गणपती विसर्जन मिरवणूकीवर झालेले हल्ले अयोग्यच.

0

गणपती विसर्जन मिरवणूकीवर झालेले हल्ले अयोग्यच.

हिंदू सण केवळ धार्मिक प्रथा किंवा प्रतीकांचे पालन करतात असे नाही तर भारतातील विविध लोक आणि प्रदेशांना एकत्र आणणारे खोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध त्यामुळे दृढ होतात. ही एकता भारताची सामाजिक भावना बळकट करण्याला चालना देते, सलोखा निर्माण करते आणि विविध स्तरावरील आक्रमणे, तणाव आणि तिची संस्कृती पुसून टाकण्याच्या प्रयत्नांना तोंड देऊनही भारतीय सभ्यतेच्या चिरस्थायी शक्तीचे प्रदर्शन घडवते.

विशिष्ट समुदायावर सतत होणारे हल्ले, भूतकाळातील मुस्लिम आक्रमकांपासून ते रामनवमी, महाशिवरात्री, हनुमान जयंती आणि होळी या हिंदू सणांच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटनांपर्यंत हिंदू सणांवर नियोजित पध्दतीने कलेल्या हल्ल्यांचा पॅटर्न यामध्ये सातत्य दिसते. त्याचप्रमाणे, यावर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विशिष्ट समुदायाकडून हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

चला तर पाहूयात कुठे कुठे अशा घटना घडल्या आहेत.

भिवंडी –

महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घुघाटनगर येथील गणपती मूर्ती नदीनाका कामवारी नदीत विसर्जनासाठी नेत असताना हा हल्ला झाला. ही मिरवणूक वंजारपट्टी नाका येथील हिंदुस्थानी मशिदीजवळून जात असताना काही हिंदुत्वविरोधी घटकांनी मूर्तीवर दगडफेक करून नुकसान केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात गणपती मुर्तीचे नुकसान झाले आणि मिरवणूकीत भाविकांमध्ये रोष निर्माण झाला. तोडफोडीच्या या कृत्याने दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गणेश मंडळांनी संबंधितांना अटक करण्याची मागणी करत विसर्जन मिरवणूक पुढे जाण्यास नकार दिला. काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

2. जळगाव जामोद –

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या घटनेनंतर तणाव वाढला. मिरवणूक उत्साहात पुढे जात असताना, भाविक ढोल ताशांच्या तालावर नाचत आणि आनंदोत्सव साजरा करत असताना, अचानक दिवे गेले आणि जमावावर दगडफेक झाली, त्यामुळे गोंधळ उडाला. एका उंच इमारतीच्या खिडकीतून दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे मिरवणुकीला लक्ष्य करण्यासाठी जाणूनबुजून दगड घरात ठेवण्यात आले होते अशी शंका निर्माण झाली. वाहनांची तोडफोड करून परिस्थिती चिघळली. यानंतर गावातील 15 गणेश मंडळांनी गणपती विसर्जन सुरू ठेवण्यापूर्वी दगडफेकीसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली. 12 तासांपेक्षा जास्त काळ उलटूनदेखील गणपतीचे विसर्जन झाले नाही. परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी रात्रभर मंडळांशी बोलणी केली. दरम्यान, यापुढे अशांतता निर्माण होऊ नये यासाठी गावातील विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दगडफेकीच्या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि गणेशभक्त जखमी झाले, त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य वाढले.

3. अमळनेर –

गणेशोत्सव मिरवणुकीवर आणखी एक हल्ला झाला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात जय माता दी गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक गांधलीपुरा येथील अनारगल्ली मोहल्ला येथून जात असताना मिरवणुकीवर हल्लेखोरांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत गणेश मूर्तीचा हात तुटल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली.

4. दौंड –

11 दिवसांच्या गणपती उत्सवात हिंसक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवार, 14 सप्टेंबर रोजी पुण्यातील दौंड परिसरात यासीन इस्माईल सय्यद याने एका हिंदू व्यक्तीवर गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी हल्ला केला. आरोपींनी सितारा तोरवेला धारदार शस्त्राचा वापर करून हिंदू धर्माशी संबंधित कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(१), आणि ३५१(२) अंतर्गत महाराष्ट्र पोलसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राबाहेरही अशा घटना घडल्या आहेत.

5. 11 सप्टेंबर रोजी, कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात म्हैसूर रोडवरील नागमंगला शहरातील एका दर्ग्याजवळ विसर्जन मिरवणुकीत गणेश मूर्तीवर दगडफेक झाल्यानंतर जातीय संघर्ष झाला. या हल्ल्यामुळे हिंदू समाज संतप्त झाला आणि त्यांनी पोलिसांकडे न्याय मागितला. पोलिस ठाण्यासमोर गणेशमूर्ती ठेवून जोरदार आंदोलन केले.

6. 7 आणि 8 सप्टेंबर रोजी गुजरातमधील सुरत येथील लाल गेट परिसरातील गणेशोत्सव पंडालवर कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी दगडफेक केली. यामुळे शेकडो हिंदूंनी निषेध केला आणि कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दगडफेक करणाऱ्या २७ जणांना अटक करण्यात आली.

7. नखत्रणा येथील कच्छ गावातील गणेश मंडपावर दगडफेक करण्यात आली होती जिथे भगवान गणेशाच्या मूर्तीची तोडफोड करून कट रचण्यासाठी मुस्लिम मुलांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली. मौलाना गुलाम हुसेन जाफर, आसिफ सुमरा पदियार, साहिल रमजान आणि हनिफ जुसान यांचा अटकेत समावेश आहे.

8. 7 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील मोचीपुरा येथील भगवान गणेश मूर्तीवर समाजकंटकांनी दगडफेक केली. पूजा समितीचे सदस्य गणेश प्रतिष्ठापनेसाठी खेतलपूरहून मेहंदीकुई बालाजी मार्गे हातीखान मोचीपुरा येथे मूर्ती घेऊन जात असताना कोणीतरी मूर्तीवर दगडफेक केली. या हल्ल्यामुळे प्रचंड निदर्शने झाली आणि सुमारे 500 लोकांनी स्टेशन रोड पोलिस स्टेशनला घेराव घातला आणि दगडफेक करणाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

कट्टरपंथी इस्लामवाद्यांचे हे नियोजित हल्ले गंभीर चिंता वाढवतात कारण हे ब-याच काळापासून होत आहे. गंमत म्हणजे, हा तोच समुदाय आहे जो अनेकदा स्वतः पीडित असल्याची भूमिका बजावतात आणि त्यांच्यावर झालेल्या कथित अत्याचाराचा निषेध करतात. हे हल्ले भारताची एकता कमकुवत करण्याच्या प्रयत्न करतात. हे हल्ले हिंदू सणांचा आनंद आणि विविधतेतील एकतेला खीळ घालतात. शिवाय, हे हल्ले अधिक संघटित झाले आहेत, ज्यात केवळ हिंसाच नाही तर हिंदू सणांचे महत्व कमी करण्याच्या उद्देशाने न्यायालयीन आणि सामाजिक लढा दिला जातो. राष्ट्रप्रेमाची भावना कमकुवत करण्यासाठी रचलेल्या या ऑर्केस्टेटेड हल्ल्यांमागील कट्टरपंथी घटकांना उत्तर देणे महत्त्वाचे आहे.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.