विनोद तावडे यांना केंद्रीय नेतृत्व करण्याची संधी

विनोद तावडे यांना केंद्रीय नेतृत्व करण्याची संधी.   

नही डरेंगे नही रुकेंगे बढते जाय हम, 

परिवर्तन की पावन आंधी लाकर ही हम लेंगे दम

संघ शक्ती के रूप मे देखा आज हो सवेरा,

चलो जलाए दीप वहा जहा अभी भी अंधेरा है !

उपरोक्त गीतांच्या पंक्ती म्हणत  महाराष्ट्रातील भाजपा नेते विनोद श्रीधरराव तावडे यांनी अमळनेर येथे तत्कालीन मित्र राजेश पांडे यांच्या सोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मध्यमातुन सामाजिक जीवनाला सुरुवात केली होती अभाविपचे पूर्णकालीन कार्यकर्ता दायित्व स्विकार करुन  त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाचा अमळनेर येथे श्रीगणेशा केला होता नंतर त्यांनी अभाविपचे प्रदेश  आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम केलल आहे  आज  भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रतील कर्तुत्ववाण पांच नेत्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड केली त्यामध्ये विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिव निवड केलेली आहे त्यांची राष्ट्रीय सचिव केलेली  निवड म्हणजे  भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर कार्यपध्दततीवर टाकलेला विश्वास म्हणावा लागेल तसेच अभाविप चे सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय राजकारणमध्ये मिळालेल्या संधिचा प्रवास  राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे मुंबई सारख्या मायानगरी मध्ये राजकीय काम करतांना “अंगावर आल्यास शिंगावर घेण्याचे तयारी” त्यांनी सतत ठेवली आहे विनोद तावडे यांना संघटने मध्ये जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी मिळालेल्या संधीच सोन केलल आहे  उत्कृष्ट कामगिरी सुद्धा केलेली आहे आता सुद्धा देश पातळीवर आपल्या कामाचा  ठसा उमटवितील.

विनोद तावडे गेल्या अनेक वर्षापासून  महाराष्ट्राच्या राजकारणमध्ये सक्रीय आहेत रंजल्या गांजल्यांचे पुढारी म्हणून त्यांच्या कड़े पाहिले जाते प. दिनदयाल उपाध्याय यांचा “अंत्योदय ” हा मंत्र त्यांनी जोपसला आहे आणि  आचारणात सुद्धा आणलेला आहे  राज्यमध्ये संवेदनशील तथा प्रखर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे खंबीर पुरस्करते म्हणून त्यांच्या कड़े पहिले जाते महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आशा महत्वपूर्ण पदावर यशस्वीरीत्या कामगिरी केली आहे संवैधानिक पदावर काम करतांना त्यांनी सामान्य माणसाला उपलब्ध होण्याचा व त्यांना  न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच राज्य तथा सामान्य माणसाच्या कल्याणासाठी  घेतलेले कठोर निर्णय आजही सामान्य माणसाच्या आठवणीत आहेत तसेच चांदा ते बांदा असा संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी  पिंजून काढलेला आहे   2014 च्या विधानसभेच्या निवडनुकीत मुंबई उपनगराच्या बोरोवली मतदारसंघाचे दबंग आमदार म्हणून नेतृत्व करीत असतांना त्यांनी बोरिवली मतदारसंघाचे नेतृत्व करुन राज्याचे उच्च शिक्षण, मराठी भाषा विभाग आणि इतर खात्याचे मंत्री म्हणून राज्यात यशस्वी काम केले आहे  मायानगरी मध्ये काम करतांना कोणी अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची तयारी ठेवणारा कणखर नेता अशी त्यांची ओळख आहे.

विनोद तावडे यांना लहानपणा पासूनच समाजसेवा अथवा सामाजिक कार्याची आवड होती पुढे त्यांचा संघशाखेशी संबध आला समाजसेवच बालकडू त्यांना संघाच्या शाखेत मिळाले शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्यांनी  पूर्णवेळ समाजकार्य  करण्याचा निर्णय केला आणि त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे परिषदचा पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून घराबाहेर पडले त्यांची संघटनेच्या योजनेतून अमळनेर शहरात पूर्णकालीन कार्यकर्ता नियुक्ती करण्यात आली त्यांनी सतत कठीन परिश्रम, कष्ट आणि संघर्ष करून आज केंद्रीय राजकारणमध्ये प्रवेश केला आहे  त्यांचा हा सामाजिक किवा राजकीय प्रवास सामान्य माणसाला प्रेरणा देणारा आहे तत्कालीन मंत्रीमंडळामध्ये शिक्षण तथा मराठी भाषा विभाग,सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करतांना त्यांनी शिक्षण विभागामध्ये  उल्लेखनिय बदल घडवून आणले शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या हा त्यांचा धाडसी निर्णय मानला गेला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  देऊन दि.२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरु करुन गेल्या वर्षीच्या  ५६ व्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये मराठी च्या संवर्धन आणि सन्मानासाठी ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली यांना निमंत्रित करून मराठी चित्रपट सृष्टीच्या किवा मराठी भाषेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवण्याचा क्रांतिकारी प्रयत्न सुद्धा केलेला आहे बोरीविली मध्ये स्व.अटलजी स्मृति उद्यान उभारुन राजकीय कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा  दीपस्तंभ उभा केला आहे उद्यान  मधील स्व.अटलजी यांच्या संघ स्वयंसेवक ते पंतप्रधान व एक कवि, पत्रकार ते आणिबानि काळातील योद्धा हया र्स्मृति कार्यकर्त्यांना सामाजिक,राजकीय जीवना मध्ये काम करताना बळ देणारे ठरणार  माजी मंत्री विनोद तावडे हे राज्यामध्ये संवेदनशील नेते तथा प्रखर संस्कृतिक राष्ट्रावादाचे खंबीर पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात आणि आता त्यांनी केंद्रीय राजकारणमध्ये काम करण्याची मिळालेली संधी सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे.

अशोक राणे

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Comments (0)
Add Comment