वि.दा.सावरकरांचे दलित कार्यात मोठे योगदान.
हल्ली सावरकर शब्द जरी कानावर पडला तरीही काहींना त्रास होतो. सहण होत नाही, आणि केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांना टार्गेट केलं जातं. आणि सावरकरांचे दलित कार्य तुमच्या पर्यंत पोहोचू दिले जात नाही, कारण एकचं मतांचे राजकारण.
असो पण सावरकरांचे दलित कार्य न मोजता येण्या इतके आहे.
दोन जन्मठेपेच्या सुटकेनंतर सावरकर रत्नागिरीला आले, बघा म्हणजे माणसाची काम करायची जिद्द बघा,दोन वेळा तुरुंगातून सुटून अतिशय हाल तुरुंगात सहण करून सुद्धा नंतर त्यांनी आपले लक्ष दलित कार्याकडे वळवले. तो काळ अतिशय हालखीचा, उच्चनिचतेचा, भेद भाव पाळणार पण अश्या परिस्थितीत समाजाची हानी होते असे सावरकरांना वाटले. केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून देश प्रगती करू शकत नाही, तर सामाजिक स्वातंत्र्य मिळणे सुद्धा तितकेचं गरजेचे आहे असे सावरकर म्हणायचे. उच्च निचता ही समाजासोबतचं देशा करिता सुद्धा फार घातक ठरू शकते असे त्यांचे मत होते. सावरकर तर जात मुळात मानायचेचं नाहीत. मग अश्या परिस्थितीत सावरकर उच्चवर्निंयांच्या भेटी घाटी घेत असत व जे होतय ते कसे चुकीचे चालले आहे यावर प्रकाश टाकत असतं.उपनिषेधामधील आधार आणि सदोहरण याचे ते दाखले देत असत. पण एक क्रांतिकारक अगदी दलित कार्य करतो हे पण कौतुकास्पदचं आहे. पण समाज मात्र अजूनही काही सत्य बाबी तश्याच्या तश्या स्वीकारायला तयार नाही हे बघून मनाला वेदना होतात. सावरकरांनी दलित महिलांसाठी सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरु केला. सावरकरांनी सार्वजनिक पंगती सुरु केल्या जेणे करून उच्चवर्णीय व निच्चवर्णीय हा भेद दूर होईल.पुढे सावरकरांनी पतितपावन मंदिराची सुद्धा स्थापना दलितांसाठी केली. पण या सर्व कार्यात अजून एका व्यक्तीस विसरून चालणार नाही, ते म्हणजे भागोजी शेठजी ज्यांची पूर्ण सोबत सावरकर यांना लाभली, व पुढे भागोजी यांनी हे कार्य अखंडपणे सुरु ठेवले. इतके मोठे सावरकरांचे दलित कार्य त्यांनी तुरुंगात शिक्षा भोगल्या नंतरचे आहे. खरंच अश्या महान मानवाला काय म्हणावे? सावरकर हे खरंच भारत रत्ना पलीकडील आहेत. सावरकर हिंदुत्ववादी होते म्हणून आजपर्यंत त्यांना काँग्रेसने हिणवले पण सावरकरांचे हिंदुत्व हे सर्व समावेशक होते, त्यांनी दलितांसाठी काय कार्य केले हे तुमच्या समोर नाही येऊ दिले, आणि ते येऊ ही नाही देणार कारण त्यांना आपल्याला जाती जातीत गुंतवून ठेवायचे आहे. त्यांना फक्त दलित बांधवांनो तुमची मते हवी आहेत बाकी काही नाही. अहो खुद्द भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सावरकरांचे दलित कार्यासाठी आभार मानले आहेत. पण त्यांना महापुरुषांना जातीत वाटायचे आहे आणि आपल्याला सुद्धा जातीत गुंतवून ठेवायचे आहे. पण आज मी माझ्या दलित मित्र, मैत्रीणींना एक विनंती करतो की तुम्ही एकदा सावरकरांचे दलित कार्य वाचा सावरकर वाचा. असा क्रांतिकारक, समाजसुधारक होणे नाही.
फोटो गुगल साभार..
– अभिषेक म. पत्की.