हिंडनबर्ग हिट-जॉब (थ्रेड) :
हिंडनबर्ग हिट-जॉब (थ्रेड) :
गेले काही दिवस ‘इकोसिस्टिम’ भलतीच कामाला लागलेली दिसत आहे. दरवर्षी 26 जानेवारीला येणाऱ्या ‘मूड ऑफ दि नेशन’ सर्व्हेच्या आठवड्यातच बागेश्वर धाम, मोदी डॉक्युमेंटरी व हिंडनबर्ग! यातील देशाचं सगळ्यात मोठं नुकसान ज्यातून होऊ शकतं, तो आहे हिंडनबर्ग रिपोर्ट. हा रिपोर्ट आणि ही संस्था याबद्दल नंतर. त्याआधी थोडक्यात जी आकडेवारी देत आहे त्यावर एक नजर मारा.
25 जानेवारीला जगातील 2 नंबरचे श्रीमंत उद्योगपती अदानी 26 जानेवारी रोजी तिसऱ्या क्रमांकावर तर 29 जानेवारीला 7वे श्रीमंत बनले! अदानी यांची श्रीमंती 4 दिवसात 132000 कोटींनी कमी झाली. मग प्रश्न हा आहे की केवळ दोन-चार दिवसात असं काय घडलं की गौतम अदानी यांचं 132000 कोटी रुपये एवढं पर्सनल नुकसान आणि गुंतवणूकदारांचे 275000 कोटी रुपये एवढं नुकसान झालं? अदानी समूहातील सगळ्या कंपन्यांचे शेअर्स 20% ने पडले?
तर, एक हिंडनबर्ग नावाच्या रिसर्च संस्थेने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी म्हणे 2 वर्षे अदानी ग्रुप वर रिसर्च केला आणि मनी लॉंडरिंग, मार्केट मॅनिप्युलेशन व बँका मॅनेज करून अदानी यांनी झोल केलाय व त्यांचे शेअर्स 85% ओव्हर-व्हॅल्यू आहेत असा निष्कर्ष काढला! हा रिपोर्ट लेफ्ट-लिबरल मीडियाला पुरवून त्यावरून हिंडनबर्गने एकच गदारोळ माजवला आणि परिणामी, अदानी ग्रुपचे शेयर्स गडगडले आणि अदानी दुसऱ्या, तिसऱ्या नंबर वरून सातव्या नंबर वर आले. पण, हा रिपोर्ट आणि गडगडलेले शेयर्सचे भाव एवढंच हे प्रकरण नाहीये..
अदानी 27 जानेवारी रोजी एक 20000 कोटींचा FPO बाजारात आणत असताना हा रिपार्ट बाहेर आणण्यात आला. एका दिवसात 3112-3276 चा FPO असताना बाजारात शेयर 2761 वर मिळू लागलाय! हिंडनबर्ग रिपोर्ट चा टायमिंग या FPO ला जुळवून साधण्यात आला होता. लगेच इकडे आपल्या अर्धवट मीडियाने मोदी, अदानी, गुजरात, एलआयसी, गुंतवणूकदार, बँका असं कॉकटेल बनवून गोंधळ घालायला सुरवात केली. अतिशय धोकादायक नरेटिव्ह बनवण्यात आले व ते पुढे रेटण्यात आले. सो-कॉल्ड फॅक्ट-चेकर जमात चिडीचूप्प बसून राहिली..
मग प्रश्न असा आहे की नेमकं चाललंय तरी काय? There is no smoke without fire. काही तरी गडबड नक्कीच आहे असा भ्रम पसरवण्यात लेफ्ट-लिबरल जमात यशस्वी ठरली यात शंका नाही.
म्हणून, काही फॅक्ट मी इकडे मांडतो ज्याने नेमकी ‘गडबड’ तुमच्याही लक्षात येईल..
१.) अदानी यांनी NDTV विकत घेऊन रविश कुमार याची हकालपट्टी केली, त्यानंतर रविश कुमार कुठं होता?
उत्तर : रविश कुमार एक महिना अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये होता आणि हिंडनबर्गच्या न्यूयॉर्क मधील कार्यालयात तो 6 वेळा गेला होता..😊
२.) हिंडनबर्गने अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांवर 2 वर्षे रिसर्च केला असा त्यांचा दावा आहे, त्यात हिंडनबर्गकडून अदानी समूहातील कोणत्याही कंपनीशी/अधिकाऱ्यांशी किती वेळा कोणत्याही माध्यमातून संपर्क साधला वा प्रश्न विचारले/माहिती घेतली? उत्तर : शून्य
वाह, क्या रिसर्च है..😊
३.) UPA काळात घाटा ‘बुक’ करणाऱ्या व NPA च्या ओझ्याखाली डबघाईला आलेल्या सरकारी बँका आता कुठं यावर्षी प्रॉफिट बुक करू लागल्या आहेत. NPA रेकॉर्ड लेव्हल वर खाली आले आहेत. म्हणून या बँकांना discredit करणे व बँकिंग सेक्टर विषयी पॅनिक निर्माण करणे हा हेतू आहे का? उत्तर आहे : होय..
४.) हिंडनबर्ग उत्पन्नासाठी काय करते? उत्तर : कॉर्पोरेट कंपन्यांबद्दल माहिती (खरी-खोटी) बाहेर काढून त्यांचे शेअर्सचे भाव पडले की ही संस्था नफा मिळवते! अदानी प्रकरणात त्यांनी हे जाहीरपणे मान्य केलंय!! 2017 पासून त्यांनी 17 मोठ्या कंपन्यांना टार्गेट करून कोट्यवधी डॉलर कमावलेत..
५.) कोणत्या कंपन्या हिंडनबर्ग टार्गेट करते? उत्तर : ‘ग्रीन एनर्जी’, इन्फ्रा व इलेक्ट्रिक वेहीकल(EVs) क्षेत्रातील कंपन्या हिंडनबर्गच्या टार्गेट वर प्रामुख्याने असतात. याआधी टेस्ला आणि एलोन मस्कही यांच्या टार्गेटवर होते..
६.) मग या हिंडनबर्ग ला मोकळे रान कसे मिळाले आहे? कारण, लेफ्ट लॉबी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे. असं नाही की यांना बांबू लागणार नाहीये. शॉर्ट-सेलिंग आणि हेज फंडांशी संगनमत केल्याबद्दल हिंडनबर्गची अमेरिकन सरकारच्या न्याय विभागाकडून गुन्हेगारी चौकशी सुरू झाली आहे..
७.) भारतीय मीडिया, वॉल स्ट्रीट जर्नल आणि टाईम मॅगझीन ने यावर भरभरून लिहायला/बोंबलायला सुरू केलं आहे. त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. यांत लेख लिहिणाऱ्यांची नावं बघा आणि त्यांच्याबद्दल गुगल करा.. सगळे चीन, सौदी आणि व्हॅटिकनच्या पे-रोल वरील मंडळी आहेत..😊
हिंडनबर्ग संस्था फायनान्शियल फॉरेन्सिक रिसर्च करत असल्याचे म्हणत असली तरी ही सुपारी त्यांना इकडच्या लेफ्ट-लिबरल लॉबीच्या माध्यमातून काँग्रेसनेच दिली आहे. मोदी, भारत सरकार, बँका, इतर वित्तीय संस्था, भारताची प्रतिमा, गुंतवूकदारांचे पैसे असे अनेक फॅक्टर यात आहेत. जर अदानीने गैरव्यवहार केले असतील तर त्याला जरूर शिक्षा व्हावी, पण फक्त भारत जोडो यात्रेची सांगता जोरात व्हावी म्हणून देशाची प्रतिमा खड्ड्यात घालणे व राजकीय फायद्यासाठी गुंतवणूकदारांचे व बँकांचे नुकसान करणे हे काँग्रेसला अशोभनीय आहे. असो..
हे सर्व प्रकरण सुरू झालं तेंव्हा एक ट्विट Lt.Gen.D S Hooda (2016 सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनशी संबंधित एक महत्वाचे अधिकारी) यांनी केलंय. बरोबर बोलले हुडा साहेब! आता बंदुका, तोफ, फायटर प्लेन, मिसाईल यांनीच युद्ध होत नाही. त्यांच्या ट्विट मधील IWचा अर्थ आहे इन्फर्मेशन वॉरफेअर! त्यांचं ट्विट : An example of what classic infowar will look like. Not going into merits of Hindenburg expose but a foreign report leads to an immediate drop in stocks of company dealing with infra in India. Need IW preparedness!!
खोटे नरेटिव्ह उद्धवस्त करून योग्य माहिती लवकरात लवकर तुम्ही जनतेपर्यंत कशी पोहोचवता यावर, अगदी कमी वेळात होणारे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान तुम्ही टाळू शकता.. जे नुकसान शेकडो मिसाईलने होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त असणार आहे!
हे फक्त एक कंपनीशी संबंधित प्रकरण नाही, हे युद्ध आहे..🙏
– वेद कुमार.
हिंडनबर्ग आणि काँग्रेस दोघांनाही गौतम अदानी पुरून उरणार. गॅरंटेड!
फोटो गुगल साभार