मोनालीसाचे लिओनार्दो विनचीस पत्र..
खूप दिवसांपासून,शतकांपासून विचार करतेय..तुला लिहावं म्हणून..आज हिम्मत केलीच!
साचलय…
खूप मनात ..
मायना काय लिहावं बरे..
बाप?
म्हणावं का?.
पण तू मर्त्य मी अंमर!
नको..
विधाता …..हो बरोबर !
तू माझे भाग्य लिहिलंस…
आणि निर्माता .पण…
तुझ्या प्रतिभावान कुंचल्याने रेखाटलस …..रंग भरले..
आणि …..
सुंदर तर तू बनावलास…
पण शापित साैंदर्य… दिलस ….
माझ्या एका डोळ्यात रडू… आणि दुसऱ्या हसू….!
पण हेच ठरले अभिजात साैंदर्य !
जागतिक प्रसिद्ध चित्र !!
आणि लाखो डॉलरची संपत्ती !!!
तू आहेस निर्माता !
तू आहेस अका प्रतिभावान
तू आहेस एक जैववैद्यानिक,ज्याचे संशोधन अजूनही अभ्यासाला जातय !
तू आहेस मोठा स्थापत्य विशारद !
पण.. पण..पण
तुला एकदाही मला विचारावेसे वाटले नाही ? की काय झाले का ग डोळयात पाणी !
तुला त्यामागचे कारण देखील विचारावेसे वाटले नाही…
का ?
पण बाझार मांडलास
माझ्या वेदनेचा!
तुला हेही वाटले नाहीकी रडू द्यावे हिला दोन्ही डोळ्यांनी आणि होऊ द्यावे कॅथर सिस…
ओघळू द्यावे अश्रू मुक्त पणे….
तुला हे हे वाटले नाही की हसू द्यावे तिला मनसोक्त अवखळ अल्लड तरुणी सारखे…
का तुला मी एक मास्टर पिि पिसेस म्हणून हवी होते ! एकमेवादित्य !!!
Very nice writeup Mohini…??
khup chhan!