पाणडुबी :नौदलाची ताकद.
कुठल्याही युद्धात नौदलाला; आपल्या बंदरांची सागरी सुरक्षा, समुद्री वाहतुकीचे मार्ग (सी लेन्स) मोकळे करण/ठेवण, मालवाहू जहाजांच रक्षण,शत्रूच्या समुद्री मार्गाची रुकावट,स्वतःच्या समुद्री किनाऱ्यावर शत्रूच सागरी आक्रमण (अँफिबियस असॉल्ट) रोखण आणि शत्रू प्रदेशात स्वतःच्या लष्कराला नदीकाठच्या कारवायांची (रिव्हरीन ऑपरेशन्स) मोकळीक देण या जबाबदाऱ्या देण्यात येतात. ही कामगिरी बजावणाऱ्या नौदलाच्या सागरी सुरक्षेसाठी पाणडुब्याची आवश्यकता असते. पाण्याखालून लढण्याची (अंडर वॉटर ऑपरेशन) व तद्नुसार शत्रूला न कळत प्रछन्न युद्ध (कोव्हर्ट वॉर बाय स्टेल्थ) करण्याची क्षमता असलेल्या पाणडुब्या (सबमरिन्स) समुद्री लढाईसाठी अतिशय महत्वाच्या असतात. त्या खोल पाण्यात विध्वंसक सामरिक हत्यार नेउ शकतात आणि दीर्घ काळ पाण्याखाली राहू शकत असल्यामुळे नौदलाचा सामरिक कणा असतात.पाणडुब्यांना ‘सी डिनायल वॉर मशीन’ म्हणतात कारण समुद्रातील एका/ कोणत्याही विवक्षित भागामधे,एका विवक्षित कालावधीसाठी, शत्रूला येण्यास मज्जाव करणे आणि त्याचवेळी स्वतःसाठी तो भाग मोकळा/ खुला ठेवणे यासाठी त्या आवश्यक असतात किंबहुना तीच त्यांची उपयुक्तता असते अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.
पाणडुब्यांचा वापर/उपयोग समुद्राच्या, एका/कोणत्याही विवक्षित भागावर,एका विवक्षित कालावधीसाठी वर्चस्व स्थापन करण्यासाठी ही केल्या जातो.त्याला ‘सी कंट्रोल’ म्हणतात. अशा समुद्री वर्चस्वामुळे स्वतःच्या लष्कराला,त्या भागात लष्करी हालचालींची (स्ट्रॅटेजिक मुव्हमेंट्स) मुभा मिळते. अस वर्चस्व स्थापन करणाऱ्या कॅरियर ग्रुपच्या रक्षणासाठी पाणडुब्याची नितांत आवश्यकता असते. कुठल्याही सामरिक संसाधनांप्रमाणेच (स्ट्रॅटेजिक असेट्स) यांची कमांड कंट्रोल सिस्टीम अतिशय सुदृढ असण आवश्यक असत. हत्यार नेण्याची क्षमता आणि प्रेरक प्रणालीमुळे (प्रॉपल्शन सिस्टीम) पाणडुब्यांच वर्गीकरण मुख्यतः डिझेल पावर्ड अटॅक सबमरिन्स (एसएसके),न्यूक्लियर पॉवर्ड अटॅक सबमरिन्स (एसएसएन),न्यूक्लियर पॉवर्ड गायडेड मिसाईल्स कॅरिंग सबमरिन्स (एसएसजीएन) आणि न्यूक्लियर पॉवर्ड बॅलेस्टिक मिसाईल कॅरिंग सबमरिन्स (एसएसबीएन) या चार वर्गांमधे केल्या जात. अ) पाण्याच्या पृष्ठभागावर आल्या नंतर डिझेलवर नाहीतर पाण्याच्या आत असतांना बॅटऱ्यांवर चालणाऱ्या डिझेल पॉवर्ड अटॅक सबमरीन्स (एसएसके) ज्यांना बॅटरी रिचार्जिंगकरता शुद्ध हवा घेण्यासाठी (स्नॉर्कलिंग) पाण्याच्या पृष्ठभागावर, पाणडुबीच्या परिदर्शकीय स्तरावर (पेरिस्कोप लेव्हल) याव लागत. सतत पाण्यावर येण्याच्या आवश्यकतेमुळे अशी पाणडुबी, शत्रूच्या मेरीटाईम पेट्रोल एयरक्राफ्ट्स/ हेलिकॉप्टर्स/ सर्फेस प्लँटफॉर्म्ससारख्या अँटी सबमरीन वॉरफेयर फोर्सेसला सहज रित्या बळी पडू शकते.कुठल्याही पाणडुबीपाशी विमानविरोधी हत्यार नसत.अशा पाणडुबीची पाण्याखाली राहण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्यात एयर इंडिपेन्डन्ट प्रॉपल्शन सिस्टीम (एआयपीएस) लावण्यात/बसवण्यात येते.त्यांची कमाल गती प्रतिघंटा १५ नॉट्सची असली तरी पाण्याखाली असतांना,बॅटरी लाईफ वाचवण्यासाठी त्या ३-५ नॉट्स पेक्षा जास्त वेगानी वेगानी जात नाहीत.बॅटरीवर चालत असल्यामुळे या फारच कमी आवाज करतात आणि म्हणूनच सोनार सिस्टीमद्वारे यांना शोधण (डिटेक्शन) कठीण असत. या पाण्यात, जास्तीत जास्त ३०० मीटर्स खोलीवर जाऊ शकतात. यांच वजन (टनेज) १०००-३५०० टन असत. त्यांच्यावर अँटी शीप/अँटि सबमरिन टॉरपेडो आणि समुद्री सुरुंग (सी माइन्स) त्याच प्रमाणे ८०० किलोमीटर्स पल्ला असलेली मिडीयम रेंज अँटीशीप /लँड अटॅक क्रूझ मिसाईल्स बसवलेली असतात.
ब) न्यूक्लियर पॉवर्ड अटॅक सबमरिन्स (एसएसएन),न्यूक्लियर पॉवर्ड गायडेड मिसाईल कॅरिंग सबमरिन्स (एसएसजीएन) आणि न्यूक्लियर पॉवर्ड बॅलेस्टिक मिसाईल कॅरिंग सबमरिन्समधे (एसएसबीएन), न्यूक्लियर पॉवर प्लॅन्टची प्रेरक प्रणाली असल्यामुळे पाण्याखाली रहाण्याची त्यांची क्षमता अमर्याद असते. पाण्याखाली राहण्यात मानवी शीण/थकव्याचीच मर्यादा असते.यांचा पाण्यावर आणि पाण्याखालील वेग ३० नॉट्सचा असतो. त्या पाण्यात ५०० मीटर्स खोल प्रवास करू शकतात. एसएसकेपेक्षा त्या खूपच वजनी असतात.त्यांचं टनेज,४०००-१८,००९ टन एवढ असत/ असू शकत. एसएसएन/ एसएसजीएन पाणडुब्या;लढाऊ जहाजांचा कॅरियर ग्रुप आणि मालवाहू जहाजांच्या रक्षणार्थ, अँटिसबमरिन वॉरफेयर प्लॅटफॉर्मच काम करतात. एसएसबीएन सबमरिन्सवर बॅलेस्टिक मिसाईल्स असतात आणि त्यांचा वापर सामरिक फलाटासारखा (स्ट्रॅटेजिक प्लॅटफॉर्म) केल्या जातो.त्य्यांच्या खोलवर कार्यरत असण्यामुळे त्या ‘सेकण्ड स्ट्राईक’साठी आणि तणाव वातावरण आणि शांती काळात समुद्री टेहळणीसाठी (सी पेट्रोलिंग) अतिशय उपयुक्त मानल्या जातात.
