सूर्यनमस्कार.

आज आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन

सूर्यनमस्कार.

मकरसंक्रांती पासून उत्तरायण सुरु होते. थंडीचा प्रकोप कमी होऊन उन तापण्यास सुरुवात होते. भारतीय संस्कृतीत १४ जानेवारी ते रथ सप्तमी पर्यंत मकर संक्रांत पर्व मनवला जातो. रथसप्तमी म्हणजे जगाला प्रकाश देणाऱ्या भगवान सुर्यनारायण यांची तेजोपासना / राधना करण्याचा दिवस. सूर्याच्या किरणातून निर्माण होणा-या तेज लहरी सर्व  कक्षापार करून जमिनीवर येतात सर्व सृष्टीला तेजोमय करतात. सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी सूर्य एक महत्वपूर्ण घटक आहे.  त्या अनुषंगाने सूर्यदेवतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी दिवस मनवला जातो. पूर्ण तेजश्री असलेल्या सूर्यनारायण ची उपासना या दिवसी केली जाते. म्हणूनच याच दिवसात सूर्यं नमस्कार दिन मानवीला जातो. सूर्यनमस्कार हा सूर्योदय अथवा सूर्यास्त या दोन्ही  वेळी घातले जाऊ शकतात. शिथिलीकरण चे व्यायाम झाल्यावर आधी सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील ताठरपणा कमी होत व आसनासाठी आवश्यक असलेला लवचिकपणा प्राप्त होतो. सूर्यनमस्कार हा आसने प्राणायाम या दोन्हीचा अंतर्भाव असलेला व्यायाम प्रकार आहे.  सूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायाम  आणि शारीरिक , मानसिक व आत्मिक शक्तीचा विकास घडविणारा शास्त्रशुद्ध प्रकार होय. याला सूर्योपासना अथवा बलोपासना असेही संबोधतात. सूर्यनमस्कार या शब्दात सूर्य आणि नमस्कार हे दोन शब्द येतात याचा अर्थ सूर्याच्या तेजाला नमस्कार. सूर्यनमस्कार म्हणजे सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी होय.
सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक भाग होय.  सर्वसाधारण सूर्यनमस्कार प्रातःकाळी सूर्योदय होत असताना अथवा सूर्योदयापूर्वी करतात त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. तसेच सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी मिळणारा कोवळा सूर्यप्रकाश हा आपल्या शरीरात जीवनसत्व डी प्रदान करतो जो आपल्या हाड मजबुतीसाठी आवश्यक आहे. तसेच जीवनसत्व डी मुळे आपली  रोग प्रतिकारशक्ती वाढून रोग निवारण्याची किमया साध्य होते. प्रातःकाळी आपले मन प्रसन्न असते व त्या वेळी सूर्यनमस्कार केल्याने माणसास दिवसभराच्या कामा साठी उत्साह कायम राहतो.
आजच्या करोना पार्शभूमीवर सर्व जगाने मान्य केले आहेकी आपल्याला आता करोना सहित जगावे लागेल त्यासाठी प्रतिकारशक्ती गरजेचे आहे. आणि सूर्यनमस्कारमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणून सूर्यनमस्कार हे वरदानच होय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या शरीराच्या तळपायापासून डोक्यापर्यंत च्या विकारमुक्ती साठी सूर्यनमस्काराचा उपयोग होतो. सुर्यनमस्कारामुळे ह्रदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. पचनक्रिया सुधारते.  छाती, हात, खांदे,बाहू व कंबर याचे स्नायू मजबूत व बळकट होतात. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा वाढतो त्यामुळे सर्व अवयवाची कार्यक्षमता वाढते. पाठीचा कणा , मनका ,कंबर लवचिक होते. वजन कमी होण्यास मदत होते. पायातील रक्ताभिसरण सुधारते. लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते. सूर्यनमस्कारमुळे शरीरातील सर्व सांधे, स्नायू,व आतील अवयवांना अतिरिक्त ताण देऊन त्यांना मोकळे केले जाते.व हलक्या प्रकारचा मसाज केला जातो.व शरीर सक्षम, सजग,सर्वसमर्थ होत्र.
