पंतप्रधान जीवन ज्योती विमा

पंतप्रधान जीवन ज्योती विमा
पंतप्रधान जीवन ज्योती योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावल्यानंतर सुरक्षा दिली जाते.

ठळक वैशिष्टे

  1. रुपये ३३० वार्षिक हप्ता
  2. लाभार्थी वयोगट १८ ते ५०
  3. लाभ – मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
  4. अट – फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो
  • एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी हि एक आयुर्विमा योजना आहे. दर वर्षी नूतनीकरण आवश्यक. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल.
  • १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
  • योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा राहील व विमा हप्ता बँक खातात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत देणे आवश्यक राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरवातीला ३ महिने पर्यंत वाढवू शकते.
  • विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर वारसास रु. २ लाख भरपाई मिळेल.
  • विमा हप्ता रो. ३३०/- प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल
  • विमा धारकाने वय वर्ष ५५ पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल.
  • तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक

आपण याची माहिती टोल फ्री क्रमांकाद्वारे हि मिळवू शकता प्रत्येक राज्यानुसार टोल फ्री क्रमांक दिले आहेत. तसेच एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर देखील आहे:

महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे : महाराष्ट्र बँक – १८००-१०२-२६३६
राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : १८००-१८०-११११ /१८००-११०-००१

लिंक्स / डाऊनलोडस

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेशी संबधित नेहमीचे विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि त्याला दिलेली उत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ग्राहक नोंदणी नमुना फॉर्म (समती पत्र / घोषणा फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी / पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आर्थिक सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांची जन धन से जन सुरक्षा हि वेबलिंक ओपन करा

 

स्त्रोत – विकासपीडिया

Comments (0)
Add Comment