पेजर विस्फोटांचा अन्वयार्थ.

पेजर विस्फोटाांचा अन्वयार्थ.

जीहादी आतंकी संघटना हिज्बुल्लाह संवाद साधण्यासाठी (इंटननल कम्युननकेशन्स) वापरलेल्या पेजरचा मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर २४ ला देशभरात जवळजवळ एकाच वेळी स्फोट झाल्यामुळे लेबनानमधे नऊ लोक ठार आणि सुमारे २८०० वर जखमी झाले आहेत. अंदाजे२०० लोकांची तब्बेत गंभीर आहे. अशा बातम्या येत आहेत. आजपर्यंत  झालेल्या हल्यांमधला हा  अत्याधुनिक हल्ला मानला जात आहे. दुपारी पावणेचार  च्या सुमारास बाजारात/ दुकानात/घरी/कामावर असलेल्या लोकांच्या शटन /सलवार/पँटच्या खिशात झालेले  दिवाळीतील फटक्यांसारखे आवाजाचे हे स्फोट सुमारे दीड तास सुरू होते.
स्फोटांमुळे सुरू झालेल्या अफरा तफरीत लेबनानमधील रूग्णालयांत जखमी/मृत येण सुरू झाल. लेबनानचा शेजारी सिरियामध्येही  अशाच प्रकारच्या स्फोटांमध्ये १४ लोक जखमी झालेआहेत .

स्फोट झालेले पेजर अल्फान्यूमेरक असून असे ३००० पेजर हिजबुल्लानी एका तायवानच्या कंपनीकडून विकत घेतले होते. अल्फा न्युमेररक संदेश  १०-१५ ग्राम वजनाच्या चीपवर लावलेले  असतात आणि  त्या चीपला सिग्नलद्वारे कार्यान्वित केल जात. पेजर एक वायरलेस दूरसंचार उपकरण असून ते, अल्फान्यूमेरक किंवा आवाजी संदेश प्राप्त आणि प्रदर्शित करतता. हिजबुल्लानी या आधी कधीच पेजर वापरला नव्हता असे वाचण्यात येत आहे.पण एक मात्र नक्की की, हे सुरक्षा उल्लंघन हिज्बुल्लाह साठी अत्यंत लाजिरवाणे ठरले आहे. आणि या मुले सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
लेख लिहीस्तोवर कोणीही स्फोटांची जबाबदारी स्वीकारली नव्हती. लेबनानचे पंतप्रधान नजीब निकातीनुसार; हा गुन्हा इस्रायलनीच केला आहे . 
हिज्बुल्लाहनुसार  “  नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या गुन्हेगारी आत्महल्याठी इस्रायलच पूणनपणे जबाबदार आहे.  इस्रायलनी यावर भाष्य करण टाळल आहे. संरक्षण तद्यांनुसार “ आपल्या लक्ष्याचा मागोवा घेण्यासाठी इस्त्रायल नेहमीच उच्च तंत्राद्यानाचा वापर करत आला आहे. इस्रायलनी हिज्बुल्लाहच्या संपूर्ण नेटवर्क मध्ये खोलवर  घूसखोरी केली असावी ”

या स्फोटांमुळे हिज्बुल्लाहच्या मनोबल मनुष्यबळावर विपरीत परिणाम झाला  आहे. असे सौरक्षण तज्ञांचे मत आहे. ज्या पेजर मध्ये बॉम्बस्फोट झाले ते हिज्बुल्लाहनी नुकतेच खरेदी केल्याची बातमी आहे. .मोबाईल फोन वापरल्यास इस्रायली गुप्तचर यंत्रणांना सुलभरीत्या पळत ठेवता येते म्हणून हिज्बुल्लाह ने  पेजर प्रणालीचा वापर करू लागली. हिज्बुल्लाहला त्याच्या खंबीर सुरक्षा पद्धतीचं अभिमान होता.

स्फोट का व कसे झालेअसतील याची समीक्षा केली असतां आढळून येत की –

  • मोबाईल्स वापरलेत तर इस्त्रयल जिहाद्यांचे लोकेशन ट्रक करू  शकतो म्हणून हिज्बुल्लाह ने, “ लो टेक कम्युननकेशन सिस्टिम ” म्हणून पेजर वापरले असावेत.
  • हॅक झाल्यामुळे पेजरची बॅटरी जरुरीपेक्षा जास्त गरम झाली असावी आणि  पेजरचा स्फोट झाला असावा.
  • पेजरच उत्पादन किंवा साखळी पुरवठया दरम्यान बॅटरी मधे छेडछाड केल्या गेली असेल.आजनमतीला पुरवठा रृंखलेवर
    (सप्लाय चेन) होत असलेले हल्ले हा संगणकीय सुरक्षा जगतात चिंतेचा विषय बनला आहे .
  • उत्पादन व वितरण प्रक्रियेत हयाकर्स चा  प्रवेश झाल्यामुळे अनेक हाय प्रोफाइल घटना घडल्या आहेत.

माझ्या आकलना नुसार  मार्च,२४ मधे लेबानाननी तायवानच्या गोल्ड अपोलो कंपनीकडून ३००० पेजर एआर ९४२ ,आयपी ६७ खरेदी केलेत. तिथल्या  बी अँड एच फोटो कंपनीला दिलेल्या पेजर बॅटऱ्यांच्या ऑर्डरची बातमी इस्रायली इंटलिजन्स/मोसादला मिळाल्यावर त्यांनी ते  बॅटरी शिपमेंट हस्तगत करून प्रत्येक बॅटरीवर किस्का ३ ही ओळखण्यास अशक्य असलेली अतिशय छोटी  स्फोटक चीप बॅटरी वेष्ठणात (केसिंग) घुसवून तीला बॅटरी वायरशी जोडल असणार. एक विवक्षित संदेश मिळताच या सुधारित बॅटऱ्या, वाजवीपेक्षा जास्त गरम होऊन फुटतील असा प्रोग्राम,  “बिलो द बेल्ट” त्या चीपमधे घालण्यात आला होता. इस्रायलमधील एका सर्व्हरद्वारे हा संदेश मिळताच ते सर्व पेजर्स एकाच वेळी फुटतील अशी व्यवस्था केल्या गेली. तंत्रज्ञानाचा अचूक वापर सामरिक दृष्टीकोनातून कसा करायचा याच हे उत्तम उदाहरण आहे. संगणकीय युद्ध (सायबर वॉर फेयर) करण्यात इस्रायलची अत्याधुनिक शक्ती यात उजागर झाली आहे.

फोटो -गुगल साभार ..

कर्नल अभय पटवर्धन ( निवृत्त )

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Comments (0)
Add Comment