छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथात केलेली श्रीगणेश स्तुती.
छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथात केलेली श्री गणेश स्तुती.
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा आणि कुशल राजे च नव्हते तर ते एक विद्वान कवी ही होते. त्यांचे काव्यकौशल्य ‘बुधभूषण’ या ग्रंथातून स्पष्ट होते. बुधभूषण हे एक संस्कृत भाषेतील महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहे, ज्यामध्ये विविध विषयांवर त्यांचे विचार, राजनीती आणि धार्मिक काव्य रचलेले आहे.
श्री गणेश, जो सर्वप्रथम पूजनीय आहे, त्याच्या स्तुतीने हा ग्रंथ सुरू होतो. छत्रपती संभाजी महाराजांनी श्री गणेशाचे अत्यंत भावपूर्ण शब्दांत वर्णन केले आहे. बुधभूषणमध्ये त्यांनी गणपतीची स्तुती करताना त्याच्या अवताराचे, शक्तीचे आणि त्याच्या कृपेमुळे होणाऱ्या लाभांचे वर्णन केले आहे.
१.१ : “देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् । भक्तविघ्नहनने धृतर (य) त्नं तं नमामि भवबालकरत्नम् ।।”
* (श्रीगणेशवंदना): (श्लोक १.१) :
१ : (छ. श्रीसंभाजी महाराज, श्रीगजाननांस वंदन करीत आहेत; ते म्हणतात) :- -“ज्यांची स्तुती करण्यात देव आणि दैत्य हे दोघेही सहभागी होतात; ज्यांनी हसत-खेळत मत्त हत्तीला वठणीवर आणले, जे भक्तांची संकटे दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असतात, अशा श्रीशंकरजींच्या रत्नांसारख्या तेजस्वी असणाऱ्या ‘गणपती’ नामक पुत्रांस मी (आम्ही छ. संभाजी महाराज) वंदन करतो.
संभाजी महाराजांची गणेश स्तुती भक्तीमय आणि काव्यात्म आहे, ज्यात संस्कृत भाषेतील गूढता आणि सौंदर्य दिसून येते.
छत्रपती संभाजी महाराजां बद्दल काही तथाकथित इतिहास तज्ञांकडून समाजात मुद्दाम अपप्रचार केला जातोय. संभाजी महाराज स्वराज्यारक्षक होतेच पण ते त्यासोबत धर्मरक्षक , धर्मवीर सुद्धा होते हे विसरून चालणार नाही.,
छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू धर्मनिष्ट तर होतेच, त्या सोबतच त्यांना हिंदू धर्माच्या देवी देवतांनाबद्दल नितांत आदर होता. हे अनेक उदाहरणावरून सिद्ध होत.