आढावा विधानसभेचा – खान्देश-उत्तर महाराष्ट्र विभाग

विधानसभा निवडणूक १९
  • खान्देश व उत्तर महाराष्ट्र विभाग –

खान्देशात एकूण ०५ जिल्ह्यामधील ४७ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

या मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यातील ११ , धुळे जिल्हा ०५, नंदुरबार जिल्ह्य ०४, नाशिक जिल्ह्या १५ व  अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

खान्देश व उत्तर महाराष्ट्र विभागात महायुतीने, आघाडीने, वंचित बहुजन आघाडी, मनसे व इतर अपक्ष उमेदवार मैदानात आहेत.

  • शक्तिशाली नेता एकनाथ खडसे यांचे तिकीट कापत मुक्ताईनगर मधून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसेंचे तिकीट कापल्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली त्यामुळे कार्यकर्ते व मतदार रोहिणी खडसेंच्या सोबत किती प्रमाणात ऊभे राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विरोधात शिवसेनेचेच चंद्रकांत पाटील हे युतीधर्म बाजूला ठेवत मैदानात उतरले आहेत. तसेच मनसे चे संदीप देशपांडे सुद्धा मैदानात असल्यामुळे येथे तिरंगी लढत पाहायला मिळेल.
  • जळगाव मतदारसंघात महायुतीचे गुलाबराव पाटील आणि आघाडीच्या पुष्पा महाजन व मनसेचे मुकुंद रोटे असा सामना पाहाला मिळणार आहे.
  • जामनेर मतदार संघात विद्यमान मंत्री गिरीश महाजन विरोधात रा. कोंग्रेस चे संजय गरुड ही लढत पहायला मिळणार. भाजपच्या संकट मोचन म्हणून समजल्या जाणाऱ्या महाजनांच्या विरोधात संजय गरुड किती टक्कर देतात हे पाहणे मजेदार आहे.
  • नांदगाव मतदार संघातून आघाडी तर्फे पंकज भुजबळ यांचे विरोधात महायुतीचे सुहास खांडे मैदानात आहेत. जनता कुणाला स्वीकारते आणि कुणाला नाकारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
  • येवला मतदार संघातून रा.कोंग्रेसचे छगन भुजबळ उभे असून त्यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेचे संभाजी पवार मैदानात आहेत. छगन भुजबळ भ्रष्ट्राचाराच्या आरोपात जमानतीवर बाहेर आलेत हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे मतदार नेमके कोणाला कौल देतता हे पाहणे महत्वाचे आहे.
  • संगमनेर मधून आघाडी तर्फे कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाळासाहेब थोरात मैदानात असून महायुतीने साहेबराव नवाले पाटील हे रिंगणात आहेत.
  • शिर्डी मतदार संघात नुकतेच भाजपा वासी झालेले विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपा कडून मैदानात आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे नुकतेच भाजपा कडून खासदार म्हणून निवडून आलेत. राधाकृष्ण विखेंच्या विरोधात राष्ट्रवादी कोंग्रेस चे सुरेश थोरात मैदानात आहेत. राधाकृष्ण विखे यांचा भाजपा प्रवेश हा शरद पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्यामुळे शरद पवार या मतदार संघात जातीने लक्ष देतील असे मानले जाते. त्यामुळे विखे पाटलांच्या मार्गात अजूनही अडचणी आहतेच असे चित्र आहे.

पुढील लेखात पाहूया कोकण विभागातील काही मतदार संघाच्या लढती. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा.

 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment