(UPA + चीन) vs मोदी सरकार.
तत्कालीन संरक्षणमंत्री व ‘दस जनपथ चप्पलचाटू क्लब’ मधील एक असलेले ए.के.अँथनी संसदेत निर्लज्जपणे, हसत-हसत बोलले होते की आम्ही बॉर्डरजवळ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत नाहीये जेणेकरून चीन ला आत घुसायला अवघड होईल! एक असा UPA काळ देशाने बघितला होता.. आणि आता एक मोदी सरकारचा काळ आहे. बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर फोकस ठेवत भारतीय सैन्याला बळ द्यायचं कर्तव्य हे सरकार पार पाडत आहे. चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत लक्ष ठेवून आहे आणि भारत आता चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे..
सीमेवर सैनिकांची तैनाती असो किंवा पायाभूत सुविधांची उभारणी असो, भारत सरकारने आता प्रत्येक आघाडीवर ड्रॅगनशी लढण्याची तयारी केली आहे. आता भारताने एलएसीवरील चुशूल ते डेमचौक हा 135 किमी लांबीचा महामार्ग पुढील दोन वर्षांत बांधण्याच्या कामाला 26 जानेवारी रोजी सुरुवात केली आहे. LAC च्या बाजूने बांधलेल्या या महामार्गाच्या माध्यमातून चीनचा मुकाबला करणे भारतीय सैन्याला सोपे होणार आहे. हा रस्ता CDFD रोड म्हणूनही ओळखला जातो. हा हायवे बांधण्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे..
मागील अनेक दशके याठिकाणी भारताला हा रस्ता उभारता आला नाही. सोनिया-जिनपिंग यांच्या साक्षीने झालेला काँग्रेस-चीन गुप्त करार आणि UPA ला समर्थन देणाऱ्या इतर पक्षांमधील ‘राजकीय इच्छाशक्तीचा अभाव’ हे या मागचे प्रमुख कारण होते. हा महामार्ग सिंधू नदीपासून लेहमधील भारत-चीन सीमेपर्यंत LAC च्या बाजूने धावेल. पलीकडे चीनने सीमेवर भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या असताना हा रस्ता का बांधला जात नाही, असा प्रश्न भारतीय अधिकाऱ्यांनी अनेकदा उपस्थित केला होता, पण UPA सरकारने त्याकडे जाणूनबुजून काणाडोळा केला होता. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की चुशूल हे तेच क्षेत्र आहे जिथे 1962 मध्ये रेंजाग ला ची लढाई झाली होती, तर डेमचौक हे एक क्षेत्र आहे जिथे भारतीय व चिनी सैनिकांमध्ये संघर्षाचा इतिहास आहे.
त्याव्यतिरिक्त, BROने गेल्याच महिन्यात लडाखमधील नैमो एअरफील्डच्या बांधकामासाठीही निविदा मागवल्या आहेत. नैमो एअरफील्ड हे सर्वात उंच विमानतळ असेल. येथून LAC फक्त 50 किमी आहे. त्याच्या बांधकामासाठी एकूण 214 कोटी रुपये खर्च येणार आहे. चीनच्या सीमेवरील वाढत्या कारवायांना चाप बसवण्यासाठी हे अत्यावश्यक होते. LACवरील परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून सतत बदलत आहे. त्यामुळे अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत, जी भारतीय सेना व भारत सरकार समर्थपणे हाताळत आहेत.
यासर्वात, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना फक्त एवढंच दुःख असेल की अशावेळी सोनिया कोंग्रेस भारतात सत्तेवर नाही! असो!
जय हिंद!
– वेद कुमार.