जून १९६४मधे दक्षिण आशिया उपखंडात पाकिस्ताननी पहिल्यांदा त्याच्या नौदलासाठी अमेरिकन पाणडुबी डीआल्बो विकत घेऊन तीच नामकरण ‘पीएनएस गाझी’ केल.१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पश्चिमी क्षेत्रात तैनात असलेल आयएनएस विक्रांत विमानवाहू जहाज आणि दिल्ली व म्हैसूर या क्रुझर्सचा विध्वंस करण्यासाठी,पीएनएस गाझीला ०५ सप्टेंबर,१९६५ला त्या क्षेत्रात पाठवण्यात आल. मात्र त्या वेळी,आयएनएस विक्रांत आणि दिल्ली ‘रिपेयर अँड रिफिट’साठी मुंबईच्या माझगाव डॉक्समधे गेले होते आणि आयएनएस म्हैसूर दक्षिणेत,कोचीन बंदरात उभ होत.संपूर्ण युद्धकाळात बहुतांश भारतीय नौदल बंदरांमधेच होत.पीएनएस गाझीच्या भीतीमुळे ती जहाज समुद्रात गेलीच नाहीत.त्यामुळे ०७/०८ सप्टेंबरला सहा फ्रिगेट्स आणि डिस्ट्रॉयर्ससह पीएनएस बाबरनी गुजराथमधील द्वारका बंदराच्या सहा किलोमीटर्स दूरपर्यंत येऊन बंदरावर प्रचंड गोळाबारी केली. केवळ एका पाकिस्तानी पाणडुबीच्या भीतीनी भारतीय नौदल बंदरांच्या बाहेरही निघू शकल नाही.ही एका पाणडुबीची सामरिक ताकद/भीती होती. भारतीय नौदलानी पीएनएस गाझीला विशाखापट्टणम बंदराच्या जवळील मायनिंग ऑपरेशन्समधे त्यांच्या ८४ नाविकांसह १२ डिसेंबर १९७१ला जलसमाधी दिली. दुसऱ्या पाकिस्तानी पाणडुबी,पीएनएस हँगोरनी, भारतीय फ्रिगेट,आयएनएस कुकरीला, काठियावाडपासून ३० मैलावर टॉरपेडो फायर करून ०९ डिसेंबर,१९७१ला जल समाधी दिली. हँगोरचा टॉरपेडो,भारतीय जहाजाच्या ‘एक्सप्लोझीव्ह मॅगझीन’ वर जाऊन आदळल्यामुळे प्रचंड मोठा स्फोट होऊन आयएनएस कुकरी,काही मिनिटांच्या आतच,समुद्रतळाला गेली.कुकरीवर त्यावेळी १८ ऑफिसर्स आणि १७६ नाविक होते. कुकरीच्या कमांडिंग ऑफिसरनी सर्वांना समुद्रात उडी घेत, जीव वाचवण्याचा हुकूम दिला. भारतीय नौदलाने आपल जहाज यांना वाचवण्यासाठी पाठवल आणि त्याला १६ ऑफिसर्स व १७२ निविकांना वाचवण्यात यश आल. नौदलाच्या उज्वल व ज्वलन्त परंपरेनुसार, आयएनएस कुकरीचा कमांडिंग ऑफिसर,कमांडर मुल्ला, शेवट्पर्यंत जहाजावरच थांबला आणि आयएनएस कुकरीसह समुद्राच्या तळाशी गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर,एक सध्या पाणडुबीद्वारे शत्रूच जहाज ध्वस्त होण्याची ही पहिलीच वेळ होती.
ब्ल्यू वॉटर नेव्हीसाठी पाणडुबीच काय महत्व असत हे या दोन घटनांमधून उजागर झाल. म्हणूनच १९८०पासून भारतानी देशातच साध्या आणि आण्विक पाणडुब्या बनवण्याची मोहीम सुरु केली. १९८४-९४दरम्यान,मुंबईच्या माझगाव डॉक्समधे,जर्मन २०९ (शिशुमार) क्लासच्या दोन पाणडुब्याची निर्मिती करण्यात आली. त्याच प्रमाणे यांनी २०१०-१९दरम्यान दोन स्कॉर्पियन (कलवरी) क्लासच्या पाणडुब्याची सफल बांधणी केली. याच वर्गाच्या तीसऱ्या पाणडुबीच निर्माण कार्य याच डॉकयार्डमधे जोमाने सुरु आहे.१९८०मधेच, न्यूक्लियर सबमरीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसलच्या निर्मितीचाही ओनामा करण्यात आला होता.देश संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिल तर; आर्मी,नेव्ही व एयरफोर्समधे सबमरीन लॉन्चड बॅलॅस्टिक मिसाईल्स (एसएलबीएम) सर्वात जास्त प्रभावी हत्यार आहे. याच मुख्य कारण म्हणजे,कोणत्याही आण्विक पाणडुबीला; ज्यांना नौदलात ‘बूमर’ म्हणतात,समुद्रात हुकून काढण (डिटेक्शन), त्यांचा मागोवा घेण (ट्रॅकिंग) आणि त्यांचा विध्वन्स करण (डिस्ट्रक्शन);अशक्य नसल तरी अतिशय कठीण असत. भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही,देशात निर्माण झालेली पहिली आण्विक पाणडुबी कार्यरत (ओपरेशनली कमिशन्ड) झाली असून,आयएनएस अरिन्दम ही दुसरी आण्विक पाणडुबी,लवकरच कार्यरत होण्याची संभावना आहे.आयएनएस चक्र,ही सोव्हिएट नेरपा क्लासची तीसरी आण्विक पाणडुबी,भारतीय नौदलाच्या ताफ्यात १९८८पासूनच आहे. भारतीय नौदलाला आण्विक पाणडुबी बनवण्याची आणि वापरण्याची शाश्वती व सवय आहे.
पाकिस्तानकडे सध्या दोन ऑगस्टा क्लास,तीन ऑगस्टा ९० (खालिद) क्लासच्या एआयपी प्रणालीच्या पाणडुब्या आहेत. दोन पाणडुब्याची निर्मिती,कराची शिपयार्ड अँड इंजिनियरिंग वर्क्समधे,चालू आहे. या सर्वांमधे, न्यूक्लियर वॉरहेड असणारी मिडीयम रेंज,लँड अटॅक कृझ मिसाईल्स तैनात करण्यात आली आहेत.या व्यतिरिक्त,पाकिस्तानने चीनकडे आठ एआयपी प्रणालीच्या पाणडुब्याची मागणी केली असून,चीननी त्या देण्याची शाश्वती/तयारी दर्शवली आहे. या पैकी चार आण्विक पाणडुब्यांची निर्मिती,कराचीच्या डॉकयार्डमधे केल्या जाईल. आजमितीला भारताच्या सेकण्ड न्यूक्लियर स्ट्राईक कॅपेबिलिटीला तोंड देण्यासाठी, पाकिस्तानकडे एकही आण्विक पाणडुबी नसली तरी पाकिस्ताननी आपले नौसैनिक, आण्विक पाणडुबी संबंधी प्रशिक्षणासाठी,चीन व रशियात पाठवले आहेत.या पुढील भारत पाक युद्धात नौदलाची भूमिका सर्वात महत्वाची असणार आहे. सांप्रत यात भारताचा वरचष्मा असला तरी नजदिकी भविष्यात पाकिस्तान भारताच्या बरोबरीत येईल आणि/किंवा चीनच्या मदतीने भारताच्या पुढेही निघून जाईल. काश्मिरमधून ३७० व ३५ अ कलम हटवल्यानंतर पाकिस्तानी राजनेते, सेनाधिकारी आणि संरक्षणतज्ज्ञांनी युद्धाच्या संभावनेच्या संबंधात, जे तारे तोडले त्याच मूळ यात आहे अस म्हटल तर ते वावग होणार नाही.
बुधवार,०४ डिसेंबर हा भारतात नौसेना दिवस म्हणून साजरा केल्या जातो. याच दिवशी,१९७१च्या युद्धात भारतीय नौसेनेच्या चार क्षेपणास्त्रधारी बोटींनी कराची बंदरांवर अत्यंत धाडसी हल्ला करून त्याला उध्वस्त केल होत. भारतीय नौसेनेच्या वीरांना या फौजीचा सलाम. (Photo – By BS)
०४/१२/२४ : १६, भगवाघर कॉलनी,धरमपेठ, नागपूर,१० : ९४२२१४९८७६/ abmup५४ @gmail.com.