कारंजा विधानसभेत कांटे की टक्कर.

0

कारंजा विधानसभेत कांटे की टक्कर.

* संभ्रमित मतदार एकाजागी येण्याची शक्यता. 

* मत विभाजनाची दाट  शक्यता 

येणाऱ्या २० नोव्हेंबर होणाऱ्या कारंजा विधानसभेच्या  सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान प्रक्रियेला अवघे दोन दिवस उरले आहे. या विधानसभा निवडणुकीत यावेळी दोन उमेदवारात कांटे की टक्कर होणार असून, अन्य तीन उमेदवारांची भूमिका ‘ गेमचेंजर ‘ ठरणार असल्याचा अंदाज मतदार व्यक्त करत आहे. 

महाविकास आघाडीकडून ऍड.ज्ञायक पाटणी तर महायुतीकडून सईताई डहाके ह्या निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्यासमोर एमआयएमचे युसुफ पुंजानी आणि वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.  सामान्य मतदारांच्या म्हणण्यानुसार विजयासाठी ऍड.पाटणी आणि सई डहाके यांच्यात जोरदार रस्सीखेच होऊ शकते. यावेळी मत विभाजन मोठ्या संख्येने होण्याची शक्यता असल्यामुळे  पुंजानी व धाबेकर  यांनी  जेवढी जास्त मते मिळवली तेवढा महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवाराच्या विजयाचा रस्ता कठीण होणार आहे. तथापि, या गोंधळात पुंजानी किंवा धाबेकर  यांनाही अनपेक्षितपणे विजयाची संधी मिळू शकते, असा अंदाजही काही मतदार व्यक्त करताना दिसत आहे. या व्यतिरिक्त समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक  हे बंजारा समाजाचे मतदान आपल्याकडे खेचणार असल्याने  विजयी उमेदवारांचे मताधिक्य कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  

दरम्यान, या निवडणुकीत उमेदवारांची तगडी फौज उभी असल्याने सुरुवातीला मतदान कुणाला  करावे ? याबाबतीत मतदार संभ्रमावस्थेत होते. परंतु, मतदानाची तारीख आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्याने संभ्रमित मतदार एकाजागी येत आहे. ही मते कुणाच्या फायद्याची ठरतात हे तर २३ नोव्हेंबरलाच समजणार आहे. (फोटो गुगल साभार)

 

  • प्रफुल बानगावकर ,कारंजा. वाशिम. 

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून पत्रकार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.