आज दास नवमी !

लेख

0 675

आज दास नवमी !

माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८२) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय.

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे |

वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ||

कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा |

नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ||

हा श्लोक आपण सगळ्यांनी किती तरी वेळेस लहानपणी म्हंटला असेल त्याची गणती नाही. पण वैराग्य, ज्ञान आणि कवित्व या शब्दांचा अर्थच न समजण्याच्यावयात त्या सगळ्याचा अर्थ रामदासस्वामी हे एक महान सत्पुरुष होऊन गेले एवढाच तेंव्हा समजला असेल. सखोल अभ्यासामधून ज्ञान संपादन करता येते, कवीची प्रतिभा जन्मजात असते आणि हे दोन्ही गुण अंगात असलेल्या माणसाला अहंभाव असू नये, कसलीही आसक्ती असू नये असे वैराग्य प्राप्त करण्यासाठी स्वतःवर केवढे नियंत्रण मिळवावे लागले असेल ! हे तीन गुण ज्या समर्थांच्याअंगी एकवटले होते. अशा या अलौकिक व्यक्तीमत्व असलेल्या सद्गुरू रामदासांना कोटी कोटी साष्टांग दंडवत.

गीतेत वर्णिलेला स्थितप्रज्ञ व निष्काम कर्मयोगी यांची चालते बोलते उदाहरण म्हणजे श्रीसमर्थ रामदासस्वामी.

समर्थ रामदासांनी पंधरा दिवस आधी पुर्व सूचना देऊन इ.स.१६८२ ला माघ वद्य नवमीला सज्जनगडावर देह ठेवला. तेंव्हापासून माघ वद्य नवमी ‘ दासनवमी ‘ म्हणून ओळखली जाते.

मित्रांनो, आपण मनाचे श्लोक, दासबोध किंवा त्यांचे इतर काव्य रचना जेंव्हा वाचतो किंवा ऐकतो तेंव्हा आपल्याला असे वाटत असते की जणू प्रत्यक्ष समर्थच आपल्याला ते सांगत आहेत. संतांच्या वाणीचा हा प्रभाव असतो कारण ते त्यांच्या स्वानुभवाचेबोल असतात. समर्थांनी तर देह ठेवण्याआधी आपल्या शिष्यांना दिलेल्या अखेरच्या संदेशात स्पष्ट सांगून ठेवले आहे कीं ते या जगांत त्यांच्या ग्रंथ रूपाने निरंतर वास करून आहेत.

माघ व. नवमी ला समर्थांनी तीन वेळेला मोठ्यांदा रामनामाची गर्जना केल्यानंतर त्यांची प्राणज्योत त्यांच्या शरीरातून बाहेर पडली व समोरच्या राममूर्तीत प्रविष्ट झाली. दुपारी साडे बारा वाजता त्यांनी अशा प्रकारे देह ठेवला.

समर्थ रामदासांच्या ‘ जयजय रघुवीर समर्थ ’ या गर्जनेने महाराष्ट्र जागा झाला.

दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचलमठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली.

प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारूती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचामार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला.

मारुती मंदिराची स्थापना करून तरुणांना शक्ती चे प्रतिक असणाऱ्याहनुमानाची उपासना मिळवून दिली … राष्ट्र बलशाली करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे महत्वाचे पाउल होते

सामर्थ्य आहेचळवळीचे, “जो जोकरील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे।भगवंताचे।“ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली.

खरं तर रामदास स्वामी हे मॅनेजमेंट गुरू होते.

“मॅनेजमेंट गुरू – दासबोध’’ ह्या रामदास भक्त, आणि अभ्यासु लेखक श्री. श्रीनिवासरायरीकरलिखीत पुस्तकातील ‘संघबांधणी (टीम बिल्डिंग) कशी करावी’, या संदर्भात समर्थांचे विचार काय होते, हे पाहू यात –

समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे –

बहुतलोक मिळवावे। एकविचारे भरावे।

समुदायअसावा मोठा। परितणाव असाव्या बळकट।।

संघटनेत खूप माणसे हवीत. परंतु ती एका ध्येयाने/ विचाराने भारलेली असली पाहिजेत, प्रेरित असली पाहिजेत. त्याच वेळेला नुसता समुदाय मोठा असून किंवा संघटनेत खूप लोक असून चालणार नाहीत, तर यांचे नेटवर्किंग उत्तम व बळकट असणे आवश्यक आहे, असेही ते सांगतात. संघटनेत लायक लोक शोधून काढून, निवडून नेमावेत व त्यांच्या योग्यतेचे काम त्यांना द्यावे. तसेच त्यांना मोबदला (कॉम्पेन्सेशन) व वागणूकही त्यांच्या योग्यतेची द्यावी (फ्लेक्सी पे कन्सेप्ट) असेही त्यांनी सांगितले आहे. यासंबंधीची ही ओवी –

बळकटलोक निवडावे। कामपाहोनि लावावे।

सगटमुशारे करावे। हेमूर्खपण।।

‘सगट मुशारे करावे’ म्हणजे ‘सब घोडे बाराटके’ असे धोरण हा मूर्खपणा आहे. योग्यता व लायकीनुसार अधिकार व पगार द्यावा, असेही ते सुचवितात.

लोकबहुत शोधावे। त्यांचेअधिकार जाणावे।

जाणजाणोनधरावे। जवळ दूरी।।

या ओवीतही समर्थ, ‘योग्य निवड करून (हेडहंटिंग) चांगल्या, लायक व्यक्ती शोधून, त्यांच्या योग्यतेनुसारसंघटनेत त्यांना स्थान द्यावे,’ असेच सांगतात.

कार्यकर्त्यासगमू देऊ नये।काम घेता त्रासूनये।

कठीणशब्द बोलू नये।क्षणोक्षणी।।

काम करणाऱ्याला (कार्यकर्ता/कर्मचारी) इकडे तिकडे वेळ घालवू देऊ नये. ‘टाइमपास’ करू देऊ नये (गमू देऊ नये) हे सांगतानाच, काम करून घेणारे सुपरव्हायझर/मॅनेजर यांचे कामच इतरांकडून काम करून घेण्याचे असल्याने ते काम करून घेता किचकिच करू नये, त्रासू नये आणि सारखे घालून पाडून बोलल्याने काम करणारा ‘डिमोटिव्हेट’ होतो, असे समर्थ सुचवितात. ‘डेलिगेशन’ किंवा ‘एम्पॉवरमेंट’ म्हणजेच लोकांकडे काम सोपवून ते करून कसे घ्यावे, यासंबंधी समर्थ सांगतात –

अधिकारपाहोन कार्य सांगणे।

सापेक्ष (सावधपणा/ जबाबदारीची जाणीव) पाहोन विश्वास धरणे।

आपकामगज (महत्त्व) राखणे।काहीतरी।।

क्षमता (अॅबिलिटी) बघून व जबाबदारीची जाणीव पाहूनच काम विश्वासाने सोपवणे. शिवाय काहीतरी शेंडी आपल्या हातात ठेवावी (आपला मगज राखणे), असेही ते सांगतात. म्हणजेच ‘डेलिगेशन’ केल्यानंतरहीआपले त्या कामावर काहीतरी नियंत्रण हवे, असे ते धूर्तपणे सांगतात.

टीमवर्क (संघकार्य) कसे करावे आणि ते करताना दृष्टिकोन कसा हवा हे खालील ओव्यात समर्थ सांगतात –

आडलेजाकसले जाणावे। यथाणूशक्तीकामास यावे।

मृदवचनेबोलत जावे। कोणीयेकासी।।

वागताना ‘प्रो-अॅक्टिव्हनेस’ असावा, असे ते सुचवितात. कोणाला काय अडचण आहे, मदत हवी हे ‘टीम मेंबर’ने स्वतःहून पाहून, पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे. परंतु त्याच वेळी मदत केल्याचा अहंकार न दाखवता ‘मृदवचनाने’ म्हणजे गोड भाषेतच बोलावे, असे सांगायलाही ते विसरत नाहीत. समर्थांच्याप्रत्येक वचनात किती खोल व मार्मिक अर्थ दडलेला असतो, तो या इतर सर्वच ओव्यांत पहायला मिळतो.

टीममध्ये काम करताना एकमेकांच्यासुखदु:खात सहभागी व्हायला पाहिजे व दुरावलेल्यांनासुद्धा चांगले बोलून पुन्हा संघात सामील करून घ्यायला हवे, असे ते पुढील ओवीत सांगतात.

दुसऱ्याचेदु:खे दुखवावे। परसंतोषे सुखी व्हावे।

प्राणिमात्रासमेळवून घ्यावे। बऱ्याशब्दे।।

‘माझे-तुझे’ असे करत न बसता आपल्या संस्थेचे/कंपनीचे काम आहे, अशी भावना जागृत ठेवून संघभावनेने काम करणेच योग्य, असे सांगताना ते म्हणतात –

आपलेअथवा परावे। कार्यअवघेच करावे।

प्रसंगी (Exigencyच्या वेळी) कामास चुकवावें।

हेविहित (योग्य) नव्हे।।

यापेक्षा आधुनिक विचार काय असू शकतात? आजच्या आधुनिक व औद्योगिक जगात ‘मॉडर्न मॅनेजमेंट’च्या संकल्पनांमध्ये हीच नव्हे, तर समर्थांच्याअनेक/शेकडो ओव्या चपखल व नेमक्या लागू पडतात. हे सारे त्यांनी ३५०हून अधिक वर्षांपूर्वी लिहिले, हे लक्षात घेतले तर त्यांना ‘समर्थ’ म्हणजे मोठा नेता/नेत्यांचा नेता ही पदवी का मिळाली, हे लक्षात येते. ‘विन-विन सिच्युएशन’ व्हावी व ‘नाही रे’ वर्गाला ‘आहे रे’ वर्गाने साह्य करून समाजात वर आणले पाहिजे, अशी समर्थ रामदासांची व्यापक दृष्टी होती. ती पुढील ओवीत दिसते.

बहुतांचेअन्याय क्षमावे। बहुतांचेकार्यभाग करावे।

आपल्यापरिसव्हावे पारखे जन।।

‘पारखे जन’ म्हणजे समाजातले मागासलेले लोक पुढारलेल्या समाजाच्या तोडीला/बरोबरीला येण्यासाठी, पुढारलेल्या समाजाने मदत केली पाहिजे, असे सांगणारा हा न्याय्य, दूरदृष्टीचा व बहुजन समाजाचे हित पाहणारा नेता होता, असे स्पष्ट पाहायला मिळते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

प्रसाद गणोरकर, पुणे.

संपादक – लोकसंवाद.कॉम 

Leave A Reply

Your email address will not be published.