इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे नेते सय्यद हसन नसरल्लाह ठार झाले आहेत.

0

इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे नेते सय्यद हसन नसरल्लाह ठार झाले आहेत, आणि हा हल्ला इराणी गुप्तहेराने दिलेल्या माहितीच्या आधारे झाला असल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी कमांड मुख्यालयात हसन नसराल्लाहची हत्या झाली. एक आठवड्यापूर्वीच इस्रायलने शेकडो स्फोटकांनी भरलेल्या पेजर्स आणि रेडिओंचे भीषण स्फोट केले होते ज्यात हिजबुल्लाहचे मेंबर मारले गेले. नसराल्लाहचा मृत्यू मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.
नसराल्लाह हा फक्त हिजबुल्लाहसाठीच महत्त्वाचा नेता नव्हता, तर इराण आणि संपूर्ण “Axis of Resistance” चा प्रमुख आधारस्तंभ होता.

हिजबुल्लाह एक स्थानिक आंदोलन होते ज्याची उभारणी लेबनॉनमध्ये झाली आणि त्याला इराणने पोसले. नसराल्लाहने या गटाला अधिक शक्तिशाली केले जी इस्रायलला आव्हान देऊ शकेल.घाबरलेल्या इराणने साहजिकच या अनपेक्षित हल्ल्याचा निषेध करत इस्लामिक सहकार्य संघटनेची तातडीची बैठक बोलावली.

या हल्ल्याने हिजबुल्लाहची ताकद आणि त्याची स्थानिक पकड कमकुवत झाली आहे. हिजबुल्लाह हा इराणचा प्रमुख सहयोगी असल्याने या हल्ल्यामुळे इराणच्या प्रादेशिक रणनीतीला मोठा अडथळा येऊ शकतो. उद्या इराण आणि हिजबुल्लाहचे भविष्यातील संबंध आणि भागीदारीवरही त्याचा खोल परिणाम होऊ शकतो.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शनिवारी म्हटले की, “Nasrallah was not a terrorist, he was the terrorist”.

https://timesofindia.indiatimes.com/world/middle-east/israeli-airstrike-kills-hezbollah-leader-nasrallah-after-iranian-mole-tip-off-how-high-stakes-operation-unfolds-in-beirut/articleshow/113787261.cms

Leave A Reply

Your email address will not be published.