स्वच्छ भारत का इरादा.

स्वच्छ भारत का इरादा…

“स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने” आठवड्यातून तीन दिवस हे गाणं ऐकायला मिळतं, सगळेजण आपापल्या घरातील साठलेला कचरा घेऊन बाहेर येतात. कधी ओला-सुका वेगवेगळा असतो, तर कधी एकत्र. गेली तीन वर्षे नियमित हा कचरा गाडीवाला आमच्या कोलोनीत येतो आणि कचरा घेवून जातो.
आजही कचरा गाडी आली. गाणं वाजलं. त्यावेळी मी दैनिकात बातमी वाचत होतो ती, राजधानीतील राजघाटावर बांधल्या गेलेल्या, “राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या” उद्घाटनाची. “गंदगी भारत छोडो” या अभियानाची. मला आठवली ती 2018 साली राबविली गेलेली ती स्वच्छता मोहीम. भटके विमुक्त कल्याणकारी परिषद/संस्थे द्वारा भटक्या समाज बांधवांच्या वस्त्यांवर ही स्वच्छता मोहीम राबविली गेली. यात साऱ्याच वस्त्यांवर आठवड्यातून एक दिवस स्वच्छता केली जायची. त्याचे फोटो whatsapp वर टाकले जायचे. अर्थात आमच्या वार्षिक नियोजनातील स्वच्छता, हा एक महत्वाचा बिंदू होता.
२०१४ च्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजीनी आपल्या पहिल्याच राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात, या मोहिमेचे सुतोवाच केले. स्वच्छता आणि घरोघरी शौचालय हे त्यांच्या पहिल्या भाषणातील गाजलेले शब्द होत. आज मागे वळून बघितल्यावर त्याची महती जाणवते आहे. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असाच त्याचा उल्लेख करावा लागेल.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 ला त्यांना, “स्वच्छ भारताची” भेट देण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला. आणि या स्वच्छ भारत अभियानाची प्रत्यक्ष सुरवात केली ती 2 ऑक्टोबर २०१४ च्या गांधी जयंती पासून.
या अभियानाचा मुख्य उद्देश असा होता की, अधिकाधिक लोकांनी एकत्र यावं आणि स्वच्छता हा एक मंत्र व्हावा. स्वच्छ भारत अभियान| जनसहभागातून समोर आलेले हे जनांदोलन. यासाठी सर्वच स्तरांवर भरपूर प्रयत्न केले गेलेत. नियोजन, आराखडा, लोकांना जोडणे अशा तयारीनिशी, स्वत: मोदिजीनी “प्रधान सेवक” या नात्याने हातात झाडू घेऊन अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. तर पदयात्रे मध्ये सुद्धा सहभागी झालेत. याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. बघता बघता या आंदोलनाने चळवळीचे रूप घेतले. एका कार्यक्रमात पुस्तक विमोचानाचे वेळी पुस्तक वरील गुंडाळलेलाला कागद खिशात टाकून एक आदर्श प्रस्तापित केला होता. अगदी मनापासून केलंले हे कार्य. जनसामान्यांनी सुद्धा पुढे येऊन सहकार्य केले. गाव, पाडा, वस्त्या, शहरे, सार्वजनिक स्थळे, बस स्थानक, रल्वे स्थानक, यातून स्वच्छता अभियान राबवले गेले. स्वत: स्वच्छता राखायची आणि इतरांना ती राखण्यास मार्गदर्शन करायचे. “न गंदगी करेंगे, न करणे देंगे हा मंत्र त्यांनी दिला. या स्वच्छ भारत अभियाना सोबतच “घरोघरी शौचालय” ही मोहीम सुद्धा जोर धरू लागली. देशातील कानाकोपर्यात अशा स्वच्छग्रहींची फौजच तयार झाली. म्हणूनच साठ महिन्यात साठ कोटी शौछालये तयार होवू शकलीत.
कुणी या अभियानात प्रत्यक्ष सहभागी झालेत तर कुणी गाणी गावून, स्वच्छतेच महत्व पटवून देवू लागले. अशातच काही गीत खूप गाजली. “गाडीवाला आया, घरसे, कचरा निकाल..” हे मध्यप्रदेशातील मंडला येथील गीतकार, श्री शाम बैरागी यांनी लिहून गायिललेलं गीत. स्वच्छतेशी संबंधित असलं, तरी आबालवृद्धांच्या मनात ठसलेले हे गीत. “तो क्या करें भय्या” असा ठसक्यात विचारलेला प्रश्न हास्याची लहर पसरवितो. आज “कचरा गाडी दारी आली” ह्याची जाणीव या गीताच्या माध्यमातून गल्ली बोळातून होते, हे विशेष.
“स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने” हे प्रसून जोशी यांनी लिहिलेलं गीत, प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गायिलेल आहे. “हर गली अब उन्नती की राह जायेगी, धूप आशा की आंगण-आंगण गायेगी, स्वप्न गांधीजी का अब साकार करना है| स्वच्छता का देश मे अब त्यौहार करना है|. अत्यंत मार्मिक असलेल्या या ओळी, स्वच्छते प्रती कटीबद्धता दर्शवितात.
‘कचरा सुखा और गिला, सबने मिलाकर डाला, कचरने लेली सबकी जान, गौर से सुनिये मेहरबान, आई हो कहासे गोरी, कचरेका ये बॅग लेके, फोकट मे मिलनेवाली थैली, ये चार लेके, पुणे शहर का सारा सबजी बाजार लेके, कॅरिबॅग ये प्लॅस्टिकवाला, इसको आदत कर डाला, ये आदत ने लेली सबकी जान, गौर से सुनिये मेहरबान…’ हे गाणे गात महादेव जीवराज जाधव पुण्यात स्वच्छतेचा संदेश देत आहेत. प्लास्टिक बॅग वापरू नका, रस्त्यावर कचरा फेकू नका, असे आवाहन जाधव सतत नागरिकांना करत असतात.
समाजात आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टिने विचार करून आकाराला येणाऱ्या ‘लेट्स चेंज’ या डॉक्युड्रामाने स्वच्छतेचा मंत्र घराघरात पोहचविण्यासाठी मोहिम राबविली. हळूहळू त्यांच्या या मोहिमेची जादू सर्वदूर पसरते आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो, ही या डोक्यूमेंत्ट्रीची संकल्पना.
अनेक व्हिडीओ, चित्रपट, सिरियल्स, जाहिराती यांतून जनजागृती केली गेली.
जागो जागी दिसणारे “स्वच्छ भारत मिशन” च्या चष्म्याचे चित्र, आम्हा भारतीयांच्या स्मृती पटलावर कायमचे कोरले गेले आहे.
नित्याप्रमाणे, विरोधकांनी यावर टीका केली नसती तरच नवल? या अभियानाची उडविलेली “खिल्ली”, आज त्यांना तोडात बोटे घालायला लावत आहे.
“एक कदम स्वच्छता की ओर…’ या एका घोषवाक्याने जनमानसात स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली आहे. या स्वच्छ भारत अभियाना द्वारे खरोखरीच देशवासीयांचा आत्मविश्वास आणि आत्मबल वाढले आहे, एक सामाजिक चेतना जागृत झाली आहे यात शंकाच नाही. आपल्या सवयी मध्ये बदल झालेला आहे. एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. रेल्वे स्टेशने आधुनिक दिसायला लागलीत. शासकीय कार्यालयातील कोपरे आता बऱ्यापैकी स्वच्छ दिसायला लागलेत. या स्वच्छता अभियानाने भारतीयांचा आत्मसन्मान वाढविला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा सुधारण्यास कारणीभूत ठरला आहे.
“राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची” घोषणा पंतप्रधान मोदींनी 10 एप्रिल 2017 ला गांधीजींच्या “चंपारण्य सत्याग्रह” समारंभाच्या वेळी केली होती. प्रत्यक्षात 8 ऑगस्ट 2020 या दिवशी या केंद्राचे “लोकार्पण”, म्हणजे, भारतीयांनी महात्मा गांधीना वाहिलेली श्रद्धांजली म्हणायची. स्वच्छटा उपक्रमांची माहिती देणारी दलाने, राबविलेले उपक्रम यांचे समग्र दर्शन घडविणारे केंद्र असा या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचा लौकिक आहे.
महात्मा गांधी यांचे संकल्प “स्वराज्यापासून सुराज्याच्या” भावनेला अनुरूप आहेत. “गंदगी भारत छोडो” हे त्याच कडीतले एक अभियान, आठवडाभर राबविले जाणार.
स्वच्छता अभियानाला प्रचंड प्रमाणामध्ये जे काही यश लाभलं होतं त्याचा परिपाक की आपल्या देशामध्ये या “कोरोना महामारी” ने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले हात-पाय पसरले नाहीत.
कुठल्याही गोष्टीची चळवळ सुरू व्हायची असेल तर त्यासाठी कुठलातरी एक मंत्र लागतो. “स्वच्छ बनेगा ये भारत” हा एक मंत्र झालेला आहे. आणि स्वच्छतेचा हा मंत्र या स्वच्छता अभियानाचा “प्राण” ठरलेला आहे.
एखादी सर्व यशस्वी होण्यासाठी जनसामान्यांचा सहभाग अत्यंत आवश्यक असतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे “स्वच्छता अभियान”. या स्वच्छता अभियान संपूर्ण भारत निश्चितपणे पिंजून काढलेला आहे आणि आज त्याची चांगली फळे आपल्याला दिसायला लागली आहेत. आजच्या या कोरोना आपदेच्या काळात, नका तोंडावाटे पसरणाऱ्या आजारावर मत करण्यासाठी, “दो गज दुरी, मास्क है जरुरी” या उक्तीचे पालन करून निरंतर चालणाऱ्या स्वच्छता अभियानात सहभागी होवू या.

श्रीकांत भा. तिजारे

लेखक हे पोस्ट बीएससी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स झालेले असून एका खाजगी कंपनीत 26 वर्ष नोकरी केली. सध्या गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, बाल विहार, गोकुळ साठी लिखाण आणि कार्यक्रम सादर. वृत्तपत्रांमध्ये समयोचित लिखाण. भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या कार्यात सहभाग. गेली चौदा वर्ष, कर्क रोग जनजागृती अभियान आणि समुपदेशन म्हणून कार्यरत. मोबा - ९४२३३८३९६६

Comments (0)
Add Comment