एकतेचा व समरसतेचा संत मार्ग – कार्तिक एकादशी निमित्ताने.

0

एकतेचा व समरसतेचा संत मार्ग – कार्तिक एकादशी निमित्ताने.

महाराष्ट्र ही संतांची भूमी. अठरापगड जातीमधून आलेले संत सर्व समाजाला घेऊन पंढरपूरला विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी- कार्तिकीला लाखोच्या संख्येत एकत्र येतात. हिन्दू समाजाच्या एकत्वाचे हे विलोभनीय दर्शन असते.
आळंदी असो वा देहु व इतर स्थानावरून हे वारकरी विविध साधनांनी पंढरपूर क्षेत्री पोहचतात. पंढरपुर हे सर्वांचे जणु माहेरच. आध्यात्मिक अधिष्ठान असलेली ही भूमी संपूर्ण भारताचे प्रेरणा केंद्र बनले आहे.
राम अयोध्येचा , कृष्ण भगवान मथुरेचे आणि या दोन्हींचे एकत्रित अवतरलेले रूप म्हणजे विटेवरील पांडुरंग महाराष्ट्राचा. ही आध्यात्मिक हिन्दू चेतना भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा भक्कम आधार आहे.
उत्तर भारतातील संत रविदास हे पंढरीचे वारकरी झाले तर संत नामदेवांनी पंजाब व उत्तर भारतात वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. “ज्ञानदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस “..
राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ पंढरपुर क्षेत्री लिहिला. भगवद्गीतेचे हे नवे रूप ग्रामातील समान्य जनाच्या हाती सुपुर्द केले. त्यात मंत्र दिला,”आवो सुंदर देश बनाये,सुंदर अपना गाव बनाए ॥”

संतानी निर्माण केलेली ही एकतेची वज्रमूठ अधिक पक्की करू या.
एकत्र राहू, मजबूत राहू, सुरक्षित राहू ;
आता हिन्दू समाजाचे विघटन कदापी नाही.

राम कृष्ण हरी ।

Leave A Reply

Your email address will not be published.