कोरोना संकट व नव्या वाटा.

संपादकीय

ध्या संपूर्ण  जगात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातले आहे. जगातील  जवळपास १८० चे आसपास देश या संकटामुळे ग्रासले आहेत. या महामारीने आज जगासमोर असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत. आपण या संकटातून जेव्हा बाहेर पडू तेव्हा संपूर्ण जग निश्चितच बदललेले असेल, प्रत्तेक देशाच्या गरजा आणि त्या गराजांचा क्रम सुद्धा बदललेला असेल, अनेक देशाची अर्थव्यवस्था नाजुक होतील तर अनेक देशांच्या आपल्या धोरणात सुद्धा आमुलाग्र बदल करावे लागतील. सामान्य व्यक्तीचे, कुटुंबांचे जीवन सुद्धा बदललेले असेल. उद्योगाच्या परिभाषा आणि पद्धतीसुद्धा बदललेल्या असतील.
गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक महासत्ता होण्यासाठी चीन ची धडपड लपलेली नाही. इतर देशांत कुरापती काढून आपापसाला गुंतून ठेवणे ही चीन ची जुनी सवय आहे. स्वत:चा महासत्तेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी चीन हा पाकिस्तान, मालदिव, बागलादेश अशा देशांमध्ये आपली गुतवणूक वाढवून मोठे मोठे प्रकल्प उभे करत त्या देशांची आर्थिक नाळ आपल्याहातात ठेवत त्या देशांना आपल्या वर अवलंबून ठेवण्याचा मोठा प्रयत्न करताना दिसला. अशा देशांच्या सोबतच अमेरिका, भारत, इटली, ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशामध्ये इ-कॉमर्स सारख्या व्यवसायात सुद्धा मोठी मुसंडी चीन ने मारली. प्रत्तेक देशाला आपली बाजारपेठ समजून त्यादृष्टीने पावलं टाकत प्रसंगी दबावाचे राजकारण खेळत चीन आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतो. कोरोनाच्या या महामारीच्या संकटात सुद्धा चीन चा हा प्रयत्न असणारच आहे. चीन ने आपल्या देशातील कोरोना संकटाचा मोठ्या कणखरपणे सामना करत आपल्या देशातील संकट आटोक्यात आणले व देश पूर्वपदावर आणला. इकडे सर्व जग कोरोंनापासून वाचण्याचा प्रयत्नात लॉक डाउन असताना चीन मात्र ग्लोबल फायनान्स म्यानेजमेंट आणि इन्वेस्टमेंट मध्ये व्यस्त आहे. चीन ची ही ड्रागण चाल सुरूच राहणार आहे. त्याचे उदाहरण म्हणजे नुकतेच चीनच्या पीपल्स बँकेने भारतातील एच.डी.एफ.सी. ली. चे जवळपास १.७५ कोटी शेअर्स विकत घेतलेत. चीन इतर देशातील कंपन्यामध्ये गुंतवून करून अशा परिस्थितीचा फायदा घेण्याचे मोठे प्रयत्न करेलच यात शंका नाही.
पण दुसरी बाजू अशी राहील की अमेरिका, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया सारख्या प्रगत देशाची जी वाताहत होत आहे त्याला चीन वायरस जबाबदार आहे अशी भावना त्या त्या देशांच्या नागरिकांमध्ये होत आहे. तसेच पूर्ण जगात तशी प्रतिमा होते आहे. चीन हा मानवता विरोधी देश ठरत असून, चीनवर इतर देश आता विश्वास ठेवणार नाहीत. आणि त्याची सुरुवात झालेली आहे. जपान सरकार ने नुकतीच घोषणा करून आपल्या चीन मधील कंपन्या जपानमध्ये वापस आणा किवा इतर देशात स्थलांतरित करा अशा सूचना केल्या. त्याकरिता जपानने २.२ बिलियन यु.एस. डॉलर चे मोठे प्याकेज सुद्धा तयार ठेवले आहे . तसेही चीन आणि जपान चे पिढीजात वैर सर्वश्रूत आहेच.
अमेरिका सुद्धा चीन कडून जवळपास ५३५.५ बिलियन यु.एस. डॉलर चा माल आयात करतो. परंतु आता अमेरिकन जन – माणसाची मानसिकता ओळखून अमेरिकेला चीन विरोधी भूमिका घ्यावीच लागेल. आणि या व्यापारचा फेर विचार करावाच लागेल. चीन मध्ये असणारे जे विविध देशांचे उद्योग विश्वासहार्यतेच्या मुद्यावर बाहेर पडतील ते श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, व्हिएतनाम, कंबोडिया व इतर स्वस्त मानव संसाधन मिळणार्‍या विविध देशांमध्ये चाचपणी करतील, पण पुन्हा मुद्दा येतो तो कणखर नेतृत्वाचा, देशांतर्गत सुरक्षित वातावरणाचा, काही आर्थिक सवलतींचा, आणि प्रशिक्षित व स्वस्त मानव संसाधंनाचा आणि ते सर्व मिळण्यासाठी जपान सारख्या असंख्य देशांची नैसर्गिक निवड ही भारत असेल.  
आज संपूर्ण जग हे भारताच्या जीवन मूल्य आणि जीवन पद्धतीचा मोठेपणा स्वीकारताना दिसत आहेत. भारताच्या नेतृत्वाने साद दिली आणि संपूर्ण भारतीयांनी त्यांना एका सुरात प्रतिसाद दिला हे सुद्धा जगाने पहिले आणि त्याचे कौतुकही केले. अमेरिकेसारख्या महाशक्तीला भारताकडून औषध पुरवठा मिळण्यासाठी विनंती करावी लागली व ती भारताने तात्काळ मान्य करत पुरवली सुद्धा. भारता कडून आज जवळपास ५५ देशांना औषध पुरवठा करण्यात येतो आहे.  भारताला या निर्णयाने संपूर्ण जगात आदराचे स्थान तर मिळालेच पण भारताचा मानवतावादी दृष्टीकोण आज पुन्हा अधोरेखित झाला. भारतातील छोट्या उद्योगा पासून ते मोठ्या उद्योगांना, कामगारांना, बँकिंग क्षेत्राला, अगदी शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे एकंदरीत सर्वच क्षेत्राला मोठ्या संधी भविष्यात उपलब्ध होतील. जगातल्या मोठ मोठ्या कंपन्या भारतात यायला तयार होतील. नव नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंग व्यवस्थापन, ऑनलाइन बिझनेस व्यवस्थापन, इ कॉमर्स, इत्यादि चा वापर करत आणि  कणखर भूमिका घेत भारताने ही संधि क्याश करायला हवी. जगभरतील उद्योगांना भारत हा गुंतवणुकीसाठी आणि प्रकल्प उभारणीसाठी एकमेव उत्तम पर्याय वाटावा असे धोरण सुद्धा भारत सरकार ने अंमलात आणले पाहिजे. मेक इन इंडिया ला अधिक गती देन्यायोग्य पुढील काळ असेल. भारताकडे आज केंद्रात कणखर नेतृत्व आहे जे कुठलीही समस्या सोडवण्याची ताकत ठेवते मग ती कश्मीर असो, परमाणु क्षेत्रातील असो वा मंगल यान संदर्भात असो अथवा नागरिकता बिल असो. त्यामुळे कोरोना संमस्येमधून सुद्धा बाहेर पडत आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करत, भारताचे भाग्य उजळण्याची जबाबदारी आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रात अधिकाधिक मेहनत करून घेतली पाहिजे हे सगळे होण्यासाठी पहिले आपण शासनाच्या निर्देशांचे पालन करत कोरोणाचा मुकाबला केला पाहिजे. अन्यथा येणारा काळ हा, या टर्निंगपॉइंट ला, भारताचे अपयश म्हणून अधोरेखित करेल. (photo – google/freepik )

  • नितिन राजवैद्य 

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (1)
Add Comment
  • Hema

    Best