शब्द म्हणजे विश्व
शब्द सुरेल तान
शब्दांत सांजवारा
शब्दांत अादर नी मान…
शब्दांच्या काठी
वसे स्वप्नांचा गाव
ओठावर खेळताना
शब्दांना उरावे भान
शब्दामुळे माणसाला
जागोजागी भाव
शब्द म्हणजे बकुळीचे
नाजुक फूल-पान
शब्द असते बंधन
शब्दांवर विश्वास
शब्दरंग आठवणी
शब्द नव्हे मोकळे रान
पांढरे केस झाल्यावर
शब्दाला मिळावा मान
उफाळणार्या शब्दांना
मिळावे विचारांचे म्यान
शब्दांमुळे स्वर्ग
पृथ्वीवर अवतरला
शब्दसुंदर लेणी
शब्दमधुर गान…
जन्मोजन्मी मिळावे आम्हा
सुंदर शब्दांचे वरदान!
© अश्विनी तेरेदेसाई-पाटील.पुणे .
८४४६०३३३४३