सहकार व आजची आर्थिक स्थिती
अर्थ जगात व सहकार ह्या विषयाचे मंथन करता “सहकार,सहकाराचे महाराष्ट्रातील स्थान , त्याची कार्य पद्धती ,सहकारामुळे झालेली महाराष्ट्रची आर्थिक प्रगती त्याच इतर निगडीत घटक ह्याबाबत आपल्या सर्वाना अवगत करणे आवश्यक आहे. जरी बिटीश काळात सहकाराची सुरवात झाली असे म्हटल्या जाते परतू हे संपुर्ण खरे नाही.
अगदी पुरातन काळl पासूनच ते आजपर्यत जी आर्थिक, सामाजिक, राजकीय वाटचाल सुरु आहे ,हि सहकारी तत्वानुसारच सुरु आहे. देशपातळीवर व त्याचप्रमाणे आपल्या राजाच्या विचार करता संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या भूमीला,पुरोगामी महाराष्ट्राला , सहकारी तत्वाची मुहर्त वाढ हि शिवाजी महाराज याच्या काळा पासूनच सुरु होऊन त्या चळवळीला पुढे नेण्याचे कार्य शाहू महाराज यांनी केले. तर हि चळवळ संपुर्ण महाराष्ट्र व्यापक व समुद्ध होण्याचे कार्य हे पद्मश्री विखे पाटील, धनंजय गाडगीळ व ह्या शेत्राशी जोडलेल्या व्यक्तीने केले आहे.
“सहकार “ ह्या संबधी कामकाज त्याचे स्वरूप व राष्टीय पातळीवर त्याला एक आगळे वेगळे स्वरूप देण्याचे कार्य म्हणजेच ९७ घटना दुरुस्ती सहकार चळवळीला एक नवा आकार देण्याचे कार्य हे मा.शरदचंद्र पवार साहेब यांनी केले आहे. त्याच प्रमाणे देशातील तथा राज्यातील विविध समाजातील घटक यांनी हि चळवळ सक्षम बनवण्यासाठी आपले फार मोठे योगदान दिले आहे.
देशाचा अथवा राज्याचा विचार करता सामाजिक,आर्थिक,राजकीय कामकाजात सहकाराचे योगदान हे फार मोठे आहे .”नही सहकार नही उद्धार “ हि म्हण अगदी चपलख येथे बसते.
अर्थ जगत व सहकार याचा अगदी जवळचा संबध आहे महाराष्ट्र राज्याचा विचार करता राज्यातील अनेक साखर कारखाने, सुतगिरण्या ,दुध संघ ,सहकारी बँका, सहकारी पत संस्था, मल्टी स्टेट संस्था या सर्व घटकाचा मोठ प्रभाव हा महाराष्टाच्या , अर्थिक सामाजिक प्रगतीच्या वाटचालीकडे दिसून येतो.
आधे मध्ये सहकार चळवळीत वाईट प्रवृत्ती मुळे सहकार चळवळीला काळिमा फासल्या जातो “सहकारातून स्व्ह्काराकडे “अशी कामकाज प्रणाली वापरून ह्या प्रवृत्ती सहकार चळवळ बदनाम करतात. दुर्दवाने ह्यांना हे उमजत नाही कि,थोड्याश्या लाभामुळे हे संपुर्ण सहकारी चळवळीला बदनाम करत आहेत. ह्यामुळे समाजाचे किती नुकसान होत आहे ,ह्याची यांना जाण यांना नाही,आर्थिक घोटाळे,अप्रतीशीत कर्मचारी वर्ग,भांडवली विचारधारा व इतर अनेक घटक यामुळे हि चळवळ बाधित करण्याचा प्रयत्न होत आहे.
अर्थ जग व सहकारी चळवळ :- नोटा बंदी ,विविध आयकर कायदे व इतर घटकांमुळे सहकारातील अनेक घटकानवर याचा फार मोठ परिणाम झाला आहे,अर्थातच बँका,पत्संथा,मल्टी स्टेट संस्था यांना दैनदिन कामकाज करणे फार कठीण होत आहे . आज रोजी महाराष्ट्र जवळ जवळ 500 च्या वर सहकारी बँका कामकाज करत आहेत तर १२००० अथवा १३००० च्या वर सहकारी संस्था कामकाज करत आहेत ,सर्व सामान्य जनाची आर्थिक,सामाजिक नाळ हि ह्या घटकाशी जोडली आहे,एकून लोक संखेच्या फार मोठ घटक हा ह्या सहकाराशी जोडला आहे. सहकारी संस्थाचा विचार करता कुठलेही आर्थिक पाठबळ नाही ,तरी सुद्धा अनेक जणांना रोजगाराच्या संधी ह्या संस्थांनी दिल्या आहेत ,अनेक कर्मचारी वर्ग असो कि दैनदिन प्रतिनिधी व त्याच प्रमाणे समाजातील धोटा वर्ग असू देत कि,ज्यांना अजूनही अर्थ साह्य सरकारी बँका तत्परतेने करत नाही अश्या अनेक घटकांना सामाजिक,आर्थिक ,राजकीय कार्यात मानाचे स्थान ह्या सहकार चळवळीने मिळून दिले आहे. ह्या सहकारी कामकाजामुळे साहजिकच समाजातील जातीयवाद,धर्मभेद,श्रीमत-गरीब दुरावा,स्त्री-पुरुष भेद ह्या घटकांवर फार मोठ परिणाम होऊन ह्यावर फार मोठ अंकुश आला आहे.
नव्यानेच आलेल्या “कोरोना “संकटामुळे जगाची व अर्थातच देशाची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे,परतू ह्यातून मार्ग हा काढावा लागणार आहे. समाजातील इतर घटकाप्रमाणे ह्या राष्टीय कार्यात सर्वांचा सहभाग हा अपेक्षीत आहे. सहकार चळवळ ,त्याचे कामकाज स्वरूप ,व्याप्ती पहाता सहकार क्षेत्र व सरकार यांनी रथाच्या दोन चाकानप्रमाणे हा आर्थिक रथ पुढे न्याचा आहे ,ह्या आर्थिक बाबींवर मात करून जगाला दाखून द्याचे आहे कि,किती संकट येऊ देत आम्ही घाबरणार नाही कारण आम्ही सर्व मीळून सामुहिक चळवळीतुन ह्या आजारावर विजय मिळवणार आहे, देशाने त्याचप्रमाणे सहकार क्षेत्राने याआधी अनेक –वाईट घटनावर विजय मिळवला आहे ,त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा देशाच्या पतंप्रधानान सोबत आहोत हे सर्वाना दाखवायचे आहे कारण “उद्याची एक सुंदर पहाट आमची वाट पाहत आहे ”
सचिन पटवर्धन .