स्वातंत्र्य लढ्यात तिरंगा ध्वज फडकविणारे स्वयंसेवक किसनसिंह राजपूत.

स्वातंत्र्य लढ्यात तिरंगा ध्वज फडकविणारे स्वयंसेवक किसनसिंह राजपूत –

आपल्या देशात दि ९ ऑगस्ट क्रांतीदिन ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या काळात देशभक्ती पर्व साजरे करुन स्वतंत्र लढ्यातील योद्ध्यांना स्मरण केले जाते. शाळा,कॉलेज ईतर स्थानी भारतीय स्वतंत्रता संग्रामाचा इतिहास मांडला जात असतो. त्याच वेळी संघ विरोधी लेखक पत्रकार सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमध्ये भारतीय स्वतंत्र लढ्यातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे योगदान काय ? तिरंगा ध्वजावर संघाची आस्था नाही ? असे प्रश्न उपस्थित करून संघाच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण करून भारतीय स्वतंत्र लढ्यातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे योगदान नाकारण्याचा करंटेपणा करतात. दि ९ऑगस्ट ते १५ऑगस्ट देशभक्ती पर्व साजरे केले जात असताना याच देशभक्ती पर्व काळात संघ विरोधी टोळ्या संघ विरोधाचा शिमगा साजरा केला जातो. वास्तविक भारतीय स्वतंत्र लढ्याचां विचार केल्यास काँग्रेस नेतृत्वात एकूण तीन लढे झाले आहेत. असहकार चळवळ किंवा सविनय कायदेभंग,मिठाचा सत्याग्रह व चलेजाव चळवळ या तिन्ही लढ्या मध्ये संघ स्वयंसेवकांचे योगदान राहिलेले आहे. असहकार आंदोलन व मिठाचा सत्याग्रह मध्ये संघ संस्थापक डॉ केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा सहभाग होता व त्यासाठी त्यांना दोन वेळा सश्रम कारावास सुद्धा झालेला आहे.१९४२ च्या चलेजाव चळवळीत सुद्धा संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते चिमूर मध्ये बालाजी रायपूरकर हा १६वर्षाचा संघ स्वयंसेवक ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळीचा बळी ठरला होता. त्यामुळे स्वत्रंत लढ्यातील संघाचे योगदान नाकारणे मूर्खपणा ठरेल तसेच भारतीय स्वतंत्र लढ्याचां विचार केल्यास, त्या वेळी काँग्रेस अर्थात महासभा राजकीय पक्ष नव्हता तर एक स्वतंत्र आंदोलन होते व सर्वच पुढारी काँग्रेसच्या झेंड्या खाली लढत होते .

ग्रामगीतेत रा.स्व.संघाचा उल्लेख — भारतीय स्वतंत्रता लढ्यात काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन होते व देशातील सर्व संघटनाचे कार्यकर्ते लढ्यात सहभागी होते संघाचे स्वयंसेवक सुद्धा होते व याची नोंद राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या ग्रामगीता आहे सदर उल्लेख स्वतंत्र लढ्यातील संघ व ईतर संघटनाचे योगदान अधोरेखित करतो. ग्रामगीतेतील राष्ट्रसंत संक्षिप्त जीवन दर्शनात राष्ट्रसंतांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ,भारत सेवादल कुस्तीगिरांचे आखाडे आदी संस्थामध्ये जाऊन”जाग उठो बालवीरो अब तुम्हारी बारी है”म्हणून ललकारी दिली होती. आपल्या प्रभावी भजन भाषणातून राष्ट्रीयतेची दिक्षा देणाऱ्या महाराजांनी १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात अपूर्व रंग भरला. याच प्रात्याक्षिक चिमूर- आष्टीला दिसल ग्रामगीतेतील उपरोक्त संदर्भा मुळे स्वतंत्र लढ्यातील संघ व ईतर संघटनांचा सहभाग अधोरेखित होते. स्वतंत्र लढ्यातील सर्वात मोठा लढा चलेजाव चळवळ म्हणून ओळखला जातो दि ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई मधील गोवलिया टँकवर काँग्रेसचे अधिवेशन भरले होते म. गांधी यांनी “करा किंवा मरा” अशी भूमिका घेऊन चले जाव चळवळ सुरू केली होती. सर्व देशभर ब्रिटिशा विरुद्ध प्रक्षोभ उसळला सत्याग्रह, धरणे आंदोलन, प्रभात फेरी अशा चळवळीला देशभरात सुरूवात झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विविध भागात उमटले चिमूर व आष्टी येथे मोठे आंदोलन झाले त्यामध्ये संघाचे स्वयंसेवक आघाडीवर होते चिमूर आंदोलनाची दखल तर बर्लिन आकाशवाणी घेतली होती.

