अनेक देशांमध्ये Covid19 वर मात करण्यासाठी अनोखे प्रयोग सुरु आहेत. समाजव्यवस्थेच्या सर्व घटकांचे परस्परावलंबित व्यवहार आणि वैयक्तिक मानवी गरजा ह्यांच्यात समन्वय वाढवून व संघर्ष टाळूनच Covid19 वर मात करता येईल. सतत बदलण्याऱ्या परिस्थितीचा आढावा घेतच हा मार्ग सापडेल. जागरूक नागरिक लोकशाहीत सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीत भागीदाराची भूमिका निभावू शकला तरच धोरणांना यश येत. म्हणूनच ह्या
सदरातून Covid19 च्या जनआरोग्य आव्हानाचे विविध पैलू तुमच्या समोर आणणार आहे.
लॉकडाऊन चे निर्बंध का आहेत आवश्यक ?
गरीब-श्रीमंत व्यक्ती , हिंदू-मुस्लिम-इसाई धर्मीय, पौर्वात्य- पाश्चिमात्य देश असे कुठलेही भेद न करता करोनाच्या नामक Covid19 महामारीने संपूर्ण मानवजातीलाच मृत्यूचा विळखा घातला आहे. "कोरोना virus" हा एक viruses (विषाणूंचा) चा एक मोठा परिवार आहे ज्यातील बहुतांशी virus उंट, गाय, मांजर, वटवाघूळ ह्या पशूंमध्ये प्रामुख्याने आढळतात. विरळच असे होते की पशुजन्य रोगाचा संसर्ग मनुष्याला होतो आणि अश्या विषाणूंची एक जहाल त्रयी म्हणजे MERS-CoV, SARS-CoV आणि Covid19 ला कारणीभूत ठरलेल्या SARS-CoV-2 (novel corona virus). ह्या तीनही विषाणूंची उत्पत्ती वटवाघुळातून झाली आहे असे अमेरिकेतील विश्वसनीय CDC (Centers for Disease Control and Prevention) ह्या आरोग्यविषयक अधिकृत संस्थेचे शास्त्रज्ञ सांगतात. वटवाघुळातून मानवी शरीरात Covid19 चे संक्रमण कसे झाले ह्याचे निर्णायक संशोधन अजून संपलेले नसले तरी २०१९ च्या अखेरीस Covid19 च्या संक्रमणाची सुरुवात वूहान, China येथे झाली
ह्याबद्दल दुमत नाही. चीनमध्ये लोकतांत्रिक सत्ता व्यवस्था नाही. सहाजिकच सरकारचा जनतेवर विश्वास नाही. भारत आणि अमेरिकेप्रमाणे जनतेच्या सहभागाची ताकद त्यांच्या पाठीशी नाही. चीनने रोगाचे गलिच्छ राजकारण खेळले नसते आणि वेळेवर जागतिक समुदायाला सतर्कतेचा ईशारा दिला असता तर आज विकृती आणि मृत्यूच्या (morbidity and mortality) विळख्यातून निघणे नक्कीच अधिक सुसह्य झाले असते. अवघ्या पावणे ४ महिन्यातच १८५ देशांमध्ये २,७०८,८८५ लोकांना Covid19 झाला असून ह्याने १,९०,८५८ बळी घेतले आहेत. दुर्दैव असे की हा विषाणू नवीन असल्याने हा कसा पसरतो, ह्याची बाधा झाली की शरीरावर काय परिणाम होतील आणि अनुषंगाने ह्याचा प्रादुर्भाव कसा थांबवायचा व काय उपचार करायचे हे अजूनही मोठे कोडे आहे. संसर्ग रोखण्यासाठी आणि वाढणाऱ्या मृत्युदराच्या भीतीने भारतासमावेत, अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड ह्या सर्वच देशांनी लोकांच्या अवागमनावर रोख लावली आहे. १३ मार्च २०२० ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांनंतर अमेरिकेत राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीची घोषणा केली. रोगाचा तितकासा संसर्ग झालेला नसतांनाही देशाच्या नागरिकांच्या जीवनाशी जुगार न खेळता अतिशय निर्णायक भूमिका घेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी २१ मार्चलाच १४ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली. जागतिक स्तरावर आलेल्या ह्या आकस्मिक विपदेमुळे सर्वच जनजीवन अचानकपणे ठप्प आणि विस्कळीत झाले आहे. भारतात ट्रेन, बस, महामार्ग बंद आहेत आणि अनेक लोक आपल्या कुटुंबियांपासून दूर अडकलेले आहेत. अमेरिकेतही अनेक राज्यांनी दहाहून अधिक लोकांच्या जमावावर बंदी घातली आहे आणि अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व उद्योग बंद करण्यात आले आहेत. स्थानिक व आंतरराष्ट्रीय हवाई अड्डेदेखील सद्य परिस्थितीत बंद करण्यात आले आहेत. जर शेजारच्या राज्यात संसर्ग जास्त असेल तर दोन राज्यांमधील
महामार्गांवर नाकाबंदी करून येणाऱ्या लोकांची नोंद करून त्यांना quarantine करण्याचे निर्देश अमेरिकेत दिले. जात आहेत आणि अधिक संसर्गाच्या ठिकाणांहून येणाऱ्या प्रवास्यांना quarantine चे निर्देश भारतातही दिले जात आहेत. ह्या आठवड्यात अमेरिकेत बऱ्याच राज्यात लोकांनी उद्योग व्यवसाय पूर्ववत सुरू व्हावे ह्यासाठी निदर्शने केली.जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या जागतिक कोरोना डॅशबोर्डप्रमाणे आज भारतातील रुग्णांची संख्या २३,०७७ आहे.भारतात आज रुग्णांच्या संख्येचे चित्र आशादायी आहे पण तसाच काहीसा lockdown हटाव चा एकेरी सूर कर्फ्यू ३ मे पर्यंत वाढवल्यावर मुंबईत ऐकू आला. सहाजिकच एक महिना उलटून गेला तरी अनिश्चिततेचे वातावरण कायम असल्यामुळे कंटाळा, नैराश्य, विफलता ह्या भावनांचा मनात कल्लोळ माजलेला आहे. सामान्य व्यक्ति,शेतकरी, लघु उद्योजक व व्यापारांवर Covid19 मुळे मोठा आर्थिक आघात झाला आहे. पण खरेच सर्व निर्बंध झुगारून आपले जनजीवन पूर्ववत होणे एवढ्यातच तरी शक्य होणार नाही. किंबहुना तसा विचार करणे ही जीवघेणी घोडचूक कशी ठरेल हे समजून घेऊया.
कसा पसरतो Covid19 चा विषाणू ?
1. व्यक्ती ते व्यक्ती संसर्ग—
एखाद्या व्यक्तीचा Covid19 च्या विषाणूशी संपर्क आला तरी त्याला रोग्याची लक्षणे दिसायला चौदा दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो. त्या दरम्यान स्वतःला लक्षणे नसली तरीही ती व्यक्ती ह्या विषाणूची वाहक (carrier ) असू शकते. अश्या वाहक व्यक्तीच्या किंवा लक्षणे दिसू लागलेल्या व्यक्तीच्या श्वासामधून येणाऱ्या द्रवांमधून हा विषाणू हवेत पसरतो. अशी व्यक्ती खोकली , शिंकली, किंवा बोलली तरीही हा विषाणू त्या व्यक्तीपासून तुमच्या नाकावर/ तोंडावर/ हातावर/ डोळ्यावर पसरून तुमच्या फुफ्फुसांपर्यंत (lungs) पोहोचू शकतो.
2. विषाणू- दूषित पृष्ठभाग आणि वस्तू –
जर एखाद्या वस्तू किंवा पृष्ठभागावर Covid19 उद्भवणारा करोना विषाणू पडला असेल,अश्या जागेला तुमचा हात लागला आणि अनावधानाने तो हात तुमच्या नाक, तोंड किंवाडोळ्यात गेला तर Covid19 होण्याची शक्यता आहे असे CDC चे शास्त्रज्ञ सांगतात.ह्या माहितीच्या आधारावर काही महत्वाच्या प्रतिबंधात्मक सूचना जागतिक आरोग्य तज्ज्ञ देत आहेत—
दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवावे (२ मीटर).
नाकावर मास्क (कापडी मुखवटा) बांधूनच बाहेर जाणे.
गर्दी, घोळक्यात भेटणे, वावरणे टाळणे.
स्वच्छता व निर्जंतुकीकरण– साबण व पाण्यानी हात धुणे, ज्या पृष्ठभागांना अथवा
वस्तूंना अधिक स्पर्श होत असेल अश्या ठिकाणी bleach नावाचे रसायन असलेल्या किंवा ७०% alcohol असलेल्या उत्पादनांचा वापर करून निर्जंतुकीकरण करणे. भारताची लोकसंख्या बघता, आपली लोकसंख्या घनता (population density) आहे ४६२
व्यक्ती प्रति वर्ग किलोमीटर ह्या उलट अमेरिकेची population density आहे ३६ व्यक्ती प्रति वर्ग किलोमीटर. भारताच्या लोकसंख्येचे आव्हान बघता, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियापेक्षा व्यक्ती ते व्यक्ती संसर्गाचा धोका भारतात अधिक वाढतो.
एकमेकांपासून संसर्गातून रोग प्रादुर्भावाच्या धोक्याव्यतिरिक्त ह्या lockdown/ curfew ची आणखीन काही कारणे आहेत जी समजून घेणे आवश्यक आहेत. ती अशी—
*१) Testing/ चाचणी *— दोन प्रकारच्या चाचण्या आहेत. पहिली चाचणी Covid19 चे निदान करते. तर दुसरी चाचणी Covid19 होऊन गेल्या नंतर आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती तयारझाली का ह्याची प्रतिजैविक चाचणी (antibody test) करते. जो पर्यंत मोठ्या प्रमाणात टेस्टींग सुरू होत नाही तो पर्यंत Covid19 रोग कुठवर पसरला आहे हा अंदाज येणार नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी रोगराई कमी आहे हे निश्चितपणे सांगतां येत नसतांना तिथले उद्योग-धंदे सुरू करणे बरोबर होणार नाही.
*२) Vaccines/ लस *— आज तरी हे आपल्याला माहित नाही कीएकदा Covid19 झाला की प्रतिकारशक्ती तयार झाल्यामुळे हा रोग परत होतो की नाही? तसेच Covid19 लस आज उपलब्धही नाही. ते तयार व्हायला किमान ८-१२ महिने लागतील असा अंदाज आहे. बरं,Vaccine तयार झाले तरी सर्व जनतेची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते मोठ्या संख्येत लोकांना द्यायला लागेल. त्यासाठी ज्या प्रमाणावर लसीकरण करावे लागेल तो आकडा इतका मोठा आहे.की त्यासाठी लागणारी manufacturing व supply chain (निर्माण व पुरवठा) यंत्रणेची क्षमता आज तरी कुठल्याच देशाकडे नाही. ती क्षमता उभी करण्याची प्रक्रिया विश्वस्तरावर सर्वच प्रगत सरकारी यंत्रणा आज करत आहेत आणि vaccine चा शोध लागेपर्यंत ती तयार होईल अशी अपेक्षा आहे. थोडक्यात vaccine रूपी उपाय यथार्थात यायला दीड-दोन वर्षांचा कालावधी तरी लागेल.
*३) Treatment*— जसे typhoid/ TB वर ठरलेले औषध आहे जे लागू पडते व रुग्ण बरा होतो हे आपल्याला माहित आहे, तसे Covid19 चे मात्र नाही. आज जगात सर्व डॉक्टर प्रयत्नशील आहेत. कुणी क्वायनाईन (quinine) चा वापर करतय, कुणी स्टिरॉइड (steroid), कुणी ventilator, dialysis, ECMO च्या मशीन चा वापर करून अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर कुठे बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा (convalescent plasma) रुग्णांना रक्तदानातून देणे असे नूतन प्रयोग सुरू आहेत. पण हे उपाय विश्वासार्ह आणि मान्यताप्राप्त (established treatment standard) नाहीत आणि तसे निकष तयार व्हायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. आपल्या समोरील मार्ग खडतर आहे ह्याबद्दल शंका नाही. जागतिक स्तरावर स्पेन, इटली, फ्रान्स आणि चीन ह्या देशांमधील Covid19 च्या संसर्गाबद्दलच्या अभ्यासातून इतर देश धडे घेत आहेत. एक महत्वाचा धडा म्हणजे social distancing च्या मार्फत विषाणूंचा प्रसार रोखणे अर्थात लोकांची एकत्रीकरणे थांबवणे, गर्दी आवरणे आणि जनता कर्फ्यू/ lockdown. म्हणूनच lockdown/curfew चे निर्बंध सरकारनी लागू केले आहेत. आपल्याला लक्षात आले असेलच की आपल्याला माहीत असलेल्या “नॉर्मल” ची व्याख्या ही नेहमीसाठी बदलणार आहे. त्यामुळे, सद्य परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी विचारपूर्वक सुनियोजित उपाय-योजना अंमलात आणणे हेच सरकारी यंत्रणेसमोरील सर्वाधिक प्राधान्याचे आव्हान ठरणार आहे. सर्वांगाने विचार न करता राजकीय समीकरणातून निर्बंध उठवले (ifgovernments choose politically correct oversimplified solutions) तर लोक एकत्र येतील/ गर्दीत जातील आणि ०-१४ दिवसात परत विषाणू पसरेल. आज अमेरिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा रुग्णांचा खालावणारा/ कमी असलेला आकडा २-३ आठड्यात नवीन उच्चांक गाठेल. घाई केल्यास एक पाऊल पुढे दोन पावलं मागे अशी दुर्दैवी गत होईल ही वस्तुस्थितीविसरून चालणार नाही ! ( Photo – kalingatv)
Very informative… well written !! अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्यांना कळेल अशी फारच ऊपयुक्त माहिती दिली आहे… लेखिकेचे अभिनंदन व शुभेच्छा !!
अभ्यास पुर्वक आणि अतिशय माहिती पुर्ण लेख
Well written, wish you all the best! Keep writing
Very informative
कशी आहेस किम ? अ.भा.वि.परिषद वाले तसे ही स्वस्थ व शांत बसूच शकत नाहीत . इथल्या अभाविप ग्रुप वर व माझ्या फेसबुक वॉल वर शेअर करतोय .
: – धनंजय भिडे , नागपूर .
( मी 85 ला पुर्णकालीक म्हणून थांबलो . आता स्वदेशी जागरण मंच चा राष्ट्रीय परिषद सदस्य आहे . दिलिपरावांशी रोजचा संपर्क आहे . काही विशेष असले तर +91 7276555573 वर व्हाट्सएप करू शकतेस . नागपूर रेड झोन मध्ये आहे . काही भागा मुळे केवळ . असो . काळजी घेणे .
Very nice piece… super
Khup chan ani saral bhashet sangitalele aahe, plse stay at home and be safe.