सूर्यनमस्कार करण्याची पद्धत – सूर्याकडे तोंड करून दोन्ही हातानी नमस्कार मुद्रा करावी. सूर्यनमस्कार करण्याच्या दोन पद्धती आहेत.  पहिल्या पद्धतीत १२ अंकात आणि दुस-या पद्धतीत १०  अंकात सूर्यनमस्कार घातले जातात. सुर्यनमस्कारात एकूण १० स्थिती असतात. प्रत्येक स्थितीत एक आसन समाविष्ट असते म्हणून पूर्ण सूर्यनमस्कारमध्ये खालील  आसने असतात.तसेच सुर्यनमस्कारात सावकाश,व नियंत्रित हालचाल व पूरक असे श्वसनवरील नियंत्रण आवश्यक आहे. सूर्यनमस्कार मध्ये पूरक, कुंभक, व रेचक सहित स्वल्प प्राणायामही बसवलेला आहे.
·    पहिली स्थिती प्रार्थना अथवा नमस्कार आसन. (संथ श्वसन )
·    दुसरी स्थिती ताडासन / पर्वतासन  (श्वास घेणे )
·    तिसरी स्थिती हस्तपादासन  (श्वास सोडणे)
·    चौथ्या स्थितीत एक पाद प्रसरणासन  (श्वास घेणे)
·     पाचवी स्थितीला चतुरंग दंडासन / भूधरासन (ताठ तिरकी अवस्था)  (श्वास रोखणे),
·    सहाव्या स्थितीला अष्टांगासन     (श्वास सोडणे )
·     सातव्या स्थितीला भुजंगासन ,(श्वास घेणे )
·    आठव्या स्थितीला अधोमुख श्वास नासान (श्वास रोखणे)
·    नवव्या स्थितीला एकपाद प्रसारनासन (श्वास रोखणे )
·    दहाव्या स्थितीला हस्तपादासन (श्वास घेणे)
·    नमस्कारासन (संथ श्वसन )
·    दक्षासन (संथ श्वसन )
सूर्यनमस्कार ला मंत्राची जोड दिलेली आहे. प्रत्येक मंत्राच्या प्रारंभी उच्चारला जाणारा सर्व मंत्राचा बीजमंत्र असलेला ओंकार प्रथम उच्चारून नंतर सूर्यनारायण चे नाव उच्चारून त्याला नमन करून सूर्यनमस्कार करावा. सुर्यनारायनाची पुढील पैकी एक नाव घेऊन हे नमस्कार केले जातात.
१. मित्राय नमः , २.रवये नमः, ३. सूर्याय नमः,  ४. भानवे नमः,  ५. खगाय नमः,   ६. पूष्णे नमः,     ७. हिरण्यगर्भाय नमः,  ८. मरीचये नमः,
९. आदित्याय नमः,  १०. सवित्रे नमः,  ११. अर्काय नमः, १२. भास्कराय नमः, श्री सवित्रे  सुर्यानारायणाय नमः.
दक्षता –
·    सूर्यनमस्कार सावकाश, तालबद्ध, घालावेत, घाई गडबडीने , जबरदस्तीने घालू नये.
·    चक्कर, मळमळ गरगरल्या सारखे वाटल्यास साखर, मीठ, पाणी चे शरबत घेऊन शवासन करावे.
·    हालचाली संथ नियंत्रित, करून श्वसनची जोड ध्यावी.
·    धूम्रपान , मध्यपान,व्यसने करू नयेत.
·    श्वसन क्रिया नाकानेच करावी, तोंडाने श्वास घेऊ नये.
·    सूर्यनमस्कार उपासी पोटी करावा. जेवण नंतर किमान ३-४ तास सूर्यनमस्कार करू नये.
·    व्याधीग्रस्त , दुर्बल, रोगांनी पछाडलेल्या व्यक्तींनी, शस्त्रक्रिया झालेल्या, हाड मोडलेल्या व्यक्तीने  सूर्यनमस्कार डॉक्टर व तज्ञाच्या सल्ल्यांनी करावे.
·    सूर्यनमस्कार, योगसाधना करण्यासाठी जागा हवेशीर असावी.
अशा पद्धतीने सुर्यनमस्कारात योगासनाचा , प्राणायाम च्या अभ्यासाबरोबर सूर्यनारायण ची उपासना आहे. व मंत्राचे सामर्थ्यही आहे. म्हणूनच सूर्यनमस्कार ला सर्वांगपरिपूर्ण  व्यायाम म्हटले आहे.

(photo – bharamrishi.com)

डॉ. शांती लाहोटी

लेखक हे परळी वैजनाथ येथे रहिवासी असून, दुग्ध शास्त्र, माजी विभाग प्रमुख, दुग्ध तंत्र ज्ञान विभाग, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई. जि. बीड. येथील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. बळीराजा शेती मित्र, कृषी दूत, कृषी क्रांती पुरस्कार प्राप्त. परळी भूषण, समाज भूषण, शिक्षक भूषण आदी सन्मानित आहेत. १५० पेक्षा जास्त दुग्ध शास्त्र विषयाचे कृषी नियतकालिका मधून लेख प्रसिद्ध. योग साधक, योगाची शास्त्रीय माहिती मिळावी, योगाभ्यासला ज्ञानाची झळाळी प्राप्त व्हावी म्हणून वयाच्या ७० व्या वर्षी, M. A. योगशास्त्र ला प्रवेश. त्याच उत्साहाने अभ्यास. फोन - 9421375285

Comments (1)
Add Comment
  • Bhalchandra Bansidhar Rode

    खुप छान लेख.