गौरवशाली भारतीय कालगणना

भाग १

3

गौरवशाली भारतीय कालगणना भाग १

सांप्रदायिक व वांशिक अभिनिवेश बाजूला ठेवून विचार केला तर हिंदू कालगणनाच वैज्ञानिक सत्याच्या कसोटीला उतरू शकते. या कालगणनेचा प्रारंभ 197 कोटी वर्षांपूर्वी सध्याच्या ब्रह्मांडसृष्टीच्या 51 व्या कल्पाच्या सुरुवातीस केला गेला. कल्पाची विभागणी मन्वंतर व महायुगात केली आहे.
सध्या सातवे म्हणजे वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. त्यातील 28 वे महायुगातील कलियुग चालू आहे. या कलियुगाच्या 52 व्या शतकाकडे जग वाटचाल करीत आहे. महाभारतीय युद्ध सुरू असतांना व्दापर युग संपून कलियुग सुरू झाले व त्या युद्धात युधिष्ठिरास जय मिळाला. म्हणून या कालगणनेस भारतयुद्ध-संवत, युधिष्ठिर शक, किंवा युगाब्द अशी नावे मिळाली आहेत. या युगाब्दाचा आरंभ इसवीपूर्व 3102 फेब्रुवारी 18 या दिवशी रात्री 12 किंवा प्रात:काली झाला, असे सध्या समजतात.
कालगणना ही खगोलीय गणना आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि गतीशी संबंधित म्हणजेच विश्वातील पृथ्वी, ग्रहगोल, सूर्य यांच्या गतींवरून मनुष्याने केलेली क्रमबद्ध कल्पना म्हणजे काल होय.
भारतीय कालगणनेचा सर्वात लहान (सूक्ष्मातिसूक्ष्म) घटक म्हणजे त्रुटि. त्रुटि म्हणजे एका सेकंदाचा 33,750 या भाग. सर्वात मोठा भाग महाकल्प. महाकल्प म्हणजेच सध्याच्या ब्रह्मांडाचे आयुष्य. या महानतम घटकाची व्याप्ती -31,104 शतकोटी वर्षे इतकी आहे. सूर्यासमोर असलेल्या भागास अह = (दिवस) तर मागील भागास रात्री म्हणतात. पृथ्वीच्या गतिमुळे मअहोरात्रिफ होतात. अहोरात्रिलाच सावनदिन किंवा भूदिन म्हणतात. कालांतराने अ-होरा-त्र या शब्दातून होरा शब्द आला.
आंग्ल भाषेतील ऑवर (र्हेीी) हा शब्द होरा या शब्दाचेच भ्रष्ट रूप होय.

चतुर्युगमान
प्रदीर्घ कालावधीच्या गणनेसाठी अत्याधिक दीर्घ कालदर्शक युगांची निर्मिती झाली. 1200 दिव्य वर्षाचे कलियुग म्हणजे मानवी वर्षे 1200 ह्न 360 – 4 लाख 32 हजार वर्षे होतात. कलिचा अर्थ एक. त्यानंतर द्वापरयुग. ते कलीच्या दुप्पट. 2400 दिव्य वर्षे किंवा 8 लाख 64 हजार मानवी वर्षे. त्रेतायुग कलियुगाच्या तिप्पट कालावधीचे. 3600 दिव्य वर्षे = 12 लाख 96 हजार मानवी वर्षाचे. सत्ययुग कलियुगाच्या चौपट 4800 दिव्य वर्षे = 17 लाख 28 हजार मानवी वर्षांचे. ही चार युगे मिळून एक महायुग.
भारतीय विद्वानांच्या मते कल्पारंभात सातही ग्रह एकत्र आले होते. ब्रह्मगुप्त आणि द्वितीय आर्यभट्टांच्या मते 4 लाख 32 हजार वर्षांनी त्याची पुन्हा युती होते. वर्तमान कलियुगाचा आरंभ ख्रिस्ताब्द पूर्व 3102 मध्ये 20 फेब्रुवारीला 2 वाजून 27 मि. 30 सेकंदांनी झाला. त्यावेळी सर्व ग्रह एका राशीत होते.

मन्वन्तर गणना
भारतीय मनीषींनी खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला काळाचा वेध आश्चर्यजनक आहे. चतुर्युग आणि महायुग ही परिमाणे सुद्धा सृष्टीचा कालक्रम मोजायला अपुरी आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी जगत्क्रम आणि पृथ्वीच्या ध्रुवतेमधील परिवर्तन यांचा आधार कालगणनेसाठी घेतला. सृष्टिक्रमातील परिवर्तन 32 कोटी 25लाख 80 हजार वर्षांत होते. योगवसिष्ठात या संबंधी म्हटले आहे. – प्रत्येक मन्वंतरात जगत्क्रम बदलतो. जगाच्या उत्पत्ति, स्थिती व प्रलयानंतर मन्वंतर आरंभ होते. नव्या उत्पत्तीबरोबर दिशाही बदलतात. हे जग खरे की खोटे समजत नाही. बुद्धी भ्रमित होते. 32 कोटी 25 लाख 80 हजार वर्षाचा कालखंड म्हणजे मनु. वैदिक ऋषींनी सृष्टीचा पंचमंडल क्रम शोधून काढला. चंद्रमंडळ, पृथ्वीमंडल, सूर्यमंडल, परमेष्ठीमंडल आणि स्वायंभूव मंडळ. चंद्रमंडल पृथ्वीमंडलाभोवती, पृथ्वीमंडल सूर्यमंडलाभोवती, सूर्यमंडल परमेष्ठी मंडलाभोवती (आकाशगंगेचे केंद्र) केंद्र तर परमेष्ठीमंडल स्वायंभूव मंडलाभोवती मंडलाकार वृत्तात परिभ्रमण करतात. हा परिभ्रमण क्रम कालखंडाच्या जन्माचे कारण आहे.
सूर्यमंडलाच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीच्या ध्रुवता आणि दिशाक्रमात तसेच जगत्क्रमात परिवर्तन होत राहते.
आधुनिक गणिती अनुमानानुसार सूर्याचा परमेष्ठी मंडलाच्या परिभ्रमणाचा मार्ग 2,00,00,000 खर्व कि.मी. इतका दीर्घ आहे. एका सेकंदाला 250 कि.मी. वेगाने सूर्य हे परिभ्रमण 25 ते 27 कोटी वर्षात पूर्ण करतो. प्राचीन भारतीय गणनेनुसार सूर्याला या परिभ्रमणास 32 कोटी वर्षे लागतात. या परिभ्रमणाच्या कालखंडास मनु किंवा मन्वंतर म्हणतात. एका मन्वंतरात 71 महायुग काल + एक सत्ययुग काल इतका कालखंड येतो. यातील एका सत्ययुगाच्या अधिक कालखंडाला संधिकाल म्हणतात. सूर्यसिद्धांतानुसार (1,18) हाच मन्वंतराचा जलप्लावनाचा काल आहे. कल्पमान परमेष्ठी मंडलाचा स्वायंभूव मंडळाभोवतीचा परिभ्रमण काल म्हणजे कल्प. 14 मन्वंतरे, 15 सत्ययुगे = 1000 महायुगे = 432 कोटी वर्षे हा कालखंड एका कल्पाचा होतो. अथर्ववेदात ही गणना दिली आहे. शत तेज्युतं हायनान् द्वे युगे त्रीणि चत्वारि कृण्म:। इंद्राग्री विश्वे देवास्ते नकुमन्यनतामह्णीयमाना:॥
अयुत म्हणजे 10 हजार, शत अयुत – 10 लाख, अयुताच्या पुढे 2,3,4 या संख्या सांगितल्या आहेत. अंकानाम् वामनो गति: या सिद्धांतानुसार 432 या संख्येवर 7 शून्ये म्हणजे 432 कोटी वर्षे. हाच विश्वदेवाच्या (ॠरश्ररुळशी) परिभ्रमणाचा काल होय.
ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे 1 कल्प, एक रात्र म्हणजे एक कल्प, अहोरात्र म्हणजे दोन कल्प. म्हणजे 864 कोटी वर्षे होतात.
ब्रह्माचे एक वर्ष = 864 कोटी ह्न 360 = 31,10,40,00,00,000 इतकी वर्षे.
ब्रह्माचे आयुष्य 100 वर्षाचे ही संख्या येते – 31,10,40,00,00,000,00 संपूर्ण ब्रह्मांडाचा (आकाशगंगेचाही) काल हाच होय.
ब्रह्माच्या जीवनाची पहिली 50 ब्राम्हा वर्षे प्रथम मपरार्धफ व नंतरची 50 ब्राम्हा वर्षे द्वितीय परार्ध म्हणून ओळखली जातात.
जलप्रलय आणि नवीन सृष्टीचा प्रारंभ भारतीय मनीषींनी खगोलीय ज्ञानाच्या आधारावर काळाचा वेध घेऊन भविष्यातील संकेतही सूचित केले. विष्णुपुराणात म्हटले आहे. 432 कोटी वर्षात नियमित जलप्रलय होतो. तेव्हा पृथ्वी वसुंधरा राहात नाही. 12 आदित्य म्हणजेच 12 राशीतील सूर्याची किरणे पृथ्वी तप्त करतील. पृथ्वीवरील समस्त जल नष्ट होईल. चंद्र, बुध, शुक्र या ग्रहांप्रमाणेच हा ग्रहही निर्जन, शुष्क होईल. बृहस्पतीवर तोपर्यंत वसूंना धारण करण्याची क्षमता आली असेल. भारतीय ऋषींनी मांडलेला सिद्धांत, त्यांची वैज्ञानिक झेप व त्यातील अचूक संकेत स्पष्ट करतात.

युगांचें वर्षमान
432000 या संख्येला 4, 3, 2 व 1 यांनीं अनुक्रमें गुणिलें असतां ज्या संख्या येतील, तितक्या सौरवर्षांचीं कृत, त्रेता, द्वापर व कलि अशीं अनुक्रमें चार युगें होतात. यावरून 1728000 सौरवर्षांएवढें कृतयुग, 1296000 सौरवर्षांएवढें त्रेतायुग, 864000 सौरवर्षांएवढें द्वापरयुग व 432000 सौरवर्षांएवढें कलियुग अशीं माने आहेत. या प्रत्येक युगाच्या कालामध्यें प्रारंभीं त्याचा द्वादशांश भाग आरंभसंधि व तेवढाच युगाच्या शेवटीं विरामसंधि म्हणून समजला जातो. उदाहरणार्थ, कलियुगवर्षें 432000 याचा बारावा भाग 36000 इतक्या वर्षांचा होतो. म्हणून कलियुगाचीं जीं एकंदर वर्षें वर सांगितलीं, त्यांतीलच पहिलीं 36000 वर्षें त्या युगाचा आरंभसंधि म्हणून समजावीं, व शेवटचीं 36000 वर्षें विरामसंधि म्हणून समजावीं. अर्थातच मध्यें राहिलेलीं 360000 वर्षें हें खरें कलियुग होय. असाच प्रकार प्रत्येक युगाचा समजावा. या चारही युगांचीं एकंदर वर्षें 4320000 होतात, याला ममहायुगफ असें म्हणतात. ज्योतिषशास्त्रांत तर कृत, त्रेता, द्वापर व कलि हे चार मयुगांघ्रिफ (युगचरण) म्हणून मानिले आहेत, व त्यासर्वांच्या मिळून एकंदर समुदायाला (महायुगाला) मयुगफ असें म्हटलें आहे.

मन्वंतरगणना
71 युगें (महायुगें) झालीं म्हणजे एक मन्वन्तर (मनु) होतें. आणि एक मन्वंतर संपून दुसरें सुरू होण्यापूर्वी मध्यंतरीं कृतयुगाएवढा संधिकाल
असतो. त्या संधिकालांत जलप्रलय होतो. यावरून 71 महायुगें म्हणजे 306720000 सौरवर्षें झालीं कीं एक मन्वंतर होतें. आणि इतक्या वर्षांचें एक मन्वंतर झाल्यानंतर कृतयुगाइतकीं 1728000 वर्षें संधिकाल होतो व मग दुसरें मन्वंतर सुरू होतें.

कल्पगणना
एका कल्पामध्यें 14 मन्वंतरें व 14 संधिकाल इतकीं वर्षे होतात, व कल्पाच्या प्रारंभीं कृतयुगाएवढाच आणखी एक पंधरावा संधिकाल
कल्पारंभसंधि म्हणून असतो. याप्रमाणें पाहिलें असतां 14 मन्वंतरांचीं वर्षे 4294080000 इतकीं होतात. आणि पंधरा संधिकालांची वर्षे 25920000 इतकीं होतात. या सर्वांची बेरीज 4320000000 वर्षें हीं एका कल्पाचीं सौरवर्षें झालीं. एवढ्याच कालांत 1000 महायुगें होतात. याप्रमाणें एक हजार महायुगांइतक्या (4320000000) वर्षांनीं भूतसंहारकारी कल्प पूर्ण होतो. यालाच ब्रह्मदेवाचा दिवस म्हणतात, व हा दिवस संपल्यावर एवढीच मोठी त्याची रात्र असते. याप्रमाणें ब्रह्मदेवाच्या एका अहोरात्रामध्यें 8640000000 इतकीं सौरवर्षें होतात.
ब्रह्मदेवाची आयुष्यगणना ब्रह्मदेवाचें एकंदर आयुष्य शंभर वर्षें आहे. एवढ्या कालाला महाकल्प असें नांव पूर्वाचार्यांनीं दिलेलें आहे. काल हा अनादि आहे. तेव्हां आजपर्यंत किती ब्रह्मदेव होऊन गेले असतील, हें मला जाणता येत नाहीं, असें भास्कराचार्य म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या एका अहोरात्राचा जितका काल वर सांगितला. तशा 360 अहोरात्रांचे त्याचें एक वर्ष होतें व तशी शंभर वर्षे ब्रह्मदेवाचें एकंदर
आयुष्य आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचें एकंदर आयुष्य 311040000000000 इतकी सौरवर्षे एवढें आहे.
सध्यां ज्या ब्रह्मदेवाचा अधिकार कालावर चालू आहे. त्याचे अर्धे आयुष्य गेले असें कोणी म्हणतात, केवळ चालू असलेल्या कल्पाच्या प्रारंभापासून सिद्धान्तग्रंथांत ग्रहसाधन सांगितलेलें असतें.सध्यांच्या पंचागांत ब्रह्मदेवाचीं 50 वर्षें होऊन गेली व एकावन्नाच्या वर्षाचा पहिला दिवस चालू आहे असें मानिलेलें असतें. (photo – google)

क्रमश:

अनिल सांबरे, नागपूर.
मा. 9225210130

सदर लेखक समाजसेवक असून इतिहासाचे अभ्यासक आहेत. मोबाइल नंबर - ९२२५२१०१३०

3 Comments
  1. अनिल says

    धन्यवाद. चांगला उपक्रम आहे अभिनंदन आणि शुभेच्छा

  2. अतिशय सुंदर

  3. सुंदर माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.