शिवराज्यभिषेकास ब्राम्हणांचा विरोध – समज अपसमज.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेकाचे तीनशे पन्नास वर्ष सुरू असून देशात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. शिवरायांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थिती मध्ये स्वराज्यची स्थापना केली होती याचे चिंतन, मनन करण्याची आवश्यकता आहे. परंतू आपलेच बंधू शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध, शिवरायांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावला, त्यांनी वैदिक पद्धतीचा राज्यभिषेक नाकारला, असे विषय करून समाजात संभ्रम व सामाजिक विद्वेष निर्माण करतात हिंदुस्तानात चौफेर इस्लामी सत्तेचे अत्याचार व अन्यायाचे थैमान माजले असतांना आणि हिंदू समाजात प्रचंड निराशेच्या अंधकारमय वातावरण असतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदू साम्राज्य स्थापन केले होती. शिवरायांनी दि २७ एप्रिल १६४५ रोजी सह्याद्री पर्वताच्या रांगेत असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेणारे त्यांचे सर्व सोबती सामान्य परिवारातील, वेगवेगळ्या जातीचे हिंदू होते. शिवराया सोबत कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर, नरसप्रभू गुप्ते यांच्या सारखे स्वराज्य निष्ठावंत सोबती होते. शिवरायांनी त्यांना आपल्या मातीच्या रक्षणासाठी व स्वराज्यसाठी हिंदू या संकल्पने खाली एकत्र आणले होते. पुढे शिवरायांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना भगव्या ध्वजाखाली एकत्र आणून संघटन बांधले स्वराज्य निष्ठावंत मावळ्यांची फौज उभी केली. त्यांच्या हृदयात स्वराज्य चे स्फुलिंग पेटविले होते. त्यामुळे भगव्या ध्वजा खाली एकत्र आलेल्या सामान्य परिवारातील शिवरायांच्या एका एका सामान्य मावळ्यांने असामान्य कर्तृत्व गाजविले प्राणाची बाजी लावत हिंदू विजयाच्या इतिहासाचा रचला. इस्लामी सिंहासने उलथापालथ केली होती. शिवरायांनी आपल्या सामान्य मावळ्याना सोबत घेऊन तीस वर्षे इस्लामी सत्त्ते सोबत संघर्ष केला. आणि हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदू साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्येष्ठ शु. त्रयोदशी ६जून १६८० रोजी शिवरायांचा राज्यभिषेक होऊन शिवराय लोककल्याणकारी राज्य मान्य राजे झाले. सह्याद्रीच्या कुशीत रायगड स्वराज्याची राजधानी झाली होती.. शिवरायांचा राज्याभिषेक तत्कालीन इतिहासातील एक महत्व पुर्ण घटना असून भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेला हिंदू समाज बलाढ्य इस्लामी सत्तेला पराभूत करून विजयी होऊ शकतो.. हा आत्मविश्वास निर्माण करणारी घटना होती. तसेच शिवरायांचा राज्याभिषेक देशातील हिंदूंच्या उज्वल भवितव्याची उज्वल पहाट व परकीय इस्लामी सत्ते साठी धोक्याची घंटी होती.. कारण राज्याभिषेका नंतर देशात हिंदु मध्ये नवचैतन्य निर्माण होऊन महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन देशातील हिंदू समाज इस्लामी सत्ते विरुध्द हातात शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज झाला होता. राजस्थान मध्ये दुर्गादास राठोड, बुंदेलखंड मध्ये छत्रसाल, बिहार मध्ये राजे रुद्र्सिंह, आसाम मध्ये चक्रध्वजसिंह, लचीत बोडफुकन यांच्या नेतृत्वात इस्लामी घुसखोरी तलवारीच्या जोरावर थांबून हिंदुस्तान इस्लामी सत्तेपासून मुक्त होण्यास सुरुवात झाली. शिवरायांचा राज्यभिषेक तत्कालीन हिंदू इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. पण देशात जेव्हा शिवराज्याभिषेक दिनाचा राष्ट्रीयउत्सव साजरा करण्यात येतो .तेव्हा आपलेच काही भाऊबंधू कपोलकल्पितखोट्या इतिहासिक घटनाचा कांगावा करून गोंधळ निर्माण करतात अनेक कपोलकल्पित घटना प्रस्तृत करून तरुणांचा बुद्धिभेद करण्यात येतो. त्यामुळे समाज विघातक शक्तीनी निर्माण केलेल्या षडयंत्रवर चर्चा करणे आवश्यक आहे. रायगडावर गागा भटांचे पाचारण. दि ६जून १६७४ रोजी काशीचे पंडित गागाभट्ट यांच्या नेतृत्वात रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक होऊन शिवराय प्रजा कल्याणासाठी छत्रपती झाले होते, पण राज्यभिषेकासाठी काशी वरून गागाभट्ट यांना का बोलविन्यात आले होते?असा प्रश्न विद्रोही मंडळी उपस्थित करून महाराष्ट्रातील ब्राम्हणानी राज्याभिषेकाला विरोध केला होता. असा कांगावा करून ब्राम्हणा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला जातो वास्तविक पाहता शिवरायांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी बाळाजी आवजी व मोरोपंत पिंगळे यांनीच केली होती. तसेच बाळाजी आवजी यांनीच केशव भट, भालचंद्र भट व सोमनाथ भट यांना काशी येथे गागा भट यांना भेटण्यासाठी पाठविले होते. त्याची इतिहासीक नोंद आहे प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या सोहळ्यास असंख्य ब्राम्हण उपस्थित होते व त्यांना शिवरायांनी सुवर्ण मुद्रा दान दिल्या होत्या त्या घटनेची सभासद बखर व यदुनाथ यांच्या साहित्यात इतिहासिक नोंदी सुध्दा उपलब्ध आहेत आणि उपस्थित ब्राम्हणांची आकड्याची संख्या सुद्धा दिलेली आह. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच ब्राम्हणांचा राज्यभिषेकास विरोध असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल तसेच काही ब्राम्हणांचा शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध असेल तर प्रस्थापित मराठ्यांचा सुध्दा विरोध होता .गोविंद पानसरे पासून अनेक लेखकांच्या पुस्तका मध्ये उल्लेख आहेत वास्तविक शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राम्हणांचा विरोध नव्हे तर नम्र नकार होता त्यांचे मुख्य कारण राज्यभिषेक संहिता किंवा पूजा विधीची प्रक्रिया लुप्त होणे हे मोठे होते ई.स.१२०० ते ई.स.१६४०पर्यंत हिंदूसमाज इस्लामी सत्तेच्या अधिपत्याखाली रंजला गांजला होता कोणालाही हिंदू संस्कृती नुसार आपले सण उत्सव,पूजापाठ, तीर्थाटन, करण्याचे स्वातंत्र्य नव्हते तसेच सतत इस्लामी सत्तेच्या जिझिया व ईतर कडक निर्बंध मुळे विविध पुजापद्धती धार्मिक विधी विस्मृत अथवा लुप्त झाल्या होत्या तसेच अनेक शतकापासून हिंदूराजांचा राज्याभिषेकच झाला नव्हता व भविष्यात हिंदूराजांचा राज्याभिषेक होईल हा विश्वास नव्हता त्यामुळेच राज्याभिषेकाचा विधी विस्मृत झाल्याने किंवा माहीत नसल्याने त्यांनी विरोध नव्हे. तर नम्र नकार होता असे दिसून येते तसेच शिवरायांचा राज्याभिषेक एक पूजा अथवा यज्ञ नव्हता राज्यभिषेक निर्विघ्न पार पडावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राम्हणांना राज्यभिषेक तंत्र अवगत नसल्याने त्यांनी नकार दिला होता आजही काही धार्मिक विधी काही ठराविक ब्राम्हणच करत असून त्यांचे धार्मिक विधी ठरलेले असतात नारायण नागबळी, दशक्रिया, उपनयन, गृहप्रवेश, वास्तुशांती, शतचंडी यज्ञ इत्यादी धार्मिक विधीचे प्रकार असून नारायण नागबळी व दशक्रिया विधीचे पंडित ठरलेले आहेत ग्रहशांती,गृहप्रवेश, लग्नकार्य विधी यांचे सुध्दा पंडित