स्वीडनमधील दंगलीचे दूरगामी परिणाम

स्वीडनमधील दंगलीचे दूरगामी परिणाम

स्वीडनमधील दंगलीचे दूरगामी परिणाम दिसून येतील कारण आज जग कट्टरपंथीय मुस्लिमांच्या दहशतवादामुळे त्रासले आहे. स्वीडन एक प्रगत, समृद्ध आणि शांत देश आज दंगलीमुळे चर्चेत आला आहे. जगातील कोणत्याही देशानी कल्पना देखील केली नसेल की स्वीडन सारख्या देशात दंगल होऊ शकते. आता तर त्या दंगलीचे लोण नार्वेमध्ये पण पसरले आहे आणि इतर देशात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दंगलीचे कारण जेव्हा स्वीडनच्या राष्ट्रवादी पक्ष स्ट्रैम कुर्सचा नेता रॅसमस पालुदन याला गुरुवारी स्वीडनमधील माल्मो शहरात ‘नॉर्डिक देशांमध्ये इस्लामीकरण’ या विषयावर आयोजित एका सेमिनारमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र स्थानिक प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था लक्षात घेवून पालुदन यांना परवानगी नाकारली होती. जेव्हा त्यांनी शहरात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. पालुदनच्या अटके विरोधात शुक्रवारी त्याच्या समर्थकांनी माल्मो शहरात मुस्लिम धर्मग्रंथ कुराणच्या काही प्रती जाळल्या तेव्हा दंगलीला सुरवात झाली. स्वीडनच्या राष्ट्रवादी पक्ष स्ट्रैम कुर्सचा नेता रॅसमस पालुदन याच्या समर्थकांनी जे केले त्याचे कोणीच समर्थन करणार नाही पण मुस्लिमांनी केलेली दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड हे ही चुकीचेच आहे. स्वीडनमधील दंगलीची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी पहले स्वीडनच्या भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. स्वीडन हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया,  लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे. स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, आइसलँड आणि ग्रीनलँड या देशांच्या समूहाला नार्डिक देश म्हटले जाते. या देशांची लोकसंख्याही खूप कमी होती आणि त्यात मुस्लिमांची लोकसंख्या तर नगण्यच होती. पण गेल्या काही वर्षांत मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्यामुळे त्या देशातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय समस्येत प्रचंड वाढ झाली. परिणामी मुस्लिमांच्या प्रखर विरोधामुळेच स्वीडनमध्ये दंगल सुरू झली.

स्वीडनमधील दंगली कडे जर आज सामान्य घटना म्हणून दुर्लक्ष केले तर भविष्यात स्वीडनलाच नव्हे तर संपूर्ण युरोपला याचे वाईट परिणाम भोगावे लागेल. गेल्या काही वर्षांपासून जगभरात सुरु असलेल्या इस्लामिक देशांमधील इसिस आणि तालिबान सारख्या मूलतत्त्ववादी कट्टरपंथी संघटनांच्या उदयामुळे सीरिया, इराक व अफगाणिस्तानामधून मुस्लिम निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये दाखल झाले. मानवतावादी दृष्टिकोनातून युरोपने त्यांना आश्रय दिल्यामुळे युरोपात मुस्लिमांच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली. मुस्लिम मानसिकते प्रमाणे सुरवातीला मुस्लिम त्या देशातील काही भागात आपली वस्ती करून राहू लागतात. जसजसे त्यांची लोकसंख्या वाढत जाते तसतसे ते त्या त्या भागावर आपला कब्जा करत जातात. पुढे त्या भागात इतरांना प्रवेश दिला जात नाही. मग त्या भागात मुस्लिम धर्माचे नियम लागू केले जाते. जन्मदर वाढवून आणि धर्मांतर करून लोकसंख्येचे प्रमाण वाढले की मुस्लिम त्या देशातील सरकारला आपले धार्मिक नियम पाळण्यासाठी दबाव आणतात. मुस्लिम त्या देशातील नियम तर पाळत नाहीच उलट कुराणातील जिहाद आणि शरीया कायद्याचे काटेकोर पणे पालन करतात. त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच जगातील ज्या देशात मुसलमानांचे प्रमाण जास्त असते त्या देशात नेहमीच दंगली होत असतात. निर्वासितांमुळे आज युरोपीय देशात गुन्हेगारीचे, हिंसाचाराचे आणि अलगाववादाचे प्रमाण वाढले आहे. युरोपातील फक्त पोलंड देशाने निर्वासितांना आश्रय नाही दिल्यामुळे तिथे दंगली होत नाही हा त्याचा धडधडीत पुरावा आहे. प्यू रिसर्च प्रॉजेक्शनच्या संशोधना प्रमाणे येणाऱ्या काही वर्षांत यूरोपातील मुसलमानांची संख्या दुप्पटी पेक्षा जास्त होईल. यामुळेच स्वीडन, नार्वे आणि अन्य युरोपीय देशांत राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि अखंडतेसाठी मुस्लिम निर्वासितांन विरोधात आंदोलने सुरू आहे. आज युरोपात प्रखर राष्ट्रवादी विचारसरणी व राजकीय पक्षांचा उदय होत आहे आणि त्याला जनमताचा पाठिंबाही हळूहळू वाढत आहे. फ्रान्सच्या व्यंग्य साप्ताहिक ‘शार्ली हेब्दो’ ने मंगलवार 1 सप्टेंबरला पैगंबर मोहम्मदचा विवादास्पद कार्टूनला पुन्हा प्रकाशित केले हा युरोपातील दहशतवाद विरोधाचा पुरावा आहे. पण वामपंथी विचारसरणी व राजकीय पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी कट्टरपंथी मुस्लिमांच्या सर्व अटी मान्य करतात. आज जगात वांमपंथी आणि दक्षिणपंथी विचारसरणीत तीव्र संघर्ष सुरू आहे. स्वीडनमधील दंगली पासून धडा घेऊन युरोपीय देशांनी योग्य उपाययोजना करावी.

स्वीडनमधील दंगलीमुळे भारतात वांमपंथीय आणि दक्षिणपंथीय विचारसरणीच्या पक्षांमध्ये वादविवाद सुरू झाले. भारतातीयांची अशी मानसिकता तयार करण्यात आली आहे की वामपंथी विचारसरणी आधुनिक, परोगामी व धर्मनिरपेक्ष आहे आणि दक्षिणपंथीय विचारसरणी परंपरावादी, प्रतिगामी व सांप्रदायिक आहे. भारतात धर्मनिरपेक्षतेचे राज्य स्थापन करण्यासाठी भारताच्या वामपंथी विचारसरणीच्या सरकारने भारतीयांना प्रचीन भारतीय संस्कृतीचा सत्य इतिहासा ऐवजी मैक्समूलर ने लिहलेला चुकीचा इतिहास शिकविला. आज भारतीयांना हजार वर्षात कट्टरपंथीय मुस्लिमांमुळे भारताचे आतोनात नुकसान झाले हे माहितच नाही. त्यामुळेच प्रचीन भारताचे भाग असलेले अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश मुस्लिम बहुल झाल्याने भारतापासून विभाजित झाले. स्वतंत्र भारताचे राज्यकर्ते वांमपंथी विचारसरणीचे असल्याने त्यांनी जगाला आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखविण्यासाठी सतत मुस्लिम तुष्टीकरणचे राजकारण केले. आज भारतात वामपंथीय मुस्लिम तुष्टीकरणासाठी राम मंदिर भूमीपूजन, काश्मीरच्या 370 व 35ए कलम रद्द करण्याचा कायदा, त्रिपल तलाक कायदा, सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायदा, समाननागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदाला मोठ्या प्रमाणात विरोध करतात. उलट आतंकवाद्यांचे, अलगाववाद्यांचे आणि तुकडे तुकडे गैंगचे समर्थन करतात. स्वीडनच्या राष्ट्रवादी विचारांच्या पक्ष आणि संघटनांनी भारताच्या राष्ट्रवादी विचारांच्या पक्ष आणि संघटनांनी मुलतत्ववादी कट्टरपंथी वामपंथीयांन विरोधात केलेल्या कार्याचा आभ्यास करून रणनीती आखावी. स्वीडनमधील दंगलीचा जगाच्या राजकारणात दूरगामी परिणाम होईल आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वीरेंद्र देवघरे

लेखक हे धर्म, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. मो.- ९९२३२९२०५१.

Comments (0)
Add Comment