आता देशद्रोही मानसिकता तुडविण्याची वेळ ……!
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जे.एन.यू.) मध्ये झालेल्या हल्ला-प्रति हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्याचे पडसाद देशात उमटत आहेत या पूर्वी सुद्धा जामिया मिलिया मुस्लिम विद्यापीठा मधील शांतिदूतांनी दिल्लीत घातलेल्या धुडगूस नंतर पोलिस कारवाई मुळे देशाचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडविण्याचे कटकारस्थान रचले गेले होते जामिया मधील हिंसक कारवाईची देशातील तथाकथित सेक्युलर पोंगापंडितांनी पाठराखण केली होती देशाच्या मालमत्तेचे नुकसान करू नका ही समजदारीची,शांतीची भूमिका घेतली नव्हती आता सुद्धा जे.एन.यू मधील हल्ला -प्रतिहल्ल्याच्या निमित्ताने देशात गैरसमज निर्माण करून सामान्य माणसाचा बुद्धिभ्रम केला जात आहे केंद्र सरकारला दोषी धरण्यात येत आहे देशहिता साठी रात्रदिवस इमानदारीने झटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष करून केंद्रातील सरकार सुडाच्या भावनेने वागत आहे ,विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यात येत आहे विध्यार्थ्यावर अन्याय करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला जात असल्याचा कांगावा करून संभ्रम निर्माण केला जात आहे देशातील वामपंथी,कांग्रेस,सेक्युलर मंडळींनी तर नको त्या कारणाने केंद्र सरकारला बदनाम करण्याचा सपाटा लावला आहे याआणि अशा मुद्दावरून देशात अशांतता अराजकता निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे पण हीच मंडळी जेव्हा जे. एन. यु मध्ये आझादीच्या घोषणा देऊन तुकडे गँग देशविरोधी घोषणाबाजी करतात,नक्षल हल्ल्यात जेव्हा जवान शहीद होतात तेव्हा आनंदउत्सव साजरा करून नक्षलींचे उदात्तीकरण केले जाते देश गद्दार अफजलगुरुच समर्थन करतात किवा फी वाढीच्या मुद्द्यावरून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले जाते स्वामी विवेकानंद मूर्तीची विटंबना करून “भगवा जलकर रहेंगा”म्हटले जाते तेव्हा मात्र एकही राजकीय नेता त्यांची समज काढणारी वक्तव्य करीत नाहीत किवा बोलत सुद्धा नाहीत अनेक वर्षा पासून जम्मूकश्मीरची भूमी हिंदूच्या रक्ताने रक्तरंजित होऊन सतत घुमसत होती तेथील बलात्कारीत आणि अन्यायग्रस्त हिंदू माता भगिनींच्या किंकाळ्या अशा हरामखोरांना कधीच ऐकू आल्या नाहीत राजस्थानच्या कोटा शहरात १०७ बालकाचा मृत्यु झालेला आहे तेथील कोटा जे. के.लोन हॉस्पिटलमध्ये प्रियांका ,योगेंद्र यादव,पदुकोण किंवा एखाद्या पादु का ! यांना वेळ मिळाला नाही पण जे.एन.यू.मध्ये हल्ला-प्रतिहल्ला काय झाला सारी सेक्युलर जमात जागी झाली असून हिंडीस प्रदर्शन करीत आहे चित्रपट कलावंत प्रदर्शन करीत आहेत अभिनेत्री दीपिका पदुकोण आईशी घोष, तूकडे गँग प्रमुख कन्हैय्याला भेटते मुंबईच्या गेट ऑफ इंडिया प्रदर्शन करून भारत मातेचा मुकुट असलेला काश्मिर “काश्मीर फ्री”चे पोस्टर झळकतात, उत्तर प्रदेशाच्या शांतिनिकेतन ,पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये निषेध केला जातो दुर्दैवाने जे.एन.यू साठी गळे काढणारी मंडळी पाकिस्तानमधील ननकना साहब मध्ये झालेल्या अत्याचारी कृत्यावर मुंग गिळून बसले आहेत तेथील हिंदूमहिलाच्या किंकाळ्या का ऐकू येत नाहीत? याचा विचार करण्याची वेळ आली आहे आणि वामपंथी, सेक्युलर मंडळीची दुटप्पी भूमिका लक्षात घेण्याची गरज सुद्धा आहे.
दि 5 जाने.ला आठ हजार विद्यार्थी असलेल्या दिल्लीच्या जे.एन.यू मध्ये झालेल्या हल्ल्या-प्रतिहल्ल्याची मीमांसा केली असता पोलीस यंत्रणा सदर घटनेच शोध कार्य करीत त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात येत तसेच दिल्लीच्या वर्तमानपत्र मध्ये जाहिराती प्रसिद्ध करून तपासला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे त्यामुळे शासन जे. एन. यु.हल्ल्याचे खरे चेहरे शोधून काढतील खरे चेहरे आणि कारणे समोर येतील पण जे. एन. यू हॉल -प्रति हल्ल्याच्या निमित्ताने जो धुडगुस सुरू आहे थांबला पाहिजे तसेच अनेक वर्षा पासून जे.एन.यू मध्ये तुकडे गॅंग कम्युनिस्ट,आणि तथाकथित सेक्युलर मंडळीचा ,नक्षल समर्थकांचा अड्डा बनलेला आहे या कडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. देशात अनेक दिवसांपासून तिहेरी तलाक कलम ३७०, श्री रामजन्मभूमीचा निर्णय,एन.आर.सी,सी.ए.बी. मुद्दावरून विरोधी शक्तींच्या मनात देशात अराजकता निर्माण करण्याचा मनसुबा खदखदत होती आणि एन.आर. सी आणि सि. ए. बी ला विरोध करण्याच्या मुद्द्याने अशा मंडळींना देशात अराजकता निर्माण करण्याचा मुद्दा मिळाला आहे आता जे. एन. यु. मधील हल्ला -प्रतिहल्ल्याच्या निमित्ताने कांग्रेस , वामपंथी तथाकथित सेक्युलर मंडळी ,पुन्हा देशात वणवा भडकवीत आहेत तसेच या निमित्ताने समाजात गैरसमज, बुद्धीभ्रम, निर्माण करून समाजात आग लावण्याचं काम सुरू आहे. देशातील मीडिया,चित्रपट कलावंत ,बुध्दीवंत, साहित्यकांमध्ये बुद्धिभ्रम निर्माण करून उभी फूट निर्माण करण्याच काम सुद्धा सुरू आहे त्यामुळे आता आपल्याच देशातील पाकिस्तानी ,नक्षल स्लिपर सेल असलेली तथाकथित सेक्युलर मंडळी किवा सेक्युलर राजकीय मंडळींची कारवाईची दिशा पाहता देशात वाढत चाललेली देशद्रोही व देशगद्दारी मानसिकता तुडविण्याची वेळ आलेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
( photo – google )
- अशोक राणे.