हिंडेनबर्ग रिसर्च अचानक बंद.
आता यापुढे भारताच्या अंतर्गत आणि बाह्य जगतात अस्थिरता निर्माण करायची तर केवळ हिंदू मुस्लिम यांच्या विभाजनाने भागणार नाही, तर काही आर्थिक हत्यारे वापरणे आवश्यक आहे, हे भारताच्या हितशत्रूना समजून चुकले आहे. भारताची वाढती आर्थिक ताकद रोज नव्या उंचीवर पोहचत आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे.
त्यानुसार हिंडेनबर्गच्या अहवालाची वेळ, पाश्चात्य विश्वात भारतासारख्या उदयोन्मुख शक्ती बद्दलच्या शंका उपस्थित करणे इत्यादी एकापाठोपाठ एक घडत गेलेल्या गोष्टी हा काही योगायोग नव्हता. लोकसभा निवडणुकीपूर्वी जनभावना प्रभावित करण्याचा मुद्दाम टाकलेला डाव म्हणजे अदानी वाद. कसलेही स्पष्ट पुरावे न देतासुद्धा भारतीय जनतेच्या मनात देशाच्या आर्थिक स्थितीबाबत अस्वस्थता निर्माण झाली.किंबहुना, हिंडेनबर्गचा उपयोग भारतातील प्रस्थापित सरकारच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला गेला.
हिंडेनबर्गने भारताशी पंगा घेण्याचे कारण आपण समजू शकतो. त्या मगिल राजकारण जनतेसमोर आले आहेच. हिंडेनबर्ग आपला शत्रू आहे, हे देशाला ज्ञात झाले होते. तथापि, हिंडेनबर्गचा नवा अवतार जन्म होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. किंबहुना, हिंडेनबर्गचा पर्याय निर्माण झाला सुद्धा असेल आणि त्यानंतरच हिंडेनबर्ग बंद झाली असेल.
या घटनेचा अधिक धोकादायक अर्थ असा निघतो कि डीप स्टेट, सोरोस gang ने काहीतरी दुसरे हिंडेनबर्गची जागा घेणारे निर्माण करून ठेवले आहे, त्याच्या कार्यशैलीविषयी आपल्याला सामान्य जनता म्हणून सुतराम कल्पना नाही. अशी काही व्यवस्था केल्याशिवाय हिंडेनबर्ग नावाचे दुकान बंद झाले असल्याची शक्यता कमीच आहे.
राजकीय वर्तुळातून भारतीय जनता पक्षाने हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेचा तीव्र निषेध केला आहे. हि संस्था जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय रोखू पाहणाऱ्या पाश्चात्य शक्तींच्या हातातील प्यादी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने भारताचा आर्थिक आणि राजकीय मार्ग अस्थिर करण्यासाठी तयार केलेल्या “वोक इकोसिस्टमच्या” टूलकिट मध्ये काँग्रेस, आणि इतर देशांतर्गत विरोधी शक्तींशी हिंडेनबर्गची मिलीभगत असल्याचे अनेकवार विविध प्रकारे सिद्ध झाले आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रमुख औद्योगिक संस्थांना लक्ष्य करून भारताच्या सार्वभौमत्वाला हानी पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा या निमित्ताने पुन्हा एकवार अभ्यास करून, आवश्यक त्या संरक्षक भिंती भारतीय आर्थिक विश्वात उभ्या करणे, हे आता सरकारचे पुढचे पाऊल असणार आहे.
हिंडेनबर्ग बंद झाले ही goodnews नाही, तर धोक्याची घंटा आहे. धोक्याचे रूप बदलले आहे. ते ओळखू येईस्तोवर सजग रहा.- सोर्स.