITCM

Indigenous Technology Cruise Missile.

DRDO ने ओरिसाच्या किनारपट्टीवर, काही वेळापूर्वी ‘ITCM’ (Indigenous Technology Cruise Missile) म्हणजे….. स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ ची यशस्वी चाचणी घेेतली आहे आणि तीही आपले स्वदेशी माणिक इंजिन वापरून. आपल्या शास्त्रज्ञांचे हे मोठे यश आहे.

या क्षेपणास्त्रात प्रगत ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान’ बसवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वदेशी माणिक इंजिनची चाचणी अयशस्वी ठरली होती. माणिक, ज्याला शॉर्ट टर्बोफॅन इंजिन “STFE” म्हणूनही ओळखले जाते, ते गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने विकसित केले आहे. आणि ते 400 किलो-फोर्स थ्रस्ट क्लासमध्ये आहे! “IIT चेन्नई आणि IIT Bombay” मधील सेंटर फॉर प्रोपल्शन टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने हे इंजिन विकसित करण्यात आले आहे. या निर्भय क्षेपणास्त्राचा वेग ०.7 ते ०.9 मॅच (mach) आहे. म्हणजे ते ताशी 1111 किमी पेक्षा जास्त वेगाने आकाशातील अंतर कापू शकते. हे शत्रूच्या रडारला टाळण्यासही सक्षम आहे. निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र 1500 किमी अंतरापर्यंत 300 किलो वारहेड वाहून नेऊ शकते.

स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बनवलेले क्रूझ क्षेपणास्त्र ‘ITCM निर्भय’ आणि स्वदेशी बनावटीच्या आपण विकसित केलेल्या ‘माणिक’ स्मॉल टर्बोफॅन इंजिनची चाचणी  ओडिशाच्या किनारपट्टीवर घेण्यात आली.

 

फोटो गुगल साभार.

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment