अदानी आणि ISKCON चे महाकुंभ मध्ये मोठे योगदान.
अदानी आणि ISKCON चे महाकुंभ मध्ये मोठे योगदान.
प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात अदाणी समूह आणि इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (ISKCON) इस्कॉन यांनी ‘महाप्रसाद सेवा’ उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत दररोज 1 लाख, म्हणजेच एकूण 50 लाख भाविकांना मोफत भोजन प्रसाद दिले जाणार आहे.
महाप्रसाद सेवेची वैशिष्ट्ये :
भोजन वितरण : 40 वितरण केंद्रांद्वारे भोजन पुरवठा केला जाईल. प्रसाद पानांच्या पत्रावळींसारख्या पर्यावरणपूरक भांड्यांमध्ये दिला जाईल.
स्वयंसेवकांची भूमिका :
2,500 स्वयंसेवक अत्याधुनिक स्वयंपाकगृहांमध्ये भोजन प्रसाद तयार करण्यासाठी कार्यरत असतील. स्वच्छता राखण्यासाठी 18,000 स्वच्छता कर्मचारी तैनात केले जातील.
विशेष सुविधा :
दिव्यांग, वृद्ध आणि लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, ज्यामध्ये गोल्फ कार्टद्वारे वाहतूक सुविधा पुरवली जाईल.
धार्मिक साहित्य वितरण :
भाविकांना मोफत आरती संग्रह वितरित केले जातील, ज्यामध्ये विविध देवतांच्या आरत्या समाविष्ट असतील. तसेच भगवद्गीतेच्या 5 लाख प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे.
अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अडाणी यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि इस्कॉनच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता दर्शवली आहे. त्यांनी या सेवेचे वर्णन राष्ट्रभक्तीचे सर्वोच्च स्वरूप म्हणून केले आहे.
महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल आणि धार्मिक अनुभव अधिक समृद्ध करेल.