बाप्पा आणि केक

0

बाप्पा आणि केक

मोदकांच्या ऐवजी केक मागशील?
बाप्पा तू इतकं कसं वेगळं वागशील?

असं सुटलय सुसाट पश्चिमेचं वारं,
हलू लागलीया खलखला
देवघराची दारं.
प्रवाहाबरोबर वाहताहेत,
रूढी… परंपरा… संस्कार …
डीजेच्या तालावर मात्र,
तुझाच जय जयकार.
भोगवादाच्याचंदेरी रंगावर,
शेंदूर थापशील?
बाप्पा तू इतकं कसं वेगळं वागशील?

बुद्धीची देवता ना रे तू?
मग निदान एवढं तरी दान दे.
बेलगाम तुझ्या लेकरांना,
संस्कृतीचा अभिमान दे.
लाडू पेढे बर्फी यांना,
देवघरात तरी मान दे.
तू तरी आता स्वत्वाला जागशील
बाप्पा तू इतकं कसं वेगळं वागशील?

विनायका होशील ना जागा?
स्वधर्माच्या वातीतला धागा!
अन् चेतवशील मनामनातील
सनातन अभिमान…
विघ्नहर्ता हे विघ्न भारी आहे.
भिस्त तुझ्यावरच सारी आहे.
संस्कारांचा अभिमान भक्तांकडे मागशील.
बाप्पा तू खरंच का इतकं वेगळं वागशील?

निकिता गजानन गावंडे
न्यू सुभेदार लेआउट, नागपूर.

लेखिका सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये नियमित स्तंभलेखन, विविध सामाजिक विषयांवर कविता, विशेषत्वाने हास्य कवितांचे लेखन करतात. मोबा - 9970663813.

Leave A Reply

Your email address will not be published.