 

तिरंगा ध्वज फडकविणारे किसनसिंह राजपूत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते.  तिरंगा ध्वजा सन्मान करीत नाहीत किंवा त्यांना तिरंग्या ध्वजा विषयी आस्था नाही अशी कोल्हेकुई सतत होत असते, परंतु भारतीय स्वतंत्रता लढ्याचा मागोवा घेतल्यास संघ स्वयंसेवकांनी तिरंगा ध्वजाचा सन्मान केल्याचे लक्षात येते सन १९३६ साली २७ ते २८ डिसें.काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन फैजपूर येथे होते. त्या अधिवेशन मध्ये घुळे जिल्ह्यातील शिरपुरचे संघचालक बाबुराव वैद्य व शाखेचे स्वयंसेवक किसनसिंह राजपूत पोहचले होते. बाबुराव वैद्य स्वतंत्र लढ्यातील सहभागा मुळे तुरुंगवास भोगुन आलेले होते. काँग्रेसचे पुढारी अच्युतराव पटवर्धन यांनी स्वतः शिरपूर येथे जाऊन बाबुराव वैद्य यांना अधिवेशन मध्ये येण्याचे निमंत्रण व शिरपूर भागातील देशभक्त तरुण वर्गास अधिवेशन स्थळी आणण्याची जबादारी दिली होती. अधिवेशनात म.गांधी ते प.नेहरू पासून सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. अधिवेशनाची सुरूवात प. नेहरू तिरंगा ध्वज फडकवून करणार होते त्यासाठी ३०फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभा करण्यात आला होता प्रत्यक्ष प.नेहरू ध्वजारोहणसाठी ध्वजस्तंभा जवळ आले आणि ध्वजाच्या दोरीची गाठ ओढली परंतू गाठ सुटत नव्हती व ध्वज सुद्धा फडकत नव्हता त्यामुळे अधिवेशन स्थळी तारांबळ उडाली. ध्वजस्तंभ ३० फूट उंची कोणी पार करत नव्हतो शेवटी १६ वर्षाचा संघ स्वयंसेवक किसनसिंह राजपूत यांनी धोका पत्करून ३०फूट उंचीचे अंतर काही क्षणात कापून तिरंगा ध्वज मोकळा करून हवेत फडकविला. अधिवेशन स्थळी उपस्थित जनसमुदायाने प्रचंड घोषणा देत किसनसिंहचे कौतुक केले. किसनसिंह गर्दी मधुन संघचालक बाबुराव वैद्य यांच्या जवळ जाऊन बसले किसनसिंह यांना काही राशी देऊन सत्कार करण्याचे सुद्धा ठरले पण काही कारणास्तव सत्कार झाला नाही. फैजपुरची घटना जेव्हा डॉ. हेडगेवार यांनी माहीत झाली तेव्हा ते घूळे येथील संघ शाखेवर किसनसिंह यांचा चांदीचा पेला देऊन सत्कार केला व मनोगत व्यक्त करण्यास सांगितले ध्वजाचा सन्मान करण्याचे संस्कारआम्हाला संघाच्या शाखेत मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले होते. ऑगस्ट १९९३ मध्ये किसनसिंह यांचा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने गौरव पत्र देऊन सन्मान सुध्दा केलेला आहे.

गोवा मुक्ती संग्राम मध्ये संघ आघाडीवर — भारतीय स्वतंत्रता लढ्यातील काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात तिरंगा ध्वज फडकविणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक किसनसिंह राजपूत आणि चलेजाव चळवळीत चिमूर च्या लढ्यात ब्रिटिशांच्या बंदुकीची गोळी झेलणारे बालाजी रायपूरकर सारखे असंख्य स्वातंत्रता सेनानी “तेरा वैभव अमर रहे, मॉ हम दिन चार रहे न रहे” आणि “परं वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रम” या स्वभाव गुण व आदर्शनुसार स्वतंत्र लढ्यात लढले त्यांनी आपल्या कार्याचा कोठेही लेखाजोखा ठेवला नाही. तसेच स्वतंत्र लढया प्रमाणे गोवा मुक्ती संग्राम मध्ये संघाचे स्वंयसेवक आघाडीवर होते संघाचे प्रचारक स्व.जगन्नाथ जोशी यांची त्यामध्ये महत्वाची भूमिका होती. परंतू स्वतंत्र लढ्यातील इतिहासात अज्ञात राहिलेले आहेत स्वातंत्र्य प्राप्तिनंतर काँग्रेसने स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्व श्रेय आपल्या पदरात पाडून घेतले व राजकीय सत्तेचा मनमुराद आनंद लुटला आहे. स्वतंत्रता सेनानी यांना योग्य न्याय देण्यात आला नाही उलट राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे योगदान नाकारण्याचा संघाला बदनाम करण्याचा करंटेपणा सतत करीत आहे.

अशोक राणे. अकोला भ्रम.९४२३६५८३८५

Comments (0)
Add Comment