ठरलेले असतात एखाद्या ग्रामीण भागातील ब्राम्हणाला नारायण नागबळी विधी करण्याचे सांगितल्यास तो स्पष्ट विरोध नव्हे तर नम्र नकार देतो त्यांचा धार्मिक विधीला विरोध नसतो पण विधी करण्याचे तंत्र अवगत नसल्यमुळे नम्र नकार देत असतो. तोच विषय शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी झालेला आहे पण वस्तुस्थितीचा विचार न करता काही विद्रोही ठरवून ब्राम्हणानी शिवरायांच्या राज्यभिषकाला विरोध केला होता असा कांगावा करून हिंदु समाजात वैचारिक गोंधळ निर्माण करतात वास्तव मध्ये शिवरायांचे असंख्य सोबती ब्राम्हण होते व त्यांनी स्वराज्यसाठी तलवारी चालविल्या आहेत प्रसंगी मरण सुध्दा पत्करले आहे मुरारबाजी देशपांडे पासून बाजी प्रभू देशपांडे अनेक उदाहरण आहेत शिवरायांनी बादशाहाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून जेव्हा सुटका केली त्यामध्ये त्र्यंबकपंत डबीर व रघुनाथपंत तथा उत्तर भारतातील ब्राम्हणांची मदत असल्याची ईतिहासिक नोंद सुध्दा आहे अष्टप्रधान मंडळात आठ पैकी सात ब्राम्हण होते हे विसरण्या सारखे नाही पायाच्या अंगठ्याने टिळा लावणे शक्य आहे? छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध होता. असा कांगावा करणारी मंडळी राज्याभिषेकाच्या प्रसंगी गागा भटांनी शिवरायांच्या कपाळी पायाच्या अंगठ्याने टिळा लावला होता. असा कांगावा सुद्धा नेहमीच करीत असतात पण शिवराज्याभिषेकाच्या भव्य दिव्य सोहळ्याचा अभ्यास केल्यास त्या प्रसंगी शिवरायांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावणे शक्य आहे का? कारण शिवराय ज्या सिंहासनावर बसले होते ते सिंहासन बत्तिस मण सोन्याचे व चार- पाच फूट उंचीचे सिंहासन असावे त्यामुळे सिंहासनावर बसलेल्या शिवरायांना गागा भटांनी पायाच्या अंगठ्याने टिळा कसा लावला असेल? ही कल्पना कोणालाच मान्य होत नाही किंवा वस्तुस्थितीला धरून नाही वास्तविक काशीच्या विश्वेश्वराचे पुजारी व मूळ महाराष्ट्रायीन असलेल्या गागा भट्टांची शिवरायांवर प्रचंड आदर,श्रद्धा होती शिवरायांच्या पराक्रमाची ख्याती संपूर्ण देशात होती त्यामुळेच हिंदू धर्म, हिंदू मंदिरे व हिंदू संस्कृतीच्या रक्षणार्थ तलवार घेऊन लढणाऱ्या शिवरायांवरील श्रद्धेच्या पोटी गागा भट्ट काशी वरून राज्याभिषेका साठी रायगडावर आले होते ही सत्य वस्तुस्थिती आहे त्यामुळे गागाभटां कडून शिवरायांचा अपमान शक्य नाही तसेच रायगडावर संपन्न झालेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाचे वर्णन तत्कालीन देश विदेशातील लेखकांनी केलेल असून प्रचंड साहित्य उपलब्ध आहे पण त्या मध्ये य घटनेचा उल्लेख नाही रायगडावर स्वराज्यसाठी रक्त सांडणारे सर्व शिलेदार उपस्थित होते येसाजी ते हंबीरावांच्या उपस्थितीत शिवरायांचा अपमान होणे शक्य नव्हता व अपमान झालाच असता तर “ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो” व प्रतापगडच्या पायथ्याशी ज्या प्रमाणे स्वतः शिवरायांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तलवारीने फाडला होता त्याच प्रमाणे रायगडावरच गागा भट्ट सुद्धा निश्चित फाडला गेला असता किंवा रायगडावरून फेकला गेला असता त्यामुळे शिवराज्याभिषेकास ब्राम्हणांचा विरोध शिवरायांना गागा भटांनी पायाच्या अंगठ्याने टिळा लावला ही घटना कपोलकल्पित असल्याचे अनेकांचे स्पष्ट पुरावे असून असा कांगावा करणे म्हणजे एक शुध्द ढोंग आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अशोक राणे, अकोला भ्र.९४२३६५८३८५