काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इयत्ता सातवीच्या पुस्तकात हा इतिहास शिकवला जायचा! यात भारतावर आक्रमण करणार्या बाबरावर सुमारे 34 ओळी खर्च केल्या आहेत. आणि बाबराशी संघर्ष केलेल्या महाराणा संग्रामसिंह उर्फ सांगा यांचा फक्त नामोल्लेख आहे.
शिवाय बाबर हा प्रतिभाशाली कवी आणि लेखक कसा होता,याचेही वर्णन आहे.परकीय आक्रमकांचा मोठेपणा आपल्या भावी पिढीला शिकवणारा भारत हा कदाचित पहिलाच देश असेल.
युजीसीने मुघलांचा गौरव करणारा हाच खोटा इतिहास हटवण्याचे निश्चित केल्यानंतर अनेकांच्या बुडाखाली आग लागली आहे.
बाबर वास्तवात कसा होता? त्यासाठी श्री.सत्येन वेलनकर( Satyen Velankar ) यांनी लिहिलेला अगदी संदर्भ आणि पुराव्यासह लिहिलेला पुढील लेख पहा
महान राजा बाबर ?
आपल्या ‘महान’ पूर्वजांचा आदर्श ठेऊन मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर वागला नसता तरच नवल होतं, किंबहुना लहान मुलं ज्याप्रमाणे पत्त्यांचा किंवा लाकडी ठोकळ्यांचा मनोरा रचतात त्याचप्रमाणे मानवी मुंडक्यांचे मनोरे रचण्याचा छंदच बाबराला लागला होता. बाबरनामा या त्याच्या स्वतःच्या आत्मवृत्तात त्याच्या आज्ञेवरून रचलेल्या मानवी मनोऱ्यांची अनेक उदाहरणे त्याने दिली आहेत:- काही उदाहरणे पुढील प्रमाणे:-
“अबुल हसन आणि पायंदे किपलान यांच्या शौर्याची पूर्वी प्रचिती आली होती, परंतु या वेळी त्यांनी पुन्हा एकदा पराक्रम घडविणे आपल्या शौर्याची भक्कम पावती दिली. आमच्यावर हल्ला करणाऱ्या चाळीस ते पन्नास अफगाणांची कत्तल केल्यानंतर , एका शेतामध्ये त्यांच्या मुंडक्यांचे मिनार उभारण्याची आज्ञा मी दिली (९२५ हिजरी) ”
~ बाबरनामा , इंग्रजी भाषांतर जॉन लेयडन आणि विल्यम अर्स्कीन, खंड २, पृ.१२४
“गंगा-यमुनेच्या दुआबात, आमच्या छावणीजवळ असलेल्या एका छोट्या टेकडी जवळ लढाई झाली, या लढाईत मारलेल्या काफ़िरांच्या (हिंदूंच्या) मुंडक्यांचे मिनार या टेकडीवर उभारण्याची आज्ञा मी दिली (९३३ हिजरी)”
~ बाबरनामा , इंग्रजी भाषांतर जॉन लेयडन आणि विल्यम अर्स्कीन, खंड २, पृ.३०८
“दोनशे ते तीनशे मूर्तिपूजक हिंदू मेदिनी रायच्या घरी जमले होते. त्यांनीं एकमेकांचे गळे कापून जोहार केला आणि अशा प्रकारे हे सर्व हिंदू नरकात गेले. अशा रीतीने अल्लाहच्या कृपेने २-३ घडींच्या अवधीतच फारसे प्रयत्न करावे ना लागता चंदेरीच्या हा प्रसिद्ध किल्ला माझ्या हाती आला. यानंतर मी चंदेरीच्या वायव्येला असलेल्या एका टेकडीवर हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार उभारण्याची आज्ञा केली. (९८४ हिजरी)”
~ बाबरनामा , इंग्रजी भाषांतर जॉन लेयडन आणि विल्यम अर्स्कीन, खंड २, पृ.३२६
“ग्वाल्हेर जवळील आदवा येथे अखंड दगडामध्ये कोरलेल्या काही मोठ्या आणि काही छोट्या मूर्ती आहेत. दक्षिणेकडील बाजूस सुमारे २० गज उंचीची एक मूर्ती आहे. या मूर्तींच्या अंगावर एकही कपडा नसून, त्या संपूर्णपणे नग्न अशा आहेत …. मी या मूर्ती फोडून टाकण्याचे आदेश दिले”
हिजरी ९३५
(या सर्व जैनांच्या मूर्ती होत्या )
~ ~ बाबरनामा , इंग्रजी भाषांतर जॉन लेयडन आणि विल्यम अर्स्कीन, खंड २, पृ.३४०
संकलन
– रवींद्र गणेश सासमकर