भारत रक्षक श्री नरेंद्र मोदी

0 476

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ‘ Desperate time requires desperate measures’. अशाच एका अत्यंत अटीतटीच्या कालखंडातून आपण सगळे व आपला देश जातो आहे. आपापल्या घरी सुखरूप बसून विविध पदार्थांचा आस्वाद घेत, रामायण- महाभारत पाहात किंवा कुटुंबियांसमवेत कुलर/एसी मध्ये पत्ते खेळत असताना कदाचित आपल्याला कोविड-१९ मुळे उभ्या राहिलेल्या संकटांची कल्पना करता येणार नाही.
कोरोनामुळे होणारा आजार हा अत्यंत जलदगतीने पसरून न्यूमोनिया सारखी स्थिती रुग्णाच्या शरीरात तयार करतो. यावर अद्याप रामबाण उपाय नसल्याने उपलब्ध औषधांनी उपाय केले जात आहेत. त्यात कधी यश मिळते तर कधी अपयश. कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांचे अंत्यदर्शन देखील रुग्णाच्या घरच्यांना होत नाही. असा हा रोग अत्यंत भयंकर आहे.
ही desperate पार्श्वभूमी समजल्यानंतर आता आपण desperate measures कडे येऊयात. १३० कोटींच्या देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या मोदींकडून जनतेच्या असंख्य अपेक्षा आहेत. आपले ३-४ लोकांचे कुटुंब देखील व्यवस्थित न चालविता येणाऱ्या लोकांकडून मोदींना सतत मार्गदर्शन होत असते. कधी कधी हे महाभाग मोदींचा विरोध देखील करायला कमी करत नाही. मोदींचे निर्णय व कार्य कसे चूक आहे व आम्ही कसे बरोबर आहोत याचा प्रचार प्रसार मोठ्याने करण्यात ते व्यस्त असतात, असो. गेल्या काही दिवसात जो सर्वात मोठा निर्णय मोदींनी घेतलेला आहे तो म्हणजे ‘देशव्यापी लॉकडाऊन’. संपूर्ण देशाने जरी याचा सहर्ष स्वीकार केला असला तरी अनेकांनी आपली अक्कल पुन्हा पाजळलेली दिसते. इटलीहून भारतात स्थायी झालेल्या सोनिया बाई म्हणतात, “लॉकडाऊन लागू करण्यात घाई झाली”,असो. परंतु खरच मोदींनी जर हा निर्णय या शीघ्रतेने घेतला नसता तर काय झाले असते?
जानेवारी २०२० मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला व लगेच ८ जानेवारी २०२० पासून मोदी सरकार ने भारतात कार्य सुरू केले. तरी ३० जानेवारीला २०२० ला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. १२ मार्च पर्यंत भारतात १०० हून कमी रुग्ण होते. १९ मार्च ला हा आकडा २०० पर्यंत पोहोचेल अशी स्थिती निर्माण झाली व मोदींनी ‘जनता कर्फ्यु’ २२ मार्च रोजी सफल करून दाखवला. याच दरम्यान ‘तबलिकी जमात’ या कट्टरवादी इस्लामिक धार्मिक संघटनेने दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्याजवळील त्यांच्या मरकज या मुख्यालयात काही धार्मिक कार्यक्रम ठेवले होते. या कार्यक्रमाकरिता भारतभरातून व विदेशातून अनेक मुल्ला-मौलवी जमले होते. एकूण ३५०० च्या वर तर विदेशातून ३००च्या वर मौलवी उपस्थित होते. यातील अनेक मौलवी कोरोना बाधित देशातून प्रवास करून आले होते. भारतीय विसा नियमांचे उल्लंघन करून ‘पर्यटक विसा’ वर हे मौलवी धार्मिक प्रचार करीत होते. त्यांनी आपली ट्रॅव्हल हिस्टरी देखील अधिकाऱ्यांपासून लपविली होती. दिल्लीमध्ये कलम १४४ डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट लागू असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात मुसलमान एकत्रित होतो. त्यांचा मौलाना त्यांना सांगत होता, ‘कोरोनाला घाबरू नका, अल्लाह ची प्रार्थना करा, क्षमा मागा, एकत्र या. याचा जो परिणाम व्हायचा तो झालाच! शेकडो तबलीकी कोरोनाग्रस्त झाले. याच दरम्यान मोदींनी २४ मार्चला मध्यरात्रीपासून देशभर लॉकडाऊन जाहीर केले. मरकजमधले अनेक मौलवी पळून भारतभरातील विविध मस्जिदींमध्ये जाऊन लपले. त्यांच्या वागण्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की त्यांना देशभर कोरोनाची साथ आणायची होती व म्हणून ते जागोजागी थुंकत होते.
दिनांक २५ मार्चला गुढीपाडवा होता. चैत्र नवरात्रीचे प्रारंभ! देशभरात विविध मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम होत असतात. हजारो-लाखो लोक मंदिरात दर्शनाला जातात. कीर्तन-प्रवचन, यज्ञ-याग, महाप्रसाद-भंडारे होत असतात. जर हे तबलीकी जमात चे लोक भारतभर पसरले असते आणि अशा कार्यक्रमात लोकांमध्ये मिसळले असते तर भारतात हाहाकार झाला असता. आणि समजा जर हे तबलिकी लॉकडाऊनमुळे मरकजमध्ये अडकून पडले नसते तर…? अमेरिकेसारख्या प्रगत देशात २४ तासात १४८० लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. इटलीमध्ये एकूण १४०००, स्पेनमध्ये ११०००, व अमेरिकेत ७५०० हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. जर ऐन चैत्र नवरात्रीत किंवा रामनवमी उत्सवात हे संक्रमित तबलिकी लोक पसरले असते, तर न भूतो न भविष्यती अशी स्थिती झाली असती. नवरात्रात अनेक तिर्थक्षेत्रांवर मोठमोठ्या जत्रा भरत असतात. या जत्रांमध्ये दुर्गम ग्रामीण व आदिवासी भागातील लोक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात. जर या जत्रेमध्ये या तबलिकींद्वारे कोरोनाचा संसर्ग झाला असता, तर देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना पसरला असता व अशा परिस्थितीत या रोगावर नियंत्रण मिळविणे अशक्यप्राय झाले असते.
आपल्याला कल्पना असेल की आपले माननीय पंतप्रधान हे स्वतः माँ भगवतीचे उपासक आहेत. नवरात्रात ते संपूर्ण उपास करतात. अशा व्यक्तीने ऐन नवरात्राच्या आदल्या दिवशी लॉकडाऊन करणे म्हणजे एकतर त्यांना तबलिकी जमात च्या षडयंत्राबद्दल काहीतरी ‘इनपुट’ मिळाला असेल किंवा माँ भगवतीच्या कृपेने प्राप्त झालेल्या ‘इंट्युशन’ शिवाय हे शक्य झाले नसते. हे लॉकडाऊन जर योग्यवेळी घोषित झाले नसते, तर काय स्थिती झाली असती ह्याची केवळ कल्पनाच केलेली बरी. इंग्रजी मधील म्हण ‘Desperate times need desperate measures’ ही मा. पंतप्रधान मोदींनी खरी करून दाखविली आणि ती पण अत्यंत योग्यवेळी. त्यांच्या हाकेवर आपण २२ मार्चला स्वास्थ्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांचे आभार मानले. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी मिळून या राष्ट्ररक्षक, हिंदूरक्षक व मानवतारक्षक पंतप्रधान मोदींचे आभार मानावे.
आणि हो जाता जाता जरा विचार करा, की आपण सर्वांनी २०१९ मध्ये जर आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून मोदींना पंतप्रधान केले नसते तर…
… तर कदाचित काँग्रेस किंवा कुठलेतरी गठबंधन सरकार सत्तेत असते… कुणीतरी तथाकथित ‘सेक्युलर’ पंतप्रधान असता व आज…?
…आज मी हे लिहायला व आपण सगळे हे वाचायला शिल्लक नसतो!

#Thankyoumodi

डॉ. कपिल चांद्रायण
नागपूर

Leave A Reply

Your email address will not be published.