औरंग्याचे कौतुक करणारे किडे ठेचले पाहिजे..
महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि औरंग्या चे कौतुक करणारा किडा गेले काही दिवस वळवळतोय. मध्यंतरी कोणी तरी सोलापूरकर नावाचा अभिनेता महाराजांबद्दल विधान करतो आणि म्हणतो की महाराज आग्र्याहून लाज देऊन पळून आले. मुळात या सोलापूरकर सारख्या लोकांची अक्कल शेण खायला गेलेली आहे. आग्र्याहून सुटका हा संपूर्ण घटनाक्रम सोलापूरकर सारख्या लोकांना शिकवण्याची वेळ आलेली आहे. अजूनही महाराष्ट्रात कैक लोकांना महाराज कळले नाही याचं दुःख वाटतं.
त्यानंतर लगेचं छावा चित्रपटानंतर कोणी तरी कोरटकर नावाचा व्यक्ती महाराजांचा अपमान होईल अशी काही तरी वक्तव्य करतो.ही अशी ब्रिगेडी पिलावळ प्रत्येक जातीत लपून बसलेली आहेत. जशी कोरटकर ने जातीवरून काही तरी वक्तव्य केलीत, त्याचं प्रकारे काही ब्रिगेडी कोरटकर मुळे एका समाजाला धारेवर धरून काय साध्य करण्याचा प्रयत्न करता आहेत?लक्षात घ्या वाईट असते ती प्रवृत्ती. जात नव्हे.
कुठल्याच जातीत शंभर टक्के चांगले किंवा शंभर टक्के वाईट लोकं नसतात. फक्त त्या त्या जातीला लागलेली घाण ही अश्या वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींमधून बाहेर येत असते.
आज अबू आझमी नावाच्या आमदाराने औरंगजेब कसा चांगला होता व कसा उत्कृष्ट राज्यकर्ता होता हे सांगण्याचा प्रयत्न केला. ही अबू आझमी सारखी प्रवृत्ती सुद्धा महाराष्ट्रात वेळीच शांत करायला हवी. पण आता ब्रिगेडी समोर येऊन अबू आझमी ची जात धर्म याला टार्गेट करणार नाहीत. कारण महाराष्ट्राला लागली आहे ती जातीची कीड.
प्रत्येक व्यक्ती आपल्या जातीचा विषय आला की मूग गिळून गप्प बसतो. आपल्या जातीतील वाईट गोष्टींवर बोट ठेवत नाही, म्हणून उदयास येतो तो जातीयवाद.
जर आज प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जातीत ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, किंवा स्वतःच्या जातीतल्या वाईट लोकांबद्दल लिहायला किंवा बोलायला शिकलं पाहिजे. तेव्हा महाराष्ट्रातून जातीयवादी कीड नष्ट होईल आणि पुन्हा उदयाला येईल तो शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र.
नक्की आपल्याला कोणता महाराष्ट्र अपेक्षित आहे हेचं कळण कठीण झालं आहे.
मित्रांनो शिवरायांना हा महाराष्ट्र अपेक्षित नव्हता. आपल्या मराठेशाहीचा इतिहास दिल्ली ला सुद्धा घाम फोडायचा. अटक ते कटक पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नंतर पेशवे यांनी मराठे शाहिची तोफ अख्या हिंदुस्थानात अठरा पगड जातींना सोबत घेऊन ढगढगत ठेवली. आणि आज तोचं महाराष्ट्र जातीपातीत महापुरुष शोधतोय बघतांना मन सुन्न होतं.
पण त्याचं निमित्याने औरंगजेब, शिर्के आणि अनाजी पंत ही प्रवृत्ती अजून सुद्धा महाराष्ट्रात जिवंत आहे,हे विसरून चालणार नाही.
पण जातीपातीत भांडणारा मराठा बघून आज औरंग्याची कबर आतल्या आत गदगदून हसत आनंदी होत असेल यात तिळमात्र शंका नाही.
अभिषेक मनोज पत्की.