समर्थ श्री रामदास स्वामी महाराज.

पुण्यतिथी

आज माघ वद्य नवमी म्हणजेच दासनवमी.

श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांची पुण्यतिथी.

समर्थ रामदास स्वामि महाराजांनी आपल्या प्रचंड जीवन कार्यात, मरगळ अवस्तेत असणाऱ्या समाजाला जागे करत समाजाच्या विविध विषयावर आपले परखड मत मांडत महाराष्ट्राला दिशा देण्याचे मोठे कार्य केले. दासबोध या प्रसिद्ध मार्गदर्शक ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली.

प्रपंच करत करत परमार्थ करावा. हे सांगत उच – नीचतेच्या जातीयवादी  संकल्पनेला त्यांनी कडाडून विरोध केला. 

उच नीच नाही परी,

राया रंक येकची सरी ||

झाला पुरुष अथवा नारी, 

येकची पद ||२४ ||

( श्रीदासबोध : ब्रम्ह निरुपण – 24 , पृ १७९-१८० )

शके १६०३ साली दुर्मुखनाम सवत्सरी माघ वद्य नवमीला त्यांनी आपल्या जीवन कार्यास पूर्ण विराम दिला.

रामदास स्वामींना व त्यांनी केलेल्या  अत्युच्य कार्याला प्रणाम…!  

 

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment