विद्येची  देवता सरस्वतीच, सावित्रीबाई  प्रेरणास्थान

लेख

विद्येची  देवता सरस्वतीच, सावित्रीबाई  प्रेरणास्थान  

जाने सावित्रीबाई फुले यांची जयंती त्या दिवशी त्यांना स्मरण करून  कृतज्ञता, वंदना करण्याचा दिवस समाजाला एका सूत्रात बांधण्याचा तो दिवस पण दुर्दैवाने सावित्रीबाई फुले जयंती दिवसाचे औचित्य साधून काही ढोंगी पुरोगामी मंडळी विद्येची देवता सरस्वती की सावित्री असा विवादित  विषय प्रस्तृत  करून समाजात फुट पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात.          दि १ जाने १८४८ मध्ये फुले दांपत्यांनी भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली होती, नंतर च्या काळात ही शाळा चिपळूणकर यांच्या वाड्यात स्थलांतरीत झाली होती.  शाळेला ज्योतीबांचे सहकारी सखाराम परांजपे, सदाशिव हाटे, सदाशिवराव गोवंडे यांचे सहकार्य होते त्याच वेळेस मुंबई शहर,मुंबई विद्यापीठाचे  शिल्पकार असलेल्या नाना शंकर शेट यांनी गिरगावातील ठाकूरद्वारात मुलींची शाळा काढलेली आहे. फुले दाम्पत्या पासून प्रेरणा घेऊन महर्षी कर्वे, न्या. रानडे आणि कर्मवीर भाऊराव पाटील सारख्या अनेक समाज सुधाराकांनी शिक्षाण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत.  दि १ जाने ते ३ जाने च्या काळात काही ढोंगी पुरोगामी मंडळी शाळा, कॉलेज, विद्यापीठे येथे विद्येची देवता सरस्वती कि सावित्री असे चर्चासत्र, व्याख्याने ,परिसंवाद आयोजीत करून  समाजात संभ्रम निर्माण करतात तसेच शाळा, कॉलेज मधील पारंपारीक  सरस्वती पूजन बंद करण्याची भूमिका मांडतात किंवा बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्यामधून शाळा,कॉलेज मधील सरस्वती पूजन बंद करणयात येते आहे.  त्यामुळे शाळा, कॉलेजमध्ये ज्ञानाची देवता सरस्वतीची उपासना करण्या ऐवजी अवहेलना करण्याची खेळी खेळल्या जात असून ही खेळी कितपत योग्य आहे.?  याचा आजच्या दिवशी विचार करण्याची आवश्यकता आहे. सावित्रीबाई फुले उच्च कोटीच्या समाजसुधारक होत्या या आणि त्यांच्या बहुमूल्य कार्या विषयी संपूर्ण देशाला आदर आहेच तो नाकारण्याचा प्रश्नच नाही  पण त्यांच्या जयंती निमित्ताने जो  समाज विघटनाचा जो कांगावा केला जात आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे 

भारतीय संस्कृती मध्ये  “या  कुंदेन्दूतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता……….सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्या पहा”  ही सरस्वती वंदना करून ज्ञानाची उपासना करीत आलेला आहे आणि ही सरस्वती वंदना आजही  घराघरात केली जाते.  अनादि काळा पासून सरस्वती वंदना करतात  भारतीय संस्कृती महिलांना आदरच स्थान असून रामायण, महाभारत मध्ये उच्च स्थान होते जुन्या काळी गुजरात मध्ये महिला साठी गुणशिला स्वतंत्र  विद्यापीठ होते आक्रमणकारी मोघलांच्या काळात काही दोष निर्माण होऊन सशिक्षण केंद्रे काही प्रमाणात बंद पडली होती महिलांनी सुध्दा हा देश येथील संस्कृती ,परंपरा टिकविण्यासाठी संघर्ष केला आहे हिंदुस्थानच्या इतिहासात महिलांचे योगदान महत्वाचे रामायणातील युद्धभूमी वरील कैकयीचा इतिहास आहे.  तसेच गोंडवाना संस्थानच्या महाराणी दुर्गावती, दक्षिण भारतात देवी रुद्राम्मा ,महाराणी पद्मावती, बलाढ्य मोघली सत्तेला टक्कर देणाऱ्या  मराठा सत्तेतील महाराणी ताराबाई ,राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचा संघर्ष  प्रचंड आहे “,दीनबंधू “च यशस्वी संपादन करणाऱ्या तानुबाई बिर्जे  पत्रकारिता महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देणारी आहे.

आपल्या देशात  सतत जातीपातीच्या व धर्माच्या नावाने काही संघटना,कार्यकर्ते राजकारण,समाजकारण करून छुप्या पध्द्तीने हिंदू समाज फोडण्याचे कारस्थान करीत असतात त्यामधून समाज सुधारकांना जातीपाती मध्ये  कैद करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे किंवा जाणीवपूर्वक वाढविण्यात येत आहे तसेच दुटप्पी पुरोगामी विचाराच्या सहाय्याने हिंदू समाजात फुट पाळण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे छ.शिवरायांच्या राज्याभिषेकला काही लोकांचा विरोध होता,शिवरायांना गागाभट्टानी पायच्या अंगठ्याने टिळा लावला, शिवरायांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लिम होते असे गैरसमज निर्माण करणे, विख्यात स्वामी बसवेश्वराची हत्या , संत तुकारामांचे वैकुंठ गमन की हत्या ? वीर सावरकर राणी लक्ष्मीबईच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे,श्री शनीशिंगणापूऱ,शबरीमाला मंदिर प्रवेशाचे सोंग घेऊन आंदोलन करणे , व्रतवैकल्या,पुजापाठ, धार्मिक कार्याची टिंगलटवाळी करून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे कटकारस्थान  समाजात मोठया प्रमाणात सुरू आहे   ” विद्येची देवता सरस्वती की सावित्रीबाई ” संभ्रम निर्माण  कृती उपरोक्त  कटाचा  भाग आहे अशा कटकारस्थान मधून हिंदू समाजात गैरसमज निर्माण करण्याचं षढयंत्र मोठया प्रमाणात सुरू आहे. विशेषता महिलांच्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा घडवून हिंदू  समाजात महिलांना दुय्यम स्थान आहे, अन्याय करून शोषण केले जाते, स्वातंत्र नाही, असे गैरसमज पसरवून समाजात दूही निर्माण केली जाते. या षढयंत्रामागे हिंदुत्व विरोधी मेंदू कार्यरत असून दि.३.जाने सावित्रीबाईफुले जयंती सोहळा आला की विद्येची देवता सरस्वती की सावित्रीबाईफुले असा प्रश्न उपस्थित करून समाजात संभ्रम निर्माण केला जातो आपल्या देशातील महिलांचा गौरवशाली इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते शेवटी  ज्ञानाची, विद्येची देवता सरस्वतीच असून सावित्रीबाई फुले प्रेरणास्थान  आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.                                                                           

अशोक राणे, अकोला.

मो. ९४२३६५८३८५                                                                    

अशोक राणे

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Comments (0)
Add Comment