राष्ट्र अस्मितेच्या मुळावर उठणारे हात उपटून काढावे लागतील.

राष्ट्र अस्मितेच्या मुळावर उठणारे हात उपटून काढावे लागतील.

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज आपल्या सर्वांच्या अस्मितेचा प्रतिक आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान झालाच पाहिजे. तेथे कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. किवा राष्ट्राच्या अस्मितेला नख लावण्याचा कोणीही आणि कोणताही प्रयत्न होऊ नये, परंतू दि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्ली शहरात शेतकरी ट्रॅक्टर परेड मध्ये शेतकरी रूपातील काही आसमाजिक तत्व खालीस्तान समर्थक , फुटीरवादी शक्तीनी घुसले होते तसेच विदेश रसद होती,समर्थन सुद्धा आहे. त्यामुळेच शेतकरी ट्रॅक्टर परेड मार्च मध्ये लालकिल्ल्या वरील तिरंग्या ध्वजाचा अपमान केलेला आहे. लालकिल्ल्या वरील संघटनेचा ध्वज फडकावून राष्ट्राच्या अस्मितेवरच प्रहार झालेला आहे. त्यामुळे देशाच्या अस्मितेच्या मुळावर उठणारे हात मुळा सकट उपटून काढण्याची आता वेळ आलेली आहे. दिल्ली शहरात प्रजासत्ताकदिनी शेतकरी मोर्च्या मध्ये झालेला हिंसाचार पूर्व नियोजित व नियोजनपूर्वक रचलेले तसेच केंद्र सरकारला जागतिक पातळीवर बदनाम करण्याच षढयंत्र असल्याचे स्पष्ट झाले. रेहाना,ग्रेटा व मिया खलिफा यांचा आंदोलनात हस्तक्षेप व पंजाबमध्ये नॅशनल इन्विगेशन एजन्सी कडून मनप्रीतसिंहला झालेली अटक. तथा रिहानाने करोड़ो रूपये घेतल्याचा झालेला आरोप उपरोक्त षढयंत्राचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणात शेतकरी आंदोलनाची चर्चा करून आणि पाठिंबा देऊन भारत विरोधी अजेंडा पुढे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच शेतकऱ्याच्या रूपात ट्रॅक्टर परेडमार्चमध्ये फुटीरतावादी, शहरी नक्षलवादी,कम्युनिस्ट, खलीस्थान समर्थक व हिंदुत्व विरोधी गट घुसल्यामुळे ट्रॅक्टरपरेड मोर्चेकऱ्यांनी प्रजासत्ताकदिंनाला काळिमा फासण्याचे कृत्य केलेले आहे.  सदर घटनेमुळे संपूर्ण देशाचे वातावरण ढवळून निघाले असून मुठभर शेतकरी,जनता काही लोक जरी मोर्चेकऱ्यांच्या बाजूने दिसत असली तरी न दिसणारे अदृष्य करोडो जनतेचे हात व शेतीत घाम गाळणारा शेतकरी केंद्र सरकार सोबत आहे. याचा विचार सुद्धा अगत्याने करावा लागेल तसेच दिल्लीत तिरंग्याचा अपमान करून हिंसाचार घडविणारे हात आता मूळासकट उपटून फेकण्याची गरज आहे.
केंद्रामध्ये प्रखर राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्या पासून तथा शक्तीपुत्र नरेंद्र मोदी व आधुनिक चाणक्य अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वाचा उदय झाल्या पासून, ढोंगी पुढाऱ्यांची बोलती बंद झाली आहे. घरी बसलेली मंडळी  कुरपती काढून किवा कन्हैया,जिग्नेश,उमर खालिद,अल्पेश,शरजील इमाम,चन्द्रशेखर,मुन्नवर फारुखी,अशा विद्रोहीना एखाद्दा मुद्द्याला वेगळी हवा देऊन देशाचे वातावरण कलुषित ठेवण्यात मशगुल असतात त्यामुळे दिल्ली शहर अराजकतेच तथा देश विघातक ,समाज विघातक कृत्याचे केंद्रबिंदु ठरत आहे. दिल्ली शहर दंगे,आंदोलन,विरोधी मोर्चे इत्यादि मुळे सतत घुमसत आहे.
तसेच अशा आंदोलन,विरोध मोर्चे करतांना मोदी शाह यांना विरोध होऊ लागला व विरोध करता करता देशाला विरोध होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मोदी-शहांना विरोध करतांना विदेशी शक्ती सोबत हात मिळवणी होत असल्याचे दिसत आहे. रेहाना,ग्रेटा, मिया खलिफा यांच्या ट्विटरचा सहभाग हे स्पष्ट दर्शविते तसेच सचिन तेंडुलकरला, अक्षयकुमार विराट सारख्या अनेक सिलेब्रिटि चा विरोध व रेहाना,मिया खलिफाला समर्थन मिळत आहे या पूर्वी सूद्धा असेच आंदोलन करून केंद्र सरकारला घेरण्याचा तथा वेठीस धरण्याचा प्रयत्न झालेला आहे. अभिव्यक्ति स्वतंत्र,असहिष्णुतेच्या मुद्दावरून पुरस्कार वापसी गॅंगचे पुरस्कार वापसी आंदोलन,जे.एन.यू. मधील तुकडेगॅंग कडून अफजलगुरुच्या देशगद्दारीचे समर्थन करून देश विरोधी घोषणा देऊन देश तोडण्याची केलेली भाषा असो किवा शाहीनबागच्या आंदोलनात आझादीच्या घोषणा करीत शरजीलइमामने देश गद्दारीचे वक्तव्य करीत चिकन नेक आसाम चा विध्वंस करून देशा पासून आसाम तोडण्याचे चिथावणीखोर वक्तव्य असो, दिल्लीची दंगल हा पोलीस तथा हिंदू व्यापाऱ्या विरूद्ध नियोजित कट कारस्थन करून हिंसा घडविन्याचा सुनियोजित कट होता. आता सुद्धा कृषि कायद्याला विरोध करुन तथा शेतकरी आंदोलन माध्यमा मधून देश विरोधी तथा देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा आणि देश अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 
देशाच्या इतिहासामध्ये पंजाबच योगदान आहे पंजाबचा इतिहास शौर्य आणि पराक्रमाने रंगलेला आहे. शिख पंथ सदैव राष्ट्रहिता सोबत खंबीरपणे उभा राहिलेला आहे. पण प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये जो धिंगाणा घालण्यात आला तो धिंगाणा राष्ट्राचा अपमान करणारा आहे. राष्ट्रा अस्मितेच्या मुळावर हात घालणारा आहे. शेतकरी आंदोलनात शेतकरी रूपात घुसलेल्या शहरी नक्षली ,कम्युनिस्ट,फुटीरवादी,खलीस्थान समर्थक शक्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी राष्ट्र अस्मितेच्या मुळावर उठलेले हात कोणतीही तमा न बाळगता मुळासकट उपटून फेकण्याची आवश्यकता आहे.
(फोटो गुगल साभार. )

 

अशोक राणे

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Comments (0)
Add Comment