बगदादी जीवंत गाडला,आपण काही शिकणार का ?

आंतराष्ट्रीय घडामोडी

0 415

बगदादी जीवंत गाडला,आपण काही शिकणार का ?

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ईसीस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मानवतेचा शत्रू तथा कट्टर दहशतवादी अबू बकर अल बगदादी दि.२७ ओक्टो रोजी अमेरिकन स्पेशल फोर्सच्या हल्ल्यात सिरिया मधील वायव्य प्रांतातील इदबील प्रांतात मारला गेल्याची वार्ता प्रसिद्ध झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा व्हाईटहाऊस मध्ये पत्रकार परिषद घेऊन बगदादी कुत्र्या सारखा मारल्याची अधिकृत घोषणा केली आहे दहशतवादी बगदादी जगातील सर्वात क्रूर आणि हिंसक संघटना ईस्लामिक स्टेटचा प्रमुख असून बगदादीने इराक आणि सिरियाच्या भूप्रदेशावर आपले वर्चस्व स्थापन केले होते मानवतेचा शत्रू असलेला बागददी जीवंत गाडल्या गेल्यामुळे तसेच बगदादी सोबत असंख्य कुख्यात दहशतवादी मारल्या गेल्यामुळे भारतासह अनेक राष्ट्रांनी अमेरिका तथा अमेरिकन जवानांचे स्वागत केले आहे बगदादी यांच्या खातम्या नंतर बगदादीची जागा घेणारा दुसरऱ्या क्रमांकाचा किंवा उत्तराधिकारी कुख्यात दहशतवादी इस्लामिकस्टेटचा म्होरक्या अब्दुल्ला कर्दाशचा सुद्धा अमेरिकन सैन्यांनी खातमा केलेला आहे या पूर्वी सुद्धा अमेरिकेने कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील इस्लामी राष्ट्राचे दडपन व मानवअधिकारला न जुमानता कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या ओबेटाबाद मध्ये असाच ठेचून ठार केला होता अमेरिके ने बगदादी आणि नंतर अब्दुल्ला कर्दाशचा केलेल्या खातम्याच्या घटनेचा सूक्ष्म विचार केल्यास ही कारवाई दहशतवादाचा बिमोड करण्याच्या चळवळी मधील महत्वाची घटना असून संपूर्ण अमेरिका राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी मजबूत पणे उभे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी सुद्धा सदर घटनेचे तोंड भरून कौतुक केले आहे कोणत्याही अमेरिकन माणसाने किवा विरोधी पक्षातील नेत्याने “ कितने बगदादी मारोंगे घर घर से बगदादी निकलेंगा “ अशा प्रकारच्या घोषणा न देता त्यांनी सैन्याच्या कारवाईचा गौरव करून दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व एक आहोत असे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक्याचे प्रदर्शन घडविले आहे त्यामुळे त्यांचे जागतिक पातळीवर वर्चस्व निर्माण होऊन त्यांचेकडे वाकड्या नजरेने पाहावयास कोणी धजावत नाही किवा भविष्यात कोणी धजावणार नाही अमेरिकेने खातमा केलेल्या क्रूर दहशतवादयाच्या पार्श्वभूमीवर आपण जर आपल्या देशातील सरकार विरोधी लोकांच्या कार्यपध्दतीचा विचार केल्यास अशी घटना आपल्या लोकशाही देशात घडली असती तर तुकडे गॅंग कडून “कितने अफझल मारोंगे,घरघरमे अफझल निकलेंगा” अशा आशयाच्या घोषणा देशाच्या गल्लीबोळात निघाल्या असत्या तथाकथित सेक्युलरमंडळी,मानवअधिकार कंपनी व राजकीय नेत्यांनी पुरावे मागून किती मोठा थयथयाट केला असता याचा विचार न करणे बरे राहील मागील वर्षी श्रीलंकेच्या कोलंबो शहरात दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून शेकडो निपराध माणसांचे प्राण घेतले होते शेकडो माणस जख्मी केले श्रीलंकेच्या सरकारने तत्काळ बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यची पालेमुळे खोदून काढली त्यांना सहकार्य करणार्‍या विरुध्द कडक कारवाई करण्याची मोहीम उघडली होती तेथिल जनता सुद्धा श्रीलंका सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली विरोधी पक्ष सरकार सोबत होता दहशतवाद्यची न्यायलयीन केस लढण्यास एक वकील सुद्धा पुढे आला नाही पण दुदैवाने आपल्या संसदे वरील दहशतवादी हल्लाचा मास्टर माइंड असलेल्या अफजलच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात घोषणाबाजी केली उदात्तीकरण केले जाते तसेच मुंबई बॉम्बस्फोटमध्ये फासीची शिक्षा झालेल्या याकुब मेमन या आरोपीची शिक्षा रद्द करण्यासाठी रात्रीला न्यायालय उघडले जाते राजकीय नेते अशा निषेधाच्या घटनाचे समर्थन करतात चित्रपट कलावंत सुद्धा फाशी रद्द करण्यासाठी मोर्चे बांधणी करतात आणि नंतर हेच लोक असहिष्णुतेचा कांगावा करतात त्यामुळे आपला देश कोठे चालला आहे मताच्या राजकीय फायद्यासाठी देशद्रोह्यांचे उदात्तीकरण आपण का करीत आहोत ? याचा निरपेक्षपणे विचार करण्याची आवश्यकता आहे अमेरिकेने बगदादी,अब्दुल्ला कर्दाश खातमा केलेल्या घटनेचा आणि अमेरिकन जनतेने,विरोधीपक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या विचार केल्यास आपल्या देशातील मीडिया ,विरोधीपक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते केव्हा बोध घेतील किवा अमेरिकन जनतेकडून आपण आता तरी काही शिकणार का ? इतर वेळा आपण अमेरिकन तथा पश्चिम संस्कृतीच अंधाधुंद अनुकरण करतो पण देश हिताच्या घटनाचे अनुकरण का करीत नाही  याचा देशहितासाठी विचार करणे आवश्यक आहे.      (फोटो गुगल वरून साभार)

  • अशोक राणे ,अकोला. 
  • मो.9423658385

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Your email address will not be published.