बॅ.जिनावर टीका करण्याची हिम्मत का दाखवीत नाही ?

बॅ.जिनावर टीका करण्याची हिम्मत का दाखवीत नाही ?

देशात आज हिंदुत्व विचार प्रभावी ठरला असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या हिंदुत्व विरोधकांनी हिंदू विरोधी प्रपोगंडा
करण्यास सुरू केलेला आहे हिंदू समाजाचा हिंदुत्व आणि हिंदुधर्मावरील, संस्कृतीवरील विश्वास, श्रद्धा,आस्था समाप्त
करण्यासाठी तसेच हिंदू आदर्शचा तेजोभंग करण्यासाठी हिंदुत्व विरोधी एजेंडा प्रभावी केला जात आहे त्यासाठी हिंदू
संत,वारकरी, कीर्तनकार, हिंदुत्वाचा विचार मांडणारे लेखक स्वतंत्र चळवळीतील राष्ट्रपुरुष आणि आजचे राजकीय नेते
यांना बदनाम करण्याचा प्रपोगंडा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे इंदोरीकर महाराज,वक्ते महाराज यांना वेठीस धरणे
,भंडारा येथील किर्तनकाराने महिला पळवून नेल्याची अफवा पसरवून ह.भ.पा. दिनेश महाराज मोहूतुरे यांची बदनामी
करून वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याच षढयंत्र आणि स्वातंत्रवीर सावरकरवर गलिच्छ लिखाण करून बदनामी केली
जात आहे तसेच कांग्रेस शासन असलेल्या राज्यामध्ये त्यांचे फोटो काढण्याने फर्मान सुद्धा काढले गेले आहे
स्वातंत्र्य चळवळीतील धगधगते यज्ञकुंड असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून देशात
बदनामी केले जात आहे त्यांना चेष्टेचा विषय ठरविले जात आहे आज तर कोणताही सोम्या–गोम्या उठतो आपली
जीभ उचलून टाळूला लावत सावरकर यांच्यावर नको ती भाषा वापरुन बदनामी करत आहे रसातळाला गेलेल्या
कांग्रेस नेते राहुलगांधी,पासून मणिशंकर अय्यर पर्यंतच्या नेत्यांनी तसेच गल्लीबोळातील बोलघेवड्यांच्या पैदासीने
टीकेच्या सर्वमर्यादा ओलांडून वादग्रस्त बदनामी सुरूच ठेवली आहे कांग्रेसच मुखपत्र असलेल्या जनमाणसाची
शिदोरी नियतकालिकमध्ये वीर सावरकर यांची गलीच्छ भाषेत बदनामी केली आहे कांग्रेस नेते डॉक्टर रत्नाकर
महाजन संपादक असलेल्या शिदोरी च्या फेब्रुवारी अंकामध्ये "स्वातंत्रवीर की माफीवीर आणि अंधारातील
सावरकर " असे दोन लेख प्रकाशित करून सावरकरांची बदनामी केली आहे सदर लेख अत्यंत निंदनीय प्रकार
म्हणावा लागेल जगात राष्ट्रासाठी संघर्ष करणाऱ्या राष्ट्रभक्ताची एवढी अवहेलना कुठेच झाली नसावी एवढी
अवहेलना आपल्या देशात केवळ मताच्या जोगव्यासाठी आपलेच माणस करीत आहेत राष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे
लागेल त्यामुळे समाजात प्रचंड उद्रेक सुद्धा निर्माण झाला आहे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया सुद्धा
उमटत आहेत सावरकरावर टीका,बदनामी करणारे देशाची फाळणी करणाऱ्या आणि डायरेक्ट एकशन ची कारवाई करून
हजारो हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या बॅरिस्टर जिना विषयी का बोलत नाहीत ? त्याचे फोटो काढण्याचे फर्मान काढून भाष्य
करण्यास फाटते काय असा प्रश्न सामान्य माणसात चर्चिला जात आहे.
देशात रसातळाला गेलेल्या कांग्रेस कडून स्वातंत्रवीर सावरकर यांची बदनामी सुरू आहे पण जनतेच्या मनात त्यांचे
स्थान फार मोठे असून ते अबाधित राहणार आहे त्यामुळे समाजावर अशा बोलघेवड्याच्या वक्तव्याचा किवा
गलीच्छ लिखाणाचा काहीच प्रभाव पडणार नाही हे सत्य आहे पण जो शिमगा सुरू तो नक्कीच बरोबर नाही
तसेच सावरकरावर टीका करणारे हेच टीकाकार अखंड भारताचे भारतमातेचे तुकडे करणाऱ्या बॅरिस्टर जिनावर
टीका का करीत नाहीत जिनांच्या डायरेक्ट ऐकाशन विषयी का बोलत नाही याचा विचार करण्याची वेळ आलेली
आहे पाकिस्तान मागणीसाठी जिना यांनी डायरेक्ट ऐकशनची घोषणा करून १६ ऑगस्ट १९४६ मध्ये बंगालमध्ये
प्रचंड रक्तपात घडवून आणला होता त्याच्या चिथावणी मुळे नौखाली ,कलकत्त्याला हजारो निपराध हिंदूंची कत्तल
झालेली आहे परंतु कांग्रेस जिनाच्या कृत्यावर भाष्य करीत नाही तसेच देशातील काही विद्यापीठामध्ये असलेल्या
फोटोवर कधीच आक्षेप सुद्धा घेतला नाही पण हीच कांग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करून त्यांचे फोटो
काढण्याचे फर्मान काढते हे कितपत योग्य आहे ? याचा विचार करून कांग्रेसचे मुस्लिम तृष्टीकरणाच षड्यंत्र ओळखण्याची
आवश्यकता आहे.

अशोक राणे , अकोला

भ्र.९४२३६५८३८५

अशोक राणे

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Comments (0)
Add Comment