खुसरो बाजी प्रेम की मैं खेलूँ पी के संग…
रैनी चढ़ी रसूल की सो रंग मौला के हाथ।
जिसके कपरे रंग दिए सो धन धन वाके भाग।।
भारतीय इस्लाम मधे अशी धारणा आहे की काफिरांच्या हातून जर रंग लागला किंवा लावल्या गेला तर आखिरत च्या दिवशी जेव्हा अल्लाह तुमच्या पाप पुण्याचा हिशोब घेणार त्या वेळेस ज्या तुमच्या अंगाला रंग लागलेला आहे ते अंग जळलेली असतील.. आणि ते अंग तुमच्या शरीरापासून विभक्त होतील, आणि तुम्हाला जन्नत मधे सुद्धा त्याच अवस्थेत पाठविल्या जाईल …. ज्या मुस्लिमांनी जिवंत असताना रंग लावला त्यांना जेव्हा आखिरात च्या दिवशी अल्लाह हिशोब मागेल तेव्हा कब्रमधेच त्यांचे अंग जळालेले असतील…. अशी मान्यता भारतीय इस्लाम मधे आहे म्हणून मुस्लिम बांधव रंग उत्सवात सहभागी होत नाही …चला हे मान्य आहे प्रत्येकाने आपला धर्माचा आदर करावाच मग प्रश्न असा की कुराण मधे असे सुद्धा लिहिले आहे जो कोणी मुस्लिम शिवीगाळ करेल , अपशब्द वापरले
अश्या मुस्लिमांच्या कब्र मधे विंचू पडतील आणि ते विंचू त्याचा कब्रितील शरीराला नुकसान करतील
आणि अश्याच विंचवाच्या विषाने जखमी झालेले शरीर जेव्हा आखरीत च्या काळात अल्लाह सर्वांचा हिशोब घेईल त्या वेळेस जसे च्या तसे शरीर जन्नत मधे दाखील होईल
मग गोष्टीची भीती मुस्लिमांना का नाही?
फक्त रांगाचीच भीती का आहे ?
मग असाच असेल तर किती मुस्लिम शिवीगाळ करीत नाही ?
किती मुस्लिमांना आपल्या कब्रिमधील शरीराची काळजी आहे?
मग ही कट्टरता हिंदूंच्या रंगोत्सव साठीच का ?
यातून स्पष्ट हिंदू संस्कृती बद्दल द्वेष आणि तिरस्कार दिसून येतो …
आणि महत्त्वाचे म्हणजे इस्लाम मधे रंगाचा विरोध करणे की भावना आलीच अशी ? मूलतः अरबी संस्कृती मधे कुठलाच गैरमुस्लिम रंग उडवत आणि किंवा रंगोत्सव साजरा करीत नाही ..म्हणजेच हा विरोध भारतात लागू करण्यात आला याचे कारण आपल्याला नकळत माहिती आहे.
मग रंगाचा मुद्दा आला केव्हा पासून, याचा संदर्भ “फतवा आलमगीर” या पुस्तकातून आलेला आहे .
त्यात भारतीय संस्कृतिचा इस्लाम एक केंद्र बिंदू आहे हे दर्शविण्यासाठी आणि कट्टर इस्लाम पंथी बनविण्यासाठी औरंगजेब याने अरब च्या २०० आलिमंकडून लिहून घेतलेले हे पुस्तक आहे..
मुहम्मद पैगंबर एका हादित मधे म्हणतात की ..”हे माझ्या मुस्लिमांनो तुम्ही ज्या कुठल्या देशात राहतात आहे त्या देशातील संस्कृतीचा आदर करून तिला स्वीकारा हिच इस्लाम ची शिकवण आहे”
मग किती भारतीय मुस्लिमांनी संस्कृतीचा स्वीकार केला ?
किती लोकांनी मुहम्मद पैगंबर यांचा शब्दांचा मान ठेवला
अगदी बोटावर मोजण्या इतक्या राष्ट्र भक्त मुस्लिमांनी याचा स्वीकार केला …आणि अश्या मुस्लिम बांधवांचा आदरच आहे ..
अमीर खूसरो यांनी रंगोत्सवावर लिहिलेले दोहे …हा सुद्धा एक महत्त्वच संदर्भ आहे …ज्यात भारतीय संस्कृती एकजीव झालेले कवी आपल्याला दिसतील..
खुसरो बाजी प्रेम की मैं खेलूँ पी के संग…
रैनी चढ़ी रसूल की सो रंग मौला के हाथ।
जिसके कपरे रंग दिए सो धन धन वाके भाग।।
मग विचार करा १३ व्या शतकात मरण पावलेला खुसरो रंगोत्सव बद्दल एवढं काही लिहू शकतो. आणि काही शतकात म्हणजेच १६ व्या शतकात फतवा ए आलमगीर मधे अगदी होळी बद्दल रंगानं बद्दल टोकाचे लिहिल्या जाते….. ह्या देशाला या देशातील हिंदू संस्कृतीला आळा घताला नाही तर या संस्कृतीचा कोणी काहीच वाकडे करू शकत नाही कदाचित हेच मुघलांना १६ व्या शतकात नीट कळले … आणि त्या नंतरच “गझवा ए हिंद” संकल्पना रूजू झाली त्या काळात जरी होळी व इतर हिंदूंच्या उत्सवावर बंधने असतील तरी सुद्धा कुठेतरी इस्लाम मधे याची सक्ती नव्हती ती येत्या काळात लादल्या गेली ..
भारतीय मुस्लिमांनी पैगंबरांचा इस्लाम सोडून मौलाना, पिर फाकिरांचा इस्लाम भारतात रोवला आहे.
यावर मात्र कुठलाही भारतीय इस्लामिक अभ्यासक खऱ्या इस्लाम बद्दल व्यक्त का होत नाही याची खंत आहे.
मात्र याची सुरुवात सौदी अरेबिया ने केली आहे ..त्यांनी कुराण पुन्हा एकदा सत्याचा आधारावर लिहायला सुरुवात केली आहे ..लवकरच आपल्याला सुधारित कुराण वाचायला मिळेल …पण याला इस्लामिक जगात मान्यता मिळणार की तिरस्कार भोगावा लागेल, हे सौदीच्या इस्लामिक जगात असलेल्या प्रभावाची परीक्षा असणार आहे ….!
संदर्भ –
– हदित
– कुराण
– फतवा ए अलिमगिर
– saudi gazatte
– संकेत राव.