गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागी राम मंदिर निर्माण करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टा ने दिला आहे. या निकालामुळे आता वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजले जात आहे. दरम्यान, मु्स्लिमांना मशिदी साठी अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याकार्यासाठी अनेक दशकांपासून जांनी लढा उभारला आणि लावून धरला त्या सर्वांना आज समाधान वाटत असेल.
लोकसंवाद.कॉम च्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सर्वांनी आदर ठेवण्याचे आणि शांतता राखून सौहार्द्य राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्वांच्या भावना सांभाळणारा आणि इतिहास आणि पुराव्याला धरून दिलेला हा निर्णय आहे.
ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणीची योजना आखा- सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जागी राम मंदिर उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेश निकाल वाचनादरम्यान दिली. या जागेत येत्या तीन महिन्यात मंदिर उभारण्याचे काम सुरू करावे असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे.
सर्वोच्य न्यायालयाच्या पाच सदस्यीय न्यायमूरतींच्या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजिर या सन्माननीय न्यायाधीशांचा समावेश आहे. हा निकाल ५ – 0 असा सर्व समतीने देण्यात आला.
निकालातील ठळक मुद्दे –
- अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
- १८५६ पूर्वी वादग्रस्त जागेवर हिंदूंकडून चौथऱ्यावर पुजा – सर्वोच्च न्यायालय
- १८५६-५७ पूर्वी नमाजपठणाचे पुरावे नाहीत – न्यायालयाचं निरीक्षण
- मशिदीचं निर्माण मंदिर उद्धवस्त करून करण्यात आलं हे पुरातत्व विभागाला स्थापित करता आलं नाही – सर्वोच्च न्यायालय
- हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे: सर्वोच्च न्यायालय
- मशीद रिकाम्या जागी बांधली होती. पण मशिदीखालचा संरचना इस्लामिक नव्हती: कोर्ट
- रामलल्लाला कोर्टानं पक्षकार मानलं
- पुरातत्व विभागाचे दावे कोर्टाने धरले ग्राह्य
- निर्मोही आखाड्याचा दावा कोर्टाने फेटाळला
- एकाची श्रद्धा दुसऱ्याचा हक्क हिरावू शकत नाही : कोर्ट
- शिया वक्फ बोर्डाचा दावा एकमताने फेटाळला. गोगोई म्हणाले, ‘आम्ही १९४६ च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची सिंगल लीव पिटीशन फेटाळत आहोत’
- नितिन राजवैद्य, मुख्य संपादक