भारतीय संविधानाचे मूळ हे भारतीय संस्कृतीत.
भारतीय संविधानाचे मूळ हे भारतीय संस्कृती आणि भारतीय जिवन पद्धती.
जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची धारणा करणारे संविधान आता ७५ वर्षांचे होते आहे… ही वाटचाल जरी सव्वाशे सुधारणांचीही असली, तरी या अनेक दुरुस्त्यांनी संविधानाचे सामर्थ्य वाढवलेच आहे.
भारतीय संविधानात हिंदू न्यायशास्त्रची प्रचेती आपल्या सर्वांना येते. भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल भारतीय संविधानात असलेली स्वतंत्र,समता आणि बंधुता ही तिन्ही तत्वे हिंदू न्यायशास्त्रात अधोरेखित आहेत.
भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभुमीत अर्जुनाला भागवत गीतेचे ज्ञान दिले.
त्याच कुरुक्षेत्रातील योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथाचे सारथी होऊन गीतेचे ज्ञान देत असतानांचे चित्र संविधानाच्या भाग ४ मधे नमुद आहे.
विशेष म्हणजे संविधानाचा भाग ४ हा राज्याला राज्य कसे करावे याचे निर्देशक तत्त्वे सांगतो आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनला धर्माचे निर्देशक तत्वे सांगत आहेत.
या दोन्ही बाबींमध्ये फारसा फरक नाही.
आजचा काळ सुद्धा हिंदू समाजातील राजकर्त्यांसाठी धर्मयुद्धा सारखाच आहे. आजचा कुरुक्षेत्र म्हणजे आपले आपले मतदारक्षेत्र त्यामुळे आपल्या मतदार क्षेत्रात काम करतांना अधर्माच्या मुसक्या आवळून धर्माची बाजु घ्यावी लागणार आहे. आजची रणभुमी युद्ध भूमी ही देशविघातक शक्ती आहेत , मतांतरण आहे, धर्मांतरण आहे, भारतीय संविधानाचा अपप्रचार करणारी टोळी आहे.
ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या धर्मा बद्दलच्या निर्देशक तत्वाचे पालन अर्जुनाने केले आणि धर्मयुद्ध जिंकले त्याच प्रमाणे आजच्या सत्ताधाऱ्यांनी संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांना पूर्णत्वाला घेऊन जायचे कार्य करायचे आहे.
भारतीय संविधानाचा मुळ हा हिंदून्यायतत्वशास्त्राच्या आधारावरच आहे. आणि याची प्रचेती आपल्याला संविधानाच्या अभ्यासावरून येतेच..
संविधानकर्ते किती दूरदृष्टे होते त्यांनी संविधान तयार करतांना मार्गदर्शक तत्त्वांवर बरोबर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतानाचे चित्र नमुद करून राज्यकर्त्यांना धर्माचे म्हणजेच सत्याचे पालन करण्याचे मार्गदर्शक तत्वे दिली आहे.
हिंदू एक जीवनपद्धती आहे. हिंदू ही एक ग्रंथ, एक प्रेषित, एकाच प्रकारची उपासना पद्धती. असा एकेश्वरवादी एक ग्रंथ प्रामाण्यवादी असली उपासना पद्धती नाही. ही संकल्पना सर्वप्रथम समजून घ्यावी लागते. या जीवन पद्धतीचं पहिले वैशिष्ट्य आहे ते सर्वसमावेशकतेचं आणि आपली राज्यघटना ‘कलम 1’पासून सर्वसमावेशक आहे. भारतातील मुसलमानांनी आंदोलन करून पाकिस्तान निर्माण केलं म्हणून आपले संविधान भारतातील मुसलमानांना नागरिकत्व नाकारीत नाही, धर्माच्या आधारे त्यांना वेगळी वागणूक देत नाही. हा सर्वांचा देश आहे ही संविधानाची भूमिका पहिल्या कलमापासून आहे. जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ‘कलम 13’ पासून ‘32’पर्यंत आहे. हे सगळे मूलभूत अधिकार भारतात राहणार्या सर्व लोकांसाठी आहे. मुसलमानांसाठी, ज्यूंसाठी आहे. या सर्वांसाठी आहे. ही सर्वसमावेशकता आपले जीवन मूल्य आहे. ते यांच्यातून व्यक्त होतं. आता हे स्पष्ट करायचे असेल, तर जगातील काही संविधानाची तुलना करावी लागते. 1787 साली अमेरिकेचं पहिलं लिखित संविधान निर्माण झाले. हे संविधान अमेरिकेतील फक्त गोर्या लोकांसाठी होतं. तिथल्या निग्रो लोकांना त्यात काही अधिकार नव्हते. स्त्रियांनादेखील काही अधिकार नव्हते. नंतर हळूहळू काळ बदलत गेला आणि संविधानात सुधारणा होत गेल्या. परंतु, हे संविधान निर्माण करत असताना ते ’एक्सक्ल्युझिव्ह‘ संविधान आहे, ’इनक्ल्युझिव्ह‘ नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. 1920 साली लेनिनने रशियाचे संविधान निर्माण केले. या संविधानाने श्रमिकालाच फक्त अधिकार दिले. भांडवलदार, राजघराण्यातील लोकं, सरदार, उमराव वगैरे मंडळींना काही राजकीय अधिकार दिलेले नव्हते. मतदानाचादेखील अधिकार नव्हता. रेशन मिळण्याचादेखील अधिकार नव्हता, अशी त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. याला ’एक्सक्ल्युझिव्ह संविधान‘ म्हणतात. आपल्या संविधानाची सुरुवात ’इनक्ल्युझिव्ह‘ आहे. भारताचं दुसरं सनातन मूल्य असं आहे की, परमेश्वराची आराधना ज्याला त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असते. आपल मत दुसर्यावर लादायचे नाही. नुसता ’हिंदू‘ हा शब्द घेतला तर या हिंदू एका शब्दामध्ये निरीश्वरवादी आहेत त्यांना ’हिंदू‘ म्हणतात. ईश्वर मानणार्यांना हिंदू म्हणतात. मूर्ती पूजा करणार्यांना हिंदू म्हणतात. मूर्ती नाकारण्याला हिंदू म्हणतात. एखाद्या महान संतांची पूजा करू. आम्ही गोऱखनाथांची पूजा करू. आम्ही स्वामी समर्थांची पूजा करू ते देखील हिंदूच असतात. तेव्हा अशाप्रकारच्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे आणि उपासनेचे स्वातंत्र्य आपल्याकडे दिलेले आहे. राज्यघटनेने ‘कलम 25 -26’ मध्ये हे सर्व अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. म्हणजे सर्वांना त्यांच्या त्यांच्या आवडीने ईश्वराचे उपासना करण्याचे स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत ही आपली सनातन परंपरा आहे. अशाप्रकारची मूल्य आपण घेतलेली आहेत. स्त्रीकडे बघण्याची आपली दृष्टी आहे, ती शक्तीरूप असते आणि म्हणूनच स्त्रियांना नाकारायचे नाही त्यांचे अधिकार नाकारायचे नाहीत म्हणून लिंगभेदाचं तत्व संविधानाने नाकारलं. जे अधिकार पुरूषांना तेच स्त्रियांना.
सुद्धा संविधानाने दिले.त्यामुळे भारतीय संविधान हे हिंदू जीवन पद्धतीला अनिसरूनच आहे. आणि हीच या संविधानाची विशेषता आहे.
संदर्भ- भारतीय संविधान, स संविधानाचा- रमेश पतंगे.
– ऍड. संकेत राव.