बैंकानी 350 दिवसाच्या मुदती ठेवीची योजना आखावी.
बैंकानी 350 दिवसाच्या मुदती ठेवीची योजना आखावी.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडे तिनशे वर्षा पूर्वी हिंदू समाजातील अठरापगड आणि बारा बलुतेदार समाजाला भगव्याध्वजा खाली एकत्र आणुन, स्वराज्याची बीज सामान्य माणसाच्या मनात पेरली होती . प्रतिकूल परिस्थिति मध्ये सामान्य माणसाच्या मनगटाच्या ताकदीवर परकीय इस्लामी सिंहासने उलथा पालथ करुन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. परकीय अत्याचारी इस्लामी आक्रमणा मुळे हिंदू राजाचा राज्यभिषेकाचा विधी व परंपरा विस्मृत झाली होती. शेकडो वर्ष लोप पावलेली किंवा खंडित झालेली हिंदू राज्याभिषेकाची परंपरा शिवरायांनी स्वराज्याभिषेक करुन स्वराज्याभिषेक परंपरा पुर्नजीवित केली. सोबतच हिंदू राजा होऊ शकतो हा विचार सुद्धा हिंदू समाजात रुजविला पुढे हिंदवीस्वराज्यचा “स्वराज्य ते साम्राज्य” रक्तरंजित प्रवास व इतिहास देशाला व सामान्य माणसाला प्रेरणादायक ठरला आहे. शिवरायांच्या स्वराज्याभिषेका पासून प्रेरणा घेऊन आसाम,उत्तर भारत,पंजाब,तमिलनाडु येथील हिंदू समाजाने भगव्या ध्वजा खाली एकत्र येऊन, परकीय इस्लामी आक्रमण तलवारीच्या जोरावर रोखली व यशस्वी होऊन इस्लामी सत्तेला उतरती कळा लावली होती. सुरु असलेले वर्ष छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 वर्ष असून देशात काही प्रमाणात छोटे मोठे कार्यक्रम सुरु आहेत देशा मध्ये प्रभावी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दर वर्षी श्री शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिन्दुसाम्राज्य दिन उत्सव साजरा होत असतो. पण या वर्षी 350 वर्षाचे औचित्य साधून हिन्दुसाम्राज्यदिन मोठ्या प्रमाणात साजरा करुन शिवरायांचा राष्ट्रीय विचार देशातील तरुण पीढी समोर विविध कार्यक्रमा द्वारा मांडण्यात आलेला आहे. शिवरायांची भुमि असलेल्या महाराष्ट्रात राज्य सरकारने जेष्ठ कृ. त्रयोदशीला 2023 रोजी मोठ्या उत्साहाने भव्यदिव्य कार्यक्रमा द्वारा श्री शिवराज्याभिषेक रायगढ़वर साजरा केलेला असून जेष्ठ कृ. त्रयोदशी 2023 ते जेष्ठ कृ. त्रयोदशी 2024 पर्यंत वर्ष भर महाराष्ट्रात काही छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमा मधुन श्री शिवराज्याभिषेक उत्सव लोकउत्सव व्हावा, अशा कार्यक्रमाची योजना सुद्धा आखली आहे. त्या लोकउत्सव मधील एक भाग म्हणून शासनाच्या शासकीय पत्रव्यवहार लेटरहेड वर श्री शिवराज्याभिषेक 350 (लोगो) मुद्रा मुद्रीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन कडून लवकरच प्रतापगढ़ रणसंग्राम मध्ये शिवरायांनी वापरलेली वाघनख इंग्लैंड मधुन भारतात आणले जाणार आहेत, महाराष्ट्रातील गढ किल्ल्याची स्वच्छता,विश्व हिंदू परीषद कडून शौर्य जागरण यात्राचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन राज्यात श्री शिव विचार यात्रा प्रयोजन करणार आहे समाजाने सुद्धा श्री शिवराज्याभिषेक उत्सव 350 निमित्ताने गांवागांवा मध्ये शिवकालीन इतिहासातील दिन विशेष शिवप्रताप दिन(प्रतापगढ़ रणसंग्राम) शिवतेज दिन (लाल महाल मध्ये शाहिस्ताखानाची फजीती) शिव चातुर्य दिन(बादशाहच्या हातावर तुरी देऊन आग्र्याची सुटका) साजरे करुन, श्री शिवराज्याभिषेक उत्सव लोक उत्सव करण्या साठी प्रयत्न करावा छत्रपती शिवराय यांनी साड़े तीनशे वर्षा पूर्वी परकीय इस्लामी सत्तेला पराभूत करून त्यांचा बिमोड करण्यासाठी व सामाजिक सुरक्षा साठी वापरलेल तंत्र आजही लागू होते तसेच. शिवरायांनी वापरलेल्या तंत्रा मध्ये युद्धनिति पासून व्यापार नीति मध्ये अर्थ निति महत्वाची होती त्यामुळे शिवरायांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून वित्तीय संस्थानी अर्थात बैंक, सोयायटी,पतसंस्था इत्यादीनी आप आपल्या संस्थे मध्ये 350 दिवसाच्या मुदत ठेवी ची योजना आखावी त्यासाठी प्रचलित व्याज दरा पेक्षा एक टक्का अतिरिक्त व्याज दर देण्याची तरदूत करावी. तसेच महाराष्ट्र शासना कडून प्रसिद्ध केलेला लोगो मुदत ठेविच्या पावती मुद्रीत करावा आता सणासुदीचा काळ असून आगामी काळात शेतमाल तयार होऊन शेतकारी वर्गाच्या घरी येणार बाजारा मध्ये पैसाची आवक जावक सुद्धा वाढणार आहे. त्यामुळेच आगामी सुगीच्या काळात बैंकांनी 350 दिवसाच्या मुदती ठेवि ची योजना केल्यास छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण होऊन शिवराज्याभिषेक उत्सव लोकउत्सव होईल.
- अशोक राणे, अकोला भ्रम.9423658385