हिंसेची भाषा करणारे खेडेकर संविधाना प्रेमी कसे ?

0

हिंसेची भाषा करणारे खेडेकर संविधाना प्रेमी कसे ?

आपल्या देशात संविधान बचाव ही घोषणा राजकीय पक्षा साठी परवीली ची घोषणा ठरली आहे .लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा साठी “संविधान खतरे मे- संविधान बचाव” असा खोटा प्रपोगंडा चालवून सामाजिक फुट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष असून आता सुद्धा संविधान हाच विषय घेऊन मोठ्या प्रमाणात समाजकारण व राजकारण सुरू झाले आहे. भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा आत्मा असून जगातील कोणतीही शक्ती भारतीय संविधान खतम करू शकत नाही हे सूर्यप्रकाशा एवढ सत्य आहे. परंतु ज्यांनी कधीच संविधान मधील मुलभूत तत्त्वाचा सन्मान केला नाही किंवा संविधान आदर केला नाही त्याच व्यक्ती संविधान जीवंत ठेवण्याच्या मोठ मोठ्या बाता करीत आहेत .सिंदखेड राजा येथे दि १२ जाने.रोजी संपन्न झालेल्या मातोश्री जिजाऊ यांच्या ४२७ व्या जन्मोत्सव मध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी “सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली” प्रवृत्तीची भाषा कैली संविधाना विषयी कळवळा करून संविधान आणि लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच संविधान अबाधित राहणे गरजेचे असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. “लोक तोंडा मध्ये सोन्याचा व हातात चांदीचा चमचा घेऊन जन्मास आले पण मी संविधान घेऊन जन्मास आलो आहे” अशा आशयाचे ढोंगी वक्तव्य सुध्दा त्यांनी केले आहे. त्यामुळे खेडेकर खरोखरच संविधान जीवंत व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत की, संविधान मधील मुलभूत तत्वा सोबत प्रतारणा कारण्या साठी प्रयत्न करणार आहेत याचा विचार करण्याची गरज आहे हिंसेची भाषा करणारे खेडेकर संविधाना प्रेमी कसे ? स्वंयघोषित युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या गेल्या दोन-अडीच दशकातील विखारी दादागिरी कार्यपद्धतीचा आणि उग्र विषारी प्रचाराचा मागोवा घेतल्यास किंवा त्यांची भाषणे व पुस्तकाचा विचार केल्यास त्यांनी सतत गटार दुर्गंधी व मौखिक जुलाब व्यक्त केला आहे. तसेच संविधानाच्या चौकटीत न बसणाऱ्या हिंसेचे सतत समर्थन केले आहे. तसेच अनेक वेळा देशाच्या सामाजिक एकता व एकात्मतेला नख लावून सामाजिक तेढ निर्माण करणारी भाषा सुद्धा केली आहे. महिला विषयी तर त्यांनी अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद टीकाटिप्पणी केलेली आहे. त्यामुळे ते संविधान जीवंत ठेवण्याची भाषा कोणत्या तोंडाने म्हणत आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांनी अनेक पुस्तक ” शिवरायांच्या बदनामीची केंद्रे” पुस्तक स्व.वसंतदादा पाटील यांच्या जयंती प्रित्यर्थ दि १३ नोव्हेंबर २०१० रोजी प्रकाशित केले असून आपल्या पुस्तकाच्या पान क्रं ५४,५५ वर त्यांनी हिंसा करण्याचे आवाहन केले आहे. एका समाजाला उद्देशून त्यांनी मराठा समाजाला सुनियोजित धार्मिक जातीय दंगल घडवून आणाण्याची चिथावणी दिली आहे. ब्राम्हण हाच एकमेव शत्रू व तो नेस्तूनाभुत करणे हाच संकल्प ही प्रतिज्ञा घेऊन भारतभर प्रत्येक शहर – गावात ब्राम्हण वस्त्या सरसकट नेस्तनाबूत कराव्या,सर्वच ब्राम्हण कापून वा जाळून मारावेच असे हिंसेला प्रोत्साहन देणार लिखाण केल आहे. तसेच “भारतीय समाज चित्रात बहुजन शोध” पुस्तका च्या पान क्र१३ वर ब्राम्हण समाजाला ३२ प्रकारच्या शिर्षकाखाली १७८ प्रकारच्या शिव्याची लखोली वाहिली आहे. “बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास” पुस्तका च्या पान क्र६८वर बामणच्या ढुंगणवर लाथा घालून त्यांना त्यांच्या मुळ देशात पाठवून द्या” असे आव्हान केले “महाराज माफ करा” पुस्तकाच्या पान क्रं.११ वर वैदिक नपुसंक व पळपुटे असतात असा जावाईशोध शोध सुद्धा लावला आहे. एकूण त्यांनी आपल्या सर्व पुस्तकां मध्ये संविधानाची पायमल्ली करण्याचं काम केलेल आहे. संविधानाच्या प्रस्तावना, उद्देशिकेत”आम्ही भारताचे लोक”म्हटल असून संविधान समोर सर्व भारतीय समान असून कोणलाही कोणत्याही समाजाचा द्वेष व अपमान करण्याचा अधिकार नाही.पण एखाद्या समाजाच्या समूहाला शिवीगाळ करणे,कापून वा जाळून मारण्याची भाषा करण कितपत योग्य आहे ? त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर संविधान जीवंत व अबाधित ठेवण्या साठी प्रयत्न करतील की अपमान करतील ? त्यांचा संविधान कळवळा शुध्द ढोंग असून संविधान प्रेम बेगडी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही महिलां विषयी मौखिक जुलाब पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या अनेक पुस्तकात जसे हिंसेचे समर्थन केले आहे त्याच प्रमाणे त्यांनी महिलांचा सुद्धा सतत अपमान केला आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात गटारांची दुर्गंधी निर्माण करणारी चिखलफेक सुध्दा केली आहे. “मराठ्यांचे रामदासीकरण”पुस्तकाच्या पान क्रं.४ वर कथित घसरगुंडीचा खेळाचा उल्लेख करीत महिला विषयी मस्तवाल, छिनाल,अश्लील भाषेचा प्रयोग करून मौखिक जुलाब व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या “शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे” पुस्तकाच्या पान क्रं.३४ ते ३५ वर महिला विषयी प्रचंड अश्लील भाषेचा वापर केला आहे भरगच्च भरलेली, मादक, कामुक अशी भाषा सुद्धा वापरलेली आहे.”१८५७ चे ब्राम्हण पुराण” पुस्तकात सुद्धा अशाच प्रकारचे उल्लेख करून प्रचंड गटार दुर्गंधीची चिखलफेक केली आहे “ब्राम्हण,ब्राम्हणया,ब्राम्हणवाद” पान क्र.१२ वर शिकलेल्या बहूजनंना सल्ला देतांना सज्जन ब्रम्हणाच्या नादी लागने म्हणजे आपण स्व:ता आपली आई,प्रिय पत्नी, बहिण वा सुंदर नातलग स्त्री एखाद्या वाईट कामाल लावण्या पेक्षा महाभयानक आहे हे निच लेखन केले. पुरुषोत्तम खेड़ेकर यांनी आपल्या अनेक पुस्तकात अशाच प्रकारची शिव्याची लखोली वाहिली आहे.आता पर्यंत त्यांनी संविधानाच्या मूलभूत तत्वाची पायमल्ली केलेली आहे. पण १२ जाने. मातृतीर्थावरुन त्यांनी संविधान व लोकशाही साठी जो कळवळा व्यक्त केला आहे ते ढोंग आणि बेगडी खेळी कशासाठी आणि कोणत्या फायदा साठी खेळल्या जात आहे याचा विचार बहुजन तथा मराठा समाजाला करावा लागणार आहे देवगड कोर्ट दणक्या मुळे संविधानाची भाषा ? पुरुषोत्तम खेडेकर यांनी आता पर्यंत मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून वादग्रस्त,हिंसेला प्रोत्साहन देणार वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच शेलक्या भाषेत साहित्य प्रसिद्ध करून महिलांचा अपमान करून महाराष्ट्रात जातीय विद्वेष निर्माण केला आहे. मराठा,बहुजन तरुणांची माथी भडकावून भंडारकर संस्थेवर हल्ला केला, दादोजी कोंडदेव ते गड़करीचे पुतळे हटविले,सोलापुरच्या शिवशिल्प लोकार्पण कार्यक्रमात चप्पल फेकली, रायगढावरील वाघ्या कुत्र्याची समाधि फोडली.शेलक्या भाषेत शिविगाळ करून समाजा-समाजामध्ये मतभेद निर्माण केले ज्ञानदेव-तुकाराम ऐवजी नामदेव-तुकारामचा गजर केला त्यातही टाळकरी-माळकरी असे भेद निर्माण केले होते,ब्राम्हणच्या ढुंगनावर लाथा मारण्याची भाषा केली महिला विषयी गटार दुर्गंधी व मौखिक जुलाब सुध्दा व्यक्त केलेला आहे.पण महिला व एका समाजाच्या अपमान मुळे देवगड कोर्टाने त्यांना दणका दिला आहे त्यांना माफीनामा सादर करावा लागला संविधान मुळे आपल घाणरेड तोंड बंद करावे लागले आहे. त्यामुळेच त्यांनी आता मातोश्री जिजाऊ जन्मोत्सवमध्ये मातृतीर्थवरून भारतीय संविधान व लोकशाही अबाधित व जीवंत ठेवण्याची भाषा केलेली आहे. वास्तविक पाहता त्यांनी व्यक्त केलेली संविधान आणि लोकशाहीची भाषा केवळ शुध्द ढोंग असून मराठा व बहुजन समाजाने अशा ढोंगी वक्तव्य पासून सावधान राहण्याची गरज आहे.कारण सतत हिंसेची भाषा करणारे व महिलांचा शेलक्या शब्दात अपमान करणारे खेडेकर संविधान प्रेमी कसे ? असा प्रश्न सामान्य माणसात चर्चिला जात आहे. फोटो गुगल.

अशोक राणे, अकोला – भ्र.९४२३६५८३८५

0

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Your email address will